Posts

रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक

Image
  रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक  मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने रु. 165.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची रु. 27.74 कोटीच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे.                            मे. श्री समस्ता ट्रेडींग प्रा.लि. व शरद क्लिअरिंग ॲण्ड फॉरवरडिंग प्रा.लि. या व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. सदर कार्यवाहीदरम्यान असे निदर्शनास आले की अनेक बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू होते. त्यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात धडक मोहीम राबवून त्याअंतर्गत प्रमुख सूत्रधार श्री. राहुल अरविंद व्यास व श्री. विकी अशोक कंसारा यांना दि. 04/10/2023 रोजी अटक करण्यात आली असून महानगर दंडाधिकाऱ्यांनी सदर व्यापाऱ्यांस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.    ...

# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय: # ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे? # जनतेचा एकच सवाल? # सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत.

Image
# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय: # ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे? # जनतेचा एकच सवाल? # सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत. रायगड मत (विशेष प्रतिनिधी)       गेली अनेक दिवस ग्रामस्थ मंडळामध्ये हा विचार धूमसत आहे. सरपंच निष्क्रिय ठरल्याचे दिसत आहे. 5 वर्षे पूर्ण होतील मात्र विकास कामे तर काहीचन नाही. अशी बोंब सकलप, बौदवाडी, नवानगर, सकलप कोंड गवळी वाडी ह्या सर्व वाड्या नाराज आहेत. लोकांनी थेट सरपंच म्हणून केवळ 1 मतांनी विजयी झालेल्या सरपंच यांनी कुठलेही जाणीव ठेवलेली नाही.     नवानगर येथे बेकायदेशीर बिल्डिंग, बेकायदेशीर धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? हे वेगळे सांगायला नको? याची चौकशी कधी होणार. सद्या गावामध्ये महादेव पाटील हेच सरपंच आहेत कि काय असे वाटू लागले आहे. तेच सर्वत्र धावपळ करून गावचा विकास साधताना दिसत आहेत. सभापती राहिल्यामुळे कदाचित त्यांना काम करण्याचे आणि माणुसकी जपण्याची कला चांगलीच अवगत आहे. राजकारण 20 टक्के आणि समाजसेवा 80 टक्के अशी त्यांची विचारसरनी आहे. गोष्ट कधी ...

श्रीवर्धन मतदार संघातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद - अदिती तटकरे

Image
श्रीवर्धन मतदार संघातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद - अदिती तटकरे  श्रीवर्धन : मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकासकामांची बैठक नुकतीच गुरुवारी मंत्रालयातील दालनात झाली. यावेळी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगांव, रोहा येथील विविध विकासकामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.          सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

8 आक्टोबर, गोरेगावं येथे रायगड मीं मराठी प्रतिष्ठाणच्या वतीने ठेवलेल्या रक्तदान शिबिरास, चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया.*🩸

Image
https://youtu.be/QP3mEouDaDQ?si=oDvJLbJPJvjmw4uD शरीरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात.  त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते.  रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते.                                                               *रक्तदान शिबिराचे ठिकाण :* *आय.बी.पटेल शाळा* *गोरेगाव (पश्चिम)* *मुंबई.* *रविवार दि.०८ ऑक्टोबर २०२३* *सकाळी : ०९ ते सायंकाळी : ३.०० वाजेपर्यंत.*                                                       *चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया.*?...

#‘अजित दादा उद्याच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार काय.....?

Image
#‘अजित दादा उद्याच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार कि काय.....? #‘अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार..... की काय, असं वाटू लागलंय बुवा’, असं शिवसेना आमदाराचं वक्तव्य समोर आले आहे. # येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये दादा हे मुख्यमंत्री होणार नाहीत. मुबंई मंत्रालय (रायगड मत) आशा बाळगून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीना कधी एकदा नक्की मुख्यमंत्री बनतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले होते. अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा वारंवार सुरु असतात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील बोलताना चुकून अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आता या सर्व घटनांवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी “अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की काय, असं वाटू लागलंय”, अशी उपरोधित प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चांना सातत्याने उधाण येताना दिसत आहे. याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न रायगड मत ने केला. यावेळी त्यांनी आपली सवि...

मोटारसायकलची चोरी

मोटारसायकलची चोरी  पनवेल  ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोरील रस्ताच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे .                           सुनील गावंड यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची युनिकॉन डायजलऱ होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच ४५ के -६८५२ ही पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोरील रस्ताच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात एल्गार

Image
पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात एल्गार  पनवेल  ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करतांना एल्गार केला. यावेळी माता भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता .                         होऊ द्या चर्चा अंतर्गत तालुक्यातील मोहदर , कुत्तारपाडा, ग्रामपंचायत शिरवली ,चिद्रन येथील ग्रामस्थांशी चर्चा करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला . वाढती महागाई , बेरोजगारी यावर चर्चा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर,उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर,विभागप्रमुख प्रमोद पाटील,युवासेना विभागअधिकारी मनोज कुंभारकर ,युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, शाखाप्रमुख मोहदर एकनाथ शिनारे ,शाखाप्रमुख कुत्तरपाडा बळीराम भोईर, जेष्ठ शिवसैनिक हिरामण भोईर, उपसरपंच सुजित...