Posts

...तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील? # मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील. #राजकारणात काहीही घडू शकते 8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही?

Image
  ... तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील? मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील. #राजकारणात काहीही घडू शकते 8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही? पनवेल (रायगड मत/जितेंद्र नटे) सध्या पावसाळा जवळ जरी आला असला तरी राजकारणाचा तवा मात्र तापू लागला आहे. या तव्यावर आपली भाकरी कशी शेकवायची आणि 5 वर्षे जनतेला कसे शेकवायचे याच्यातच लबाड राजकारणी गर्क आहेत. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधी काहीं घडेल कधी कोण जिंकेल आणि कधी कोण क्लीन बोल्ड होईल सांगू शकत नाही. सध्या चर्चा सुरू आहे ती मावळ मतदार संघातील उमेदवाराची. का चर्चा चालू आहे? का सर्वांना अचानक वाटू लागले की आपण इथे जिंकू शकतो? कारण शिवसेनेचे खासदार शिवसेना सोडून शिवसेनेत गेले आहेत. वाचताना गडबडलात ना? अशीच गडबड होणार आहे मतांची म्हणूनच सगळ्यांना इथं आपली डाळ शिजू शकते असे वाटू लागले आहे. इथले खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेत, खऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत नाहीत. आणि लोकांनी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दैवत म्हणून मतदान श्रीरंग बारणे यांना केले होते. यावेळी श्...

महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
  *महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन*  प्रतिनिधी/संदीप लाड   श्रीवर्धन शहरामध्ये शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्ष प्रतोद आणि गोरगरिबांचे कैवारी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या ६०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख सुरेश मिरगल,श्रीवर्धन शहर प्रमुख प्रीतम  श्रीवर्धनकर यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एस,टी मधील कर्मचारी, कृषी विद्यालय गालसुरे येथील प्राध्यापक विशाल बैरागी आणि दीपक पाटील यांच्यासह ६० रक्तदात्यानी रक्तदान केले  या कार्यक्रमावेळी शहर प्रमुख प्रीतम  श्रीवर्धनकर यांनी २ जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा आणि गोरगरीब जनतेच्या कैवारी आमदार भरतशेठ गोगावले यांचा १जून वाढदिवस हा दुग्धशर्करा योग आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानामुळे लोकांचे जीव वाचवले जातात म्हणून आमदार भरतशेठ यांना अभिप्रेत असलेल्या उपक्रमाचे आयोजन करून आमदार भरतशेठ गो...

सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.

Image
  सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.  विविध सामाजिक संस्था, संघटनेला पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव.  उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे) सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबूसरे या संस्थेची स्थापना 20 एप्रिल 2023 रोजी झाली. या संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. 4 जून 2023 रोजी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्था स्थापन झाल्यापासून हा संस्थेचा पहिलाच उपक्रम होता.या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे यांच्या माध्यमातून व समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.एकीकडे रक्तदान सुरु असतानाच दुसरीकडे उरण मधील विविध सामाजिक संस्थांना, संघटनांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी 35 हून अधिक विविध सामाजिक संस्था, सघटनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस...

खासदार की साठी महेंद्रशेठ घरत मावळ मतदार संघामधून 100% जिंकणार

Image
  मावळ लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा .  कोकण आणि रायगड मध्ये काँग्रेसला  संजीवनी देण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम अशा  रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना मावळची  उमेदवारी द्या. रायगड जिल्हा काँग्रेस नेते , पदाधिकारी ,महिला काँग्रेस ,युवक काँग्रेस अल्पसंख्यक सेल ,ओ .बी .सि .सेल सेवादल सर्व कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्टींकडे एकमुखी मागणी उरण - काँग्रेस पक्षाने राज्यातील  लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून कोणकोणत्या जागा काँग्रेस सक्षमपणे लढऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी 2 व 3 जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत देऊ शकतात या वर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत झाल्याचे कळते. पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला सोडला गेल...

"नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

Image
  " नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा.   विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल :    पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील सिडको विभागातील मालमत्ता कराबाबत अजूनही संभ्रम आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावल्या आहेत. यावर प्रितम म्हात्रे यांनी वेळोवेळी सवलती संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.             मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही  500  चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेने  PAP ( प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात...

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजर

Image
जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा उरण : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे समाजात अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मानले जातात. काँग्रेस कार्यकर्ते व कामगार यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवस म्हणजे उत्सव. त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कामगार क्षेत्रातील नागरिक प्रेम करतात याचा प्रत्येय त्यांच्या वाढदिवसा दिवशी आला. ते समाजासाठी करत असलेल्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे मित्र, कार्यकर्ते, सहकारी यांनी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला.   धुतुम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील व सर्व सदस्य यांच्या तर्फे वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर व जेष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रम करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक प्रेमनाथ ठाकूर, गांव अध्यक्ष शंकर ठाकूर, महिला तालुका उपाध्यक्षा निर्मला ठाकूर, कुंदन पाटील, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.       पेण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे, अशोक मोकल, आर....

रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

Image
  रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल : पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड मोहल्ला मशीद शेजारील रस्त्या खचल्या बाबत चौकशी करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.        पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड पाडा मोहल्ला येथील मज्जिद शेजारील रस्ता खचून टँकरचा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे. या रस्त्याच्या नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामात हयगय केल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने हा रस्ता खचला आहे तरी संबंधित कामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.