Posts

रन फॉर एज्युकेशन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन

Image
  रन फॉर एज्युकेशन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन पनवेल(प्रतिनिधी) शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने जी-२० समिट च्या अंतर्गत रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. त्याला इंग्रजीमध्ये एफएलएन असे म्हटले जाते. याचा पाया जर मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला दिलेला आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांनी आज (मंगळवार, दि. २०) खारघर येथे केले.         भारताच्या जी-२० समिट अध्यक्षपदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागांत एफएलएन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक हब असलेल्या खारघरमध्ये मुंबई विभागाच्या 'रन फॉर एज्युकेशन रॅली' चे आयोजन करण्यात आले होते. खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सुरू झालेल्या या भव्य रॅलीचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या रॅ...

निसर्गाच्या सानिध्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत योग दिन उत्साहात साजरा 

Image
   निसर्गाच्या सानिध्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत योग दिन उत्साहात साजरा  पनवेल(प्रतिनिधी) जागतिक योग दिनानिमित्त आज (बुधवारी) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्याने भरपूर असलेल्या माची प्रबळगड येथे योगासने केली.            यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्यावतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. तर योगसाधक अरविंद गोडबोले, नैना म्हात्रे, सारिका शेलार, श्रुती शेलार  यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दि.२१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग जगात सर्वत्र लोकप्रिय आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. सर्व जग करोनाच्या विळख्या...

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Image
  भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा  पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने आणि एकतेने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा होता प्राख्यात योग प्रशिक्षक श्रद्धा हिरे यांच्या नेतृत्वाखाली या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.        सहाय्यक प्राध्यापक राघव शर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संतुलित आणि निरोगी जीवनशैली साधण्यासाठी योगाचे महत्त्व सांगितले. प्रभारी प्राचार्य धनश्री कदम यांच्या हस्ते श्रद्धा हिरे यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून योगाच्या सरावातून सर्वांगीण कल्याणासाठी कॉलेजची बांधिलकी अधोरेखित केली शारीरिक आणि मानसिक सामंजस्य राखण्यासाठी योगासने आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा महत्त्वाची आठव...

अक्षय शंनमुगंम आणि दिनेश पवार यांची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड. 

Image
अक्षय शंनमुगंम आणि दिनेश पवार यांची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड.  रायगड मत # अरुण लक्ष्मण पाटकर दि.24 ते 30 जून दरम्यान हाँगकाँग येथे आशिया पॅसिफिक आफ्रिका पॉवर लिफ्टींग स्पर्धेत बेंचप्रेस प्रकारात सहभागी होण्यास रायगडच्यां दिनेश पवार, (लोखंडे जिम) खोपोली यांची मास्टर व अक्षय शनमुगन (आयर्न मेट)खोपोली याची ओपन स्पर्धा साठी भारतीय संघात निवड झाली आहे असे पॉवर लिफ्टिंग इंडिया या राष्ट्रीय कार्यकारिणी ने पत्र दिले आहे .बेंच प्रेस स्पर्धेस दिनाक,२३/६/२०२३रोजी  पहाटे  ते हाँगकाँगला रवाना होतील.सदर स्पर्धा दिनांक -२४/६/२०२३ते ३०/६/२०२३ या कालावधीत होणार आहेत.खेळाडूंचे निवडीबाबत महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग चे सेक्रेटरी छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय खेळाडू संजय सरदेसाई यांचे बहुमोल सहकार्य झाले  आहे.त्यांनी या खेळाडूना शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच  "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीने आनंद व्यक्त करूनअध्यक्ष गिरीष वेदक,(पनवेल) सेक्रेटरी अरुण पाटकर  तसेच राहुल गजरमल.सचिन भालेराव.माधव पंडित,(रसायनी)सुभाष टेंबे(माणगाव) ,श्रीनिवास भाटे , दत्तात्रय मोरे,...

