Posts

प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे - आमदार प्रशांत ठाकूर

Image
प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे - आमदार प्रशांत ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. आणि त्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे, अशा रीतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १५ सप्टेंबर) येथे केले.  भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे 'मेरी माटी मेरा देश', सेवा पंधरवडा, पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल अँप या विषयांच्या अनुषंगाने पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगतीपथावर आणले आहे, असे सांगतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे ती पार पाडाव...

नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर जेएनपीए मध्ये पाठपुरावा

Image
नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर जेएनपीए मध्ये पाठपुरावा  माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट. उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )जे एन पी टी प्रकल्पामुळे पुनर्वसीत झालेल्या नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण, नोकऱ्या व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी जेएनपीए प्रशासन भवन मध्ये जनरल मॅनेजर व सचिव श्रीमती मनीषा जाधव यांची माजी आमदार तथा रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेण्यात आली व नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण, 33.64 हेक्टर जमीन व नागरी सुविधा बाबत तसेच नोकऱ्या असे विविध समस्या बाबत चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला. तसेच या सर्व प्रश्नांवर जे एन पी ए चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.                 सदर वेळी नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष के एम घरत, ...

माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंंडेशनच्या वतीने पनवेल प्रभाग क्रमांक १९ करिता माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली होती. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी ७० मुलांनी सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. चला आपला बाप्पा स्वतः साकारूया, पर्यावरणाचा समतोल राखूया या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी श्री गणपती मंदिर येथे माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रंगली. या वेळी आर्टिस्ट नूतन पाटील व त्यांच्या टीममधील अभिषेक सुनका, निखिल सुनका, रितू यांनी लहान मुलांना गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. गेली दोन वर्षे कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. लहान मुलांना इकोफ्रेंडली गणपतीचे महत्त्व कळावे तसेच पर्यावरर्णाचे भान असावे या उद्दिष्टाने कोशिश फाउंडेशनच्या वती...

सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित* "रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान"

Image
  सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित* "रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान"   पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि सेवाभावी संस्थांचा सेवाश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथे जाऊन .प्रितम म्हात्रे यांनी सर्वप्रथम दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन,पोलीस, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु होते त्या ठिकाणी ते स्वतः जातीने उभे होते.                 त्यांना मंदिराच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक ती मदत त्यांनी केली. मदतकार्य करणारे कलेक्टर ऑफिस, NDRF टीम , पोलीस अधिकारी , प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, इतर शासकीय यंत्रणा मधील पदाधिकारी यांची सुद्धा अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था पनवेलचे माजी.नगराध्...

"माय मराठी खाद्य महोत्सव", पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम

Image
 "माय मराठी खाद्य महोत्सव",  पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम  पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे "माय मराठी" या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. उकडीच्या मोदकापासून ते थेट कोल्हापुरी तांबडा रस्स्या पर्यंत कित्येक अस्सल मराठमोळे पदार्थ तयार करून यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना त्याची चव चाखण्याची संधी दिली. या महोत्सवासाठी दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थितीत लाभली. यावेळी हॉटेल रॅडिसनचे जनरल मॅनेजर जी. शंतनू तसेच एच. आर.  मॅनेजर आशिष सर त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायातील बरेच शेफ्स आणि संचालक मंडळी आवर्जून उपस्थित होते.  या महोत्सवात उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मराठी खाद्य संस्कृती इतकी वैविध्यपूर्ण आहे. परंतु दुर्दैवाने तारांकित हॉटेलात आणि आंतरराष्टीय स्तरावर त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही अशी खंत देखील त्यांनी...

जिज्ञासाच्या जिद्दीला सलाम, आई-वडिलांच्या कष्टाला सलाम, अखेर पूर्ण केले MBBS.

Image
जिज्ञासाच्या जिद्दीला सलाम, आई-वडिलांच्या कष्टाला सलाम,  अखेर पूर्ण केले MBBS.  पत्रकाराची मुलगी झाली एमबीबीएस; पत्रकारांकडून डॉ. जिज्ञासा कडू हिच्यावर कौतुकाचा वर्षाव  पनवेल(प्रतिनिधी ) : दैनिक वादळवाराचे संस्थापक दा.चां.कडू गुरुजी यांची नात आणि संपादक विजय कडू यांची सुकन्या कुमारी जिज्ञासा विजय कडू हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप पूर्ण केली. ही बाब अभिमानास्पद असून जिज्ञासा चे यश हे भावी डॉक्टरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांनी आज येथे केले.  पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकाराच्या मुलीच्या यशाबाबत अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.         पत्रकारिता क्षेत्र हे इतर क्षेत्रांमध्ये निराळेच क्षेत्र आहे. आजच्या परिस्थितीत डॉक्टर होण्यासाठी पैसा हाच महत्वाचा भाग आहे, आणि पत्रकारिता करून आपल्या मुलांना डॉक्टर करणे ही तारेवरची कसरत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले विजय कडू यांनी आर्थिक कठीण दिवस पार करताना मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम केले. आणि त्यां...

वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा

Image
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन  वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी ----–-------------- मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे तात्काळ पाठवू आणि आमच्या स्तरावर शक्य होईल तेवढं वसतीगृहातील प्रवेशसंदर्भात कार्यवाही करू - शशिकला आहिरराव ------------------ पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदिवासी वसतिगृहाची निर्मिती केली गेली. या आदिवासी वसतीगृहात शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठं मोठ्या पदावर कार्यरत आहेत. वसतीगृहात शिक्षण घेण्याची शासनाने व्यवस्था केल्याने अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या पालकांचा आर्थिक बोजा कमी होत असतो.        माञ, इयत्ता १० वी पास झालेल्या विद्यार्थी,...