Posts

सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.

Image
  सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.  विविध सामाजिक संस्था, संघटनेला पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव.  उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे) सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबूसरे या संस्थेची स्थापना 20 एप्रिल 2023 रोजी झाली. या संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. 4 जून 2023 रोजी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्था स्थापन झाल्यापासून हा संस्थेचा पहिलाच उपक्रम होता.या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे यांच्या माध्यमातून व समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.एकीकडे रक्तदान सुरु असतानाच दुसरीकडे उरण मधील विविध सामाजिक संस्थांना, संघटनांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी 35 हून अधिक विविध सामाजिक संस्था, सघटनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस...

खासदार की साठी महेंद्रशेठ घरत मावळ मतदार संघामधून 100% जिंकणार

Image
  मावळ लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा .  कोकण आणि रायगड मध्ये काँग्रेसला  संजीवनी देण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम अशा  रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना मावळची  उमेदवारी द्या. रायगड जिल्हा काँग्रेस नेते , पदाधिकारी ,महिला काँग्रेस ,युवक काँग्रेस अल्पसंख्यक सेल ,ओ .बी .सि .सेल सेवादल सर्व कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्टींकडे एकमुखी मागणी उरण - काँग्रेस पक्षाने राज्यातील  लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून कोणकोणत्या जागा काँग्रेस सक्षमपणे लढऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी 2 व 3 जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत देऊ शकतात या वर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत झाल्याचे कळते. पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला सोडला गेल...

"नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

Image
  " नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा.   विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल :    पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील सिडको विभागातील मालमत्ता कराबाबत अजूनही संभ्रम आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावल्या आहेत. यावर प्रितम म्हात्रे यांनी वेळोवेळी सवलती संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.             मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही  500  चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेने  PAP ( प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात...

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजर

Image
जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा उरण : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे समाजात अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मानले जातात. काँग्रेस कार्यकर्ते व कामगार यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवस म्हणजे उत्सव. त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कामगार क्षेत्रातील नागरिक प्रेम करतात याचा प्रत्येय त्यांच्या वाढदिवसा दिवशी आला. ते समाजासाठी करत असलेल्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे मित्र, कार्यकर्ते, सहकारी यांनी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला.   धुतुम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील व सर्व सदस्य यांच्या तर्फे वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर व जेष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रम करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक प्रेमनाथ ठाकूर, गांव अध्यक्ष शंकर ठाकूर, महिला तालुका उपाध्यक्षा निर्मला ठाकूर, कुंदन पाटील, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.       पेण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे, अशोक मोकल, आर....

रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

Image
  रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल : पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड मोहल्ला मशीद शेजारील रस्त्या खचल्या बाबत चौकशी करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.        पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड पाडा मोहल्ला येथील मज्जिद शेजारील रस्ता खचून टँकरचा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे. या रस्त्याच्या नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामात हयगय केल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने हा रस्ता खचला आहे तरी संबंधित कामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 'जल्लोष सुवर्णयुगाचा'; रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर 

Image
  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 'जल्लोष सुवर्णयुगाचा'; रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर  पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय,  क्रीडा कार्यक्रमांच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०२ जून रोजी न्हावेखाडी रामबाग येथे  'जल्लोष सुवर्णयुगाचा' मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्यनारायण महापूजेचे तर रविवार दिनांक ०४ जून रोजी मोहोपाडा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.            ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद तर सायंकाळी ७. ३० वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत पप्पू सूर्यराव निर्मित आणि गायक योगेश आग्रावकर, गायक अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असलेला 'जल्लोष सुवर्णयुगाचा' हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम ...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Image
  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ते ३१ मे पर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावे खाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर 'लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३' प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ०२ लाख रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या संघास ०१ लाख रुपये व भव्य चषक, मालिकावीरास मोटारसायकल व चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास प्रत्येकी १० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.         ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने गुरुवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ७. ३० वाजता श्री म्...