पॉवरलिफ्टीग रायगडचा संघ राज्य वरिष्ठ स्पर्धा साठी जाहीर

Image
  पॉवरलिफ्टीग रायगडचा संघ राज्य वरिष्ठ स्पर्धा साठी जाहीर रायगड मत # अरुण लक्ष्मण पाटकर मुंबई मध्ये दिंनाक २२जून२०२३ते २४जून२०२३या कालावधीत होणाऱ्या पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पॉवरलिफ्टीग स्पोर्ट्स असोसिएशनने रायगडचा संघ जाहीर केला आहे. ही वरिष्ठ राज्य स्पर्धा असल्याने या स्पर्धेत खेळाडूंचा कस लागत असतो. पुढील खेळाडूंची निवड "पॉवरलिफ्टिग स्पोर्ट्स असोसिशनचे सचिव अरुण पाटकर,माधव पंडित,राहुल गजरमल यांचे निवड समितीने त्यांचे कडे आलेल्या नावातून खेळाडूंची आजवरची कामगिरी लक्ष्यात घेऊंनजाहीर केला.आहे.   १)अमृता ज्ञानेश्वर भगत(४७किलो वजनी गट ) आयनमेट जिम खोपोली. २)सलोनी पद्माकर मोरे.(५७किलो गट)चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी ,महाड ३)विक्रांत अनिल गायकवाड.(१०५किलो वजनी गट)आयनमेट जिम, ४) ऋतिक शिशिर पोळ(१२०+किलो वजनी गट) आयनमेट जिम,खोपोली. व्यवस्थापक -- सचिन भालेराव,सुभाष टेंबे(माणगाव) तर प्रशिक्षक - माधव पंडित, अरुण पाटकर यांची निवड करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी"**श्रीवर्धन तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
 *"शासन आपल्या दारी"**श्रीवर्धन तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* प्रतिनिधी/संदीप लाड      राज्य शासनाच्या "शासन आपल्या दारी" या महत्त्वाकांक्षी  उपक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीवर्धन तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांच्या पुढाकारातून तहसिलदार कार्यालयामार्फत श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांसाठी दि.17 जून 2023 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन  येथे शैक्षणिक दाखले, पीएम किसान योजना, ई-केवायसी, आधार अपडेशन, पोष्ट बँक खाते उघडणे, रेशनकार्ड देणे अशा विविध शासकीय लाभांबाबत एकदिवसीय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४००हून अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला    या शिबिरात श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना  दाखले उत्पन्न दाखले, वय व अधिवास दाखले, नॉन क्रिमिलेयर दाखले, ईडब्ल्यूएस दाखले ,पीएम किसान ई केवायसी करणे- पोष्ट बँक खाते उघडणे -  आधार कार्ड अपडेशन करणे-  शिधापत्रिका - या सेवा पुरविण्यात आल्या.     ...

वरिष्ठ महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग साधनसहित अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मुंबईत आयोजन

Image
वरिष्ठ महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग साधनसहित अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मुंबईत आयोजन." --------------- पनवेल -- महाराष्ट्र राज्य *पॉवरलिफ्टिग* असोसिएशन वतीने दिनांक २२जून २०२३ते२४जून २०२३या कालावधीत  निवड चाचणी  स्पर्धा मुंबईत होणार आहेत.पुरुष आणि महिला गटात अनेक जिल्ह्याचे नामवंत खेळाडू या स्पर्धात येतील.ही निवड चाचणी स्पर्धा *क्रीडाप्रेमी आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन.(सायन- धारावी विधानसभा मतदार संघ)यांनी पुरस्कृत केली आहे.आमदार "कॅप्टन तमिल सेलव्हन." यांना पॉवरलिफ्टिंग या खेळाची आवड आहे.या स्पर्धा *"समाज मंदिर हॉल,महानगर पालिका शाळेसमोर,सरदार नगर नं.३,प्रतीक्षा नगर  जंक्शन,सायन कोळीवाडा, 'गुरुतेग बहादुर नगर' मुंबई- ३७* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग असोसिएशनचे सरचिटणीस व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या स्पर्धचे नियोजन संजय सरदेसाई यांचे कडे असून त्यांना महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहसचिव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय माधव आणि खजिनदार सूर्यकांत...