Posts

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Image
  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ते ३१ मे पर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावे खाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर 'लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३' प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ०२ लाख रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या संघास ०१ लाख रुपये व भव्य चषक, मालिकावीरास मोटारसायकल व चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास प्रत्येकी १० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.         ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने गुरुवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ७. ३० वाजता श्री म्...

रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी*   *--उपविभागीय अधिकारी अमित शेडगे*

Image
रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - उपविभागीय अधिकारी अमित शेडगे प्रतिनिधी /संदीप लाड :- आहारातील भरड धान्यांचा वापर कमी झाल्याने प्रत्येक कुटूंबास विविध आजारांचा सामना करावा लागत असून रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी राजगिरा या सारख्या तृणधान्यांचा (भरड धान्य) वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी आज श्रीवर्धन येथे केले.      केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच नगरपरिषद श्रीवर्धन यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर येथे आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त आयोजित मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.         यावेळी तहसिलदार महेंद्र वाकळेकर, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे, , तालुका कृषी अधिकारी डी.एल. कुंभार, बालविकास सेवा अधिकारी श्रीमती अमिता भायदे, म्हसळा तहसिलदा...

३९ वा वाढदिवसानिमित्त ओव्हल मैदान येथे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजन.*

Image
  ३९ वा वाढदिवसानिमित्त ओव्हल मैदान येथे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजन.*            मुंबई प्रतिनिधी   - श्री.महेंद्र सखाराम जाधव यांचा ३९ वा वाढदिवस ओव्हल मैदान मुंबई येथे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक हौशी क्रिकेट खेळाडूंच्या उपस्थित साजरा होणार आहे.          गेली ८/९ वर्ष असे नियोजन करण्यात येत आहे. दि. ४ जून २०२३ या दिवशी ओव्हल मैदानावर नामांकित क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित संघांना संधी असणार आहे.        म्हसळा तालुक्यातील सामाजिक निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून श्री महेन्द्र सखाराम जाधव यांच्या कार्याचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, आरोग्य क्षेत्रात ओळख आहे. तसेच शैक्षणिक उपक्रम- शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप ,गरजु विद्यार्थांना सहकार्य, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहीले आहेत. त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्यातील श्रमजीवी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त...

"कचरा डेपो विरोधात नागरिक रस्त्यावर" पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित

"कचरा डेपो विरोधात नागरिक रस्त्यावर" पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित  पनवेल : नवीन पनवेल सेक्टर 1 येथे सिडकोचे गाड्या दुरुस्ती आणि सर्विस सेंटर साठी नियोजित भूखंड आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडकोकडून महानगरपालिका हद्दीतील कचरा गोळा करण्याची हस्तांतरित करण्यात आली. ज्यामध्ये नियोजना अभावी सर्विस सेंटरच्या जागेवर संपूर्ण परिसरातील कचरा गोळा केला जात होता. त्यानंतर तो मोठ्या गाड्यांमधून घोट कॅम्प येथील कचरा डेपो मध्ये पाठविला जात होता. सदर प्रक्रिया दरम्यान त्या ठिकाणी चोवीस तास कचरा साठवण होत होती याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्यावर पनवेल महानगरपालिकेकडून सतत सांगण्यात येत होते की सिडकोने सदर प्रक्रियेसाठी भूखंड उपलब्ध करून दिल्यानंतर ते केंद्र हटविले जाईल. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडे लेखी स्वरूपात गेली काही महिने पाठपुरावा केलेला आहे. 23 मे रोजी सिडकोला सदर विषयात...

ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते

Image
 ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते  वाढीव १५ लाख निधीचे तात्काळ पत्र देऊन पुढील कामाला चालना म्हसळा - २१ मे २०२३ रोजी म्हसळा तालुका कुणबी समाज संघटना दक्षिण ठाकरोली विभाग भव्य वास्तू चे उद्घाटन श्रीकृष्ण वाडी (कोकबल) येथे मा. खा.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव पाटील, कृषी संवर्धन माजी सभापती बबन मनवे, उपनगराध्यक्ष सुनीलजी शेडगे कुणबी समाज नेते कृष्णा कोबनाक, कुणबी संघ उपाध्यक्ष बबन उंडरे,रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शंकर बेटकर, शंकर तिलटकर, नथुराम घडशी तालुका अध्यक्ष समिर बनकर, मुंबई सरचिटणीस महेश शिर्के, माजी उपसभापती संदिप चाचले,उपाध्यक्ष महेंद्र टिंगरे , महिला अध्यक्षा स्नेहा खापरे, मिना टिंगरे, स्नेहा सोलकर माजी सभापती छाया म्हात्रे, विभाग अध्यक्ष रमेश शिंदे, दिलिप मांडवकर, मोहन शिंदे,सदा आग्रे, राजु जाधव, नथुराम भुवड, संतोष घडशी, अनिल बांद्रे ,संजय ठोंबरे, महेंद्र घडशी, मनोज मोरे,भरत बांद्रे सुनिल सोलकर,संदिप मोरे,रघुनाथ गोणबरे यावेळी विशेष सन्मान नथुराम काताळे, व सतीश शिगवण यांचा करण्यात आले. ...

श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक

Image
 श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक म्हसळा -   ग्रामस्थ व महिला मंडळ (स्थानिक - मुंबई)आणि वाघेश्वर क्रिकेट संघ कुणबी समाज तोंडसुरे यांच्या वतीने गावातील सुकन्या श्रृती सुनिल शिगवण हिने  नुकत्याच झालेल्या रायगड पोलिस भरतीत ती पात्र ठरली आहे. म्हणून या चमकदार कामगिरी बद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच एक हात मदतीचा म्हणून पुढील शैक्षणिक सहकार्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहाय्य केले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित गावचे सरपंच सुरेश महाडीक, गोविंद महाडीक ग्रामीण अध्यक्ष, सुरेश गुणाजी महाडिक मुंबई अध्यक्ष, विशेष निमंत्रित पाहुणे आदर्श शिक्षक नरेश सावंत सर , गणेश भायदे युवा कार्यकर्ते,समाजसेवक जलालभाई जहांगीर, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर , क्रिडा मंडळ अध्यक्ष वसंत महाडीक, सेक्रेटरी प्रकाश बांद्रे, उपाध्यक्ष मनेष बांद्रे, विनोद जाधव , कर्णधार रोहन महाडीक,उपसेक्रेटरी, गाव सदस्य प्रकाश महाडिक, तुकाराम महाडीक, सुनील शिगवण, शैलेश शिगवण, महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई बांद्रे, हिना महाडीक,भिमा ...

उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान.

Image
  उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान. उरण (विठ्ठल ममताबादे ) अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, "मराठी साहित्य मंडळ" या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार 2023 ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या शुभहस्ते जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या शिक्षिका प्रमिला संतोष पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शुक्रवार दि. 19/5/2023 रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे  प्रदान करण्यात आला.उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या त्या पत्नी आहेत. उरणच्या प्रमिला संतोष पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार 2023 मिळाल्याने प्रमिला पवार यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.