Posts

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षमीकरणाचा निर्धार

Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षमीकरणाचा निर्धार पनवेल : दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शेहबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रातील युवकांनी पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक मजबूत व सक्षम करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी महेबूब भाई यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युवकांशी संवाद साधला व विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि नियुक्ती पत्रं दिली. यावेळी पनवेल मधील सर्व युवकांच्या वतीने शेहबाज पटेल यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून संघटन उभे करणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावना ताई घाणेकर, प्रभारी शहर अध्यक्ष प्रमोद बागल, नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नु आंग्रे, अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष फारुक भाई, प्रदेश सरचिटणीस उमेश आग्रवाल, प्रदेश सचिव गुरुज्योत सिंग,...

मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण

Image
मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण पनवेल  : लोकमान्य टिळक यांना अभिप्रत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गेली ६२ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे मदन कोळी, परिवार यांनी या वर्षीच " असे प्रकटले श्रीस्वामी समर्थ " या देखाव्यात रंगत आणलेली आहे.                      हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भुषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले, यांची आहे. तसेच पडदा पेंटींग श्री. रमेश डुकरे, निवेदक अर्थव गोडबोले, तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी, नवीन पनवेल यांनी साकारलेली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. फोटो: स्वामी समर्थ देखावा

पनवेल ओरियन मॉलच्या वतीने मोदक स्पर्धा

Image
पनवेल ओरियन मॉलच्या वतीने मोदक स्पर्धा* पनवेल :  पनवेल मधील ओरियन मॉल मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोदक मेकिंग स्पर्धेचे आयोजन दि.24 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुळे या उपस्थित राहणार आहेत.        गणेशोत्सव म्हटले कि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचा आवडता असलेले मोदक बनवण्याची आगळी वेगळी स्पर्धा ओरियन मॉलने आयोजित केली आहे.या स्पर्धेतील प्रमुख तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.दरवर्षी हि स्पर्धा आयोजित करून महिला वर्गातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हि स्पर्श ओरियन मॉल आयोजित करीत असतो.त्यामुळे यावर्षी देखील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या मोदक मेकिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे अवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी केले आहे. फोटो - मोदक स्पर्धा

प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे - आमदार प्रशांत ठाकूर

Image
प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे - आमदार प्रशांत ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. आणि त्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे, अशा रीतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १५ सप्टेंबर) येथे केले.  भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे 'मेरी माटी मेरा देश', सेवा पंधरवडा, पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल अँप या विषयांच्या अनुषंगाने पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगतीपथावर आणले आहे, असे सांगतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे ती पार पाडाव...

नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर जेएनपीए मध्ये पाठपुरावा

Image
नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर जेएनपीए मध्ये पाठपुरावा  माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट. उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )जे एन पी टी प्रकल्पामुळे पुनर्वसीत झालेल्या नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण, नोकऱ्या व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी जेएनपीए प्रशासन भवन मध्ये जनरल मॅनेजर व सचिव श्रीमती मनीषा जाधव यांची माजी आमदार तथा रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेण्यात आली व नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण, 33.64 हेक्टर जमीन व नागरी सुविधा बाबत तसेच नोकऱ्या असे विविध समस्या बाबत चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला. तसेच या सर्व प्रश्नांवर जे एन पी ए चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.                 सदर वेळी नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष के एम घरत, ...

माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंंडेशनच्या वतीने पनवेल प्रभाग क्रमांक १९ करिता माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली होती. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी ७० मुलांनी सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. चला आपला बाप्पा स्वतः साकारूया, पर्यावरणाचा समतोल राखूया या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी श्री गणपती मंदिर येथे माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रंगली. या वेळी आर्टिस्ट नूतन पाटील व त्यांच्या टीममधील अभिषेक सुनका, निखिल सुनका, रितू यांनी लहान मुलांना गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. गेली दोन वर्षे कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. लहान मुलांना इकोफ्रेंडली गणपतीचे महत्त्व कळावे तसेच पर्यावरर्णाचे भान असावे या उद्दिष्टाने कोशिश फाउंडेशनच्या वती...

सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित* "रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान"

Image
  सेवाश्री पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित* "रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान"   पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि सेवाभावी संस्थांचा सेवाश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथे जाऊन .प्रितम म्हात्रे यांनी सर्वप्रथम दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन,पोलीस, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु होते त्या ठिकाणी ते स्वतः जातीने उभे होते.                 त्यांना मंदिराच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक ती मदत त्यांनी केली. मदतकार्य करणारे कलेक्टर ऑफिस, NDRF टीम , पोलीस अधिकारी , प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, इतर शासकीय यंत्रणा मधील पदाधिकारी यांची सुद्धा अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था पनवेलचे माजी.नगराध्...