Posts

पांगळोली सरपंच व एक सदस्य बिनविरोध जांभूळ पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध आडी महाड खाडी पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध घूम पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध ठाकरोळी पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध कुडगाव पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध नेवरूळ पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध

Image
# पांगळोली सरपंच व एक सदस्य बिनविरोध # जांभूळ पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध # आडी महाड खाडी पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध # घूम पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध ठाकरोळी पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध कुडगाव पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध नेवरूळ पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध

# नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपली # 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता

Image
# नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपली # 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता नवीमुंबई (Panvel) : रायगड मत       नवरात्रीच्या सुरुवातीला झेंडा दाखवून पंतप्रधान मोदी याचे उद्घाटन करतील, असे बोलले जात होते, मात्र मोदी सध्या 4 राज्यांच्या निवडणुकांमुळे मोदींच्या व्यस्त शेड्युलमुळे ते आता पुढे ढकलण्यात आले असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथून या मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्याची शक्यता आहे.       नवी मुंबईतील लोकांना प्रवासाचा सुखद अनुभव देणारी नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता लवकरच त्यांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बेलापूर ते पेंढार हा 11 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे.        मुंबईकरांना 12 वर्षे करावी लागली प्रतीक्षा.. कंत्राटदारांशी संबंधित समस्या, तज्ञांची कमतरता, कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे आणि निध...

पंतप्रधान आवास योजना विभागातील कर्मचारी यांच्या नियुक्तीची चौकशी करून नियुक्ती रद्द करण्याची डॉ.मुनीर तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Image
  पंतप्रधान आवास योजना विभागातील कर्मचारी यांच्या नियुक्तीची चौकशी करून नियुक्ती रद्द करण्याची डॉ.मुनीर तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिकेची एकीकडे भरती प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट कायम करण्यासाठी मनपाने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तर तिसरीकडे गेल्या सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने राब राब राबणाऱ्या इतर कर्मचारी अभियंत्यांना का सेवेत सामावून घेतले जात नाही. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.कंत्राटी असताना सेवेत सामावून घेण्यास मंजुरी तर इतर अस्थायी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हजारो उमेदवारांनी याकरता अर्ज केले आहेत. पनवेल मनपात गेल्या काही वर्षापासून घाम गाळत असणाऱ्या कर्मचा-यांबाबत कोणताही सहानुभूतीपूर्वक विचार महापालिकेकडून झाला नाही. मात्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ...

पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Image
पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही* पनवेल (वार्ताहर): पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागलेल्या आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.  पहिल्या घटनेत तालुक्यातील नांदगाव येथे एक डिझेल टँकरला आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी पनवेल वाहतूक पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दीत नांदगावजवळ असलेल्या कटच्या ठिकाणी डिझेलने भरलेला टॅंकरला आग लागली होती. त्यावेळी डी पॉइंट येथे कर्तव्यावर असलेले पोलिस नाईक संदीप पाटील, पोलिस शिपाई रुपेश ठाकुर, पोलिस नाईक दांडेकर यांना मदतीकरता बोलावले तसेच अग्निशमक आणि पनवेल शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे पथक तसेच अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. तत्पूर्वी टँकरची आग वाढत असल्याने टँकर क्रमांक एम एच ०९ एफ एल ९६२२ मध्ये डिझेल असल्याने पुढील अनर्थ टाळण्याकरता वाहतूक पोलिसांनी अग्निशमक दलाची वाट ...

