Posts

रायगड जिल्ह्याला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत २ पदक.

Image
रायगड जिल्ह्याला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत २ पदक. दिनांक२३-६-२०२३ व २४-६-२०२३ या दिवशी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा र्अँटॉप हिल सायन कोळीवाडा , मुंबई येथे प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन (आंतर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग पदक विजेते)यांच्या उपस्थितीत पार पडली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला   स्पर्धेच्या महिला गटात रायगडच्या सलोनी मोरे हिने 63 किलो गटात प्रथम येवून सुवर्ण पदक पटकावले तर 47 किलो गटात अमृता भगत ही तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदकची मानकरी झाली श्री संजीवन भास्करन, अध्यक्ष व अर्जुन पुरस्कार विजेते, संदीप सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, संजय सरदेसाई ,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व श्री.रंगास्वामी , ऑलिम्पियन वेट लिफ्टर,रेल्वे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला.  "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीने खेळाडूंचे या यशाबद्दल आनंद व्यक्त करूनअध्यक्ष गिरीष वेदक,(पनवेल) सेक्रेटरी अरुण पाटकर तसेच राहुल गजरम...

मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट

Image
  मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट पनवेल(प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर रॉयल तुलीप येथे झालेल्या या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महाराष्ट्र पदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. समाज माध्यमांवरील तब्बल 90 सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर यांचा सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीना गोगरी यांनी केले. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, सोशल मिडिया आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे आणि सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. प्रदेश प्रवक्या श्वेता शालिनी यांनी भारतीय जनता पक्षाचे...

खांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

Image
  खांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती खांदा कॉलनी(प्रतिनिधी) देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मन उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यानुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी  @  9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत रविवारी (दि. 25) संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आला होता. खांदा कॉलनी येथील बेलिझा बँक्वेट हॉल येथे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, दीपक बेहेरा, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अल्प संख्यांक मोर्चा अध्यक्ष सय्यद अकबर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका चारुशीला घर...

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३

   राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई*   *स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर व स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र कामिनी बोस्टे ठाणे*  दिनांक२३-६-२०२३ व २४-६-२०२३ या दिवशी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन यांच्या उपस्थितीत  पॅरास्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या महिला व पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे,  पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजरोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई ...

श्रीवर्धन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

Image
  श्रीवर्धन मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. पिल्लई कॉलेज रसायनी व रॉयल एज्युकेशनल सोसायटीतर्फे उपक्रम रायगड मत (श्वेता भोईर): दहावी व बारावीचे निकाल नुकताच जाहीर झाले आहेत. वर्षभर कठोर मेहनत घेऊन अभ्यास करून या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस व रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ ए आर उंडरे हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच भविष्यात शैक्षणिक मार्ग निवड व करिअरच्या संधीं या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.   पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पसतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये सॅटेलाइट मेकिंग हँडऑन अ‍ॅक्टिव्हिटी, इसरो, डिझाइन थिंकिंग, करिअर गाइडन्स व अश्या अनेकविध विषयांवर सेमिनारचे आयोजन विविध शाळा कॉलेजेस मध्ये केले जाते. व पुढेही अश्या प्र...

"सन्मान कर्तुत्वाचा,सत्कार पनवेलच्या कन्यारत्नांचा" प्रितम म्हात्रे यांनी केला सत्कार!

Image
  "सन्मान कर्तुत्वाचा,सत्कार पनवेलच्या कन्यारत्नांचा" प्रितम म्हात्रे यांनी केला सत्कार! पनवेल :  14 जून ते 17 जून 2023 दरम्यान कामाठी नागपूर येथे 19 वी युवा  महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पनवेलच्या बॉक्सर मुलींनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले.त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व पनवेलकरांच्या वतीने शुभेच्छा देत माजी  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सत्कार केला.     मधुरा पाटील ठाणा नाका रोड येथील रहिवाशी हिने 60 ते 63 वजन गटांमध्ये सुवर्णपदक आणि स्पर्धेतील सर्वात मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर चा पुरस्कार पटकावला तसेच 25 जून 2023 पासून होणाऱ्या भोपाळ येथील बी एफ आय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . त्याबरोबरच कुमारी उन्नती परदेशी महाराणा प्रताप रोड परदेशी आळी येथील रहिवासी हिने 54 ते 57 वजन गटांमध्ये रौप्य पदक पटकावले . कुमारी योगिनी पाटील हिने 52 ते 54 वजन गटांमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे.

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई* 

Image
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई*  आज दिनांक२३-६-२०२३, वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलवन यांच्या उपस्थितीत प्यारा स्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेमध्ये आज महिला गट आणि पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे,  पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार मुंबई उपनगर, २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई उपनगर २) विजय शेलार, नवी मुंबई.३) ओमकार वाणी,कोल्हापूर महिला गट:-४७ किलो:- १)काजल भाकरे, ठाणे, २)हर्षदा घुले, मुंबई उपनगर ३)अमृता भग...