जयेश शितकर थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक*

Image
जयेश शितकर थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक* म्हसळा-       नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा या स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील मॉडेल स्कूल रा. जि. प. आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ चार प्रकारात आणि वैयक्तिक खेळ बारा प्रकारात तालुका स्तरावर 14 वर्षांखालील मुले, मुली सहभागी झाले होते. यामध्ये मैदानी खेळ थाळी फेक प्रकारात कुमार जयेश उत्तम शितकर यांने 14 वर्षांखालील तीन राऊंड मध्ये थाळी फेक केली असता पहिला राऊंड 20:60 दुसरा राऊंड 17:90 तिसरा राऊंड 18:90 सरासरी मध्ये जयेश शितकर थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे आई, वडील आनंदित असून शाळा व्यवस्थापन समितीने कौतुक केले आहे. विशेष म्हणजे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव आणि मार्गदर्शन, अचुक नियोजन या सर्व बाबींमुळे विद्यार्थी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर झेपावताना दिसत आहेत.जिल्हा स्तरावरील २९ सप्टेंबर २०२३ रोजी रसायनी ता. खालापूर येथे मैदानी स्पर्धा होणार आहेत तेंव्हा म्हसळा तालुक्याचे नेतृत्व थ...

गुरूकूल आरोग्य योगपीठ खरसईचे १८ खेळाडू योगासने खेळात विभाग स्तरावर

Image
गुरूकूल आरोग्य योगपीठ खरसईचे १८ खेळाडू योगासने खेळात विभाग स्तरावर*  म्हसळा -           म्हसळा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचे ओळखले जाणारे खरसई गाव या गावातील नुकत्याच पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा स्तरावर योगासने खेळात चमकदार कामगिरी करून १८ खेळाडूंनी विभाग स्तरावर मजल मारली आहे. योगासने या क्रिडा क्षेत्रात कौशल्याचे संपूर्ण म्हसळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात योगासने खेळाडूंवर कौतुकचा वर्षाव होत आहे.        क्रीडा संकुल रोहा- धाटाव येथे जिल्हा स्तरीय योगासने खेळ पार पडले या खेळात १४ वर्षांखालील कुमार - प्रणय शितकर, किशोर खोत,प्रतिक खोत , सिध्दांत पयेर, उज्वला खोत, जीविका मांदाडकर,नम्रता म्हात्रे, लावण्या शितकर, पुजा खोत, रूतुजा म्हसकर, १७ वर्षांखालील सुरज पाटील , सिध्दी पयेर, मानसी मांदाडकर,, १९ वर्षांखालील - निषा पाटिल, कृतिका पयेर, सेजल माळी,दिव्या खोत , सिध्दी खोत आदी विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर खुप सुंदर नेत्रदीपक कामगिरी करून आज होणाऱ्या जे.बी.एस.पी.संस्थेचे चा.का ठाकूर शै‌क्षणिक संकुल येथे विभाग स्तरीय स्पर्...

वैष्णोवी बिल्डर्स म्हणजे विश्वास, आपल्या स्वप्नातील घर आपली वाट बघत आहे. नवी मुंबई (रायगड मत)

Image
वैष्णोवी बिल्डर्स म्हणजे विश्वास,  आपल्या स्वप्नातील घर आपली वाट बघत आहे. नवी मुंबई (रायगड मत) नवी मुंबई म्हणजे आधुनिक जागतिक शहर बनले आहे. 10 मिनिटावर आंतरराष्ट्रीय विमानतळ आले आहे. सी लिंक चे काम ही पूर्ण झाले आहे. आणि अशातच घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत. आज घर घेतले नही तर भविष्यात घर घेणे फार कठीण जाईल. म्हणूनच सामान्य लोकांना परवडतील अश्या किंमतीमध्ये घेऊन आले आहेत वैष्णवी बिल्डर. गेली ११ वर्षाचा अनुभव बांधकाम क्षेत्रात असुन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ३ नवीन प्रोजेक्ट नवी मुंबई सानपाडा सारसोले l नेरुल l सिवुड शिरवने येथे घेउन येत आहेत. चांगले बांधकाम, क्लिअर टायटल, सर्व सोयी सुविधाने उपलब्ध. तरी आपल्या नातेवाईक मित्र परिवार यांना आपण लवकरात लवकर संपर्क करायला सांगा. एकदा नक्की साईट विझीट करा. होऊ शकते आपल्या स्वप्नातील घर आपली वाट बघत असेल.        वैष्णोवी बिल्डर्स संपर्क : हेमंत ह. नाक्ती मोबाईल : 87797 22904 नवी मुंबई सानपाडा सारसोले l नेरुल l सिवुड शिरवने