Posts

पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात

Image
पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात  पनवेल : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत विजयाची खात्री दिली.  या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर; प्रभाग क्रमांक 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनिता भोईर; प्रभाग क्रमांक 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर; प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यांच्या प्रचारासाठी न्हावे परिसरात रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी मतदारांपर्यत्त पोहचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी सरपंच हरेश्वर म्ह...

जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण

Image
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण  म्हसळा :  जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेत  दिनांक:-29/10/2023 रोजी श्री सद्गुरु एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट दादर मुंबई मार्फत स्वच्छ्ता गृहाचे नूतनकरणासाठी निधी उपलब्ध करून देणारे *मा. श्री सतीश भाई पै यांच्या शुभहस्ते उद्घाटन करणेत आले यावेळी रायगड भूषण पुरस्कृत थोर समाजसेवक श्रीकृष्णा महाडिक तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री महादेव पाटील आणि संचालक श्री दिलीप जी कांबळे आणि मुख्याध्यापक कांबलेकर सर तसेच सुतार सर, कांबळे सर म्हस्के सर आदी उपस्थित होते मा. पाटील साहेबानी पुष्पगुच्छ देवून मान्यवर श्री सतीश पै साहेबांचे आणि कृष्णाजी महाडिक साहेबांचे स्वागत केले यावेळी मान्यवर सतीश साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मान्यता असलेल्या college ला पूनरसंजीवनी देवून कॉलेज चालविणे याची जबाबदारी घेण्याचे आश्वस्त केले आणि 20 वर्ष विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांना एकत्रित महिना 10...

सेंट जोसेफ सिबीएससी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर# विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Image
मोठ्या शाळेचे पोकळ वासे सेंट जोसेफ सिबीएससी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर भाजपा अल्पसंख्यांक सेल चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केली शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार पनवेल रायगड मत  मोठ्या घराचे पोकळ वासे अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे.तोच प्रत्यय मोठे नाव असणाऱ्या खासगी शाळेच्या बाबतीत येत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. रायन इंटरनॅशनल संचलित सेंट जोसेफ सिबीएससी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज चा थक्क करणारा भोंगळ कारभार एका अपघाताच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सानिया अकबर सय्यद या १२वी सायन्सच्या विद्यार्थिनीला गंभीर स्वरूपाची जखम झाल्यानंतर तिच्या पालकांना शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आल्याने या शिक्षण संस्थेच्या क्रियाशीलते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. याबाबत सविस्तर हाकिकत अशी की नुकतीच या शाळेतील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सानिया अकबर सय्यद विद्यार्थिनीला शारीरिक शिक्षण प्रकाराचा फारसा अनुभव नसलेल्या एका शिक्षिकेने चक्क फरशीवर रनिंग करण्यास भाग पाडले. सदर विद्यार्थिनीच्या अस्थमा ( दमा) या व्याधीची तिच्या पालकांनी मुख्याध्यापकांना व संबंध...

# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे

Image
# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे  पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा...

रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन हीचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर.* .......*उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा*

Image
रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन हीचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर.* .......*उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा* रायगड मत श्रीवर्धन प्रतिनिधी (राजू रिकामे) ;       दि.२७ ऑक्टोबर २०२३ रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन याचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले यावेळी उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीच्या स्थलांतरच्या निमित्ताने श्रीवर्धन दौऱ्यावर आले होते. श्रीवर्धन येथे त्यांच्या या दौऱ्यादरम्यान कोकण उन्नती मित्र मंडळ च्या भव्य अशा प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, नरेंद्र मोदी काल शिर्डीच्या दौऱ्यावर आले असताना मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्ये केले पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं ...

# श्रीवर्धन - रायगड मधे आज राजकीय महाभूकंप # शरद पवार आणि Team इंडिया मैदानात # सुनील तटकरे क्लीनबोल्ड होणार का? # श्रीवर्धनमध्ये होणार इंडिया आघाडीची सभा # दुपारी 3 वाजता प्रचाराचा नारळ फुटणार # बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा

Image
 # श्रीवर्धन - रायगड मधे आज राजकीय महाभूकंप  # शरद पवार आणि Team इंडिया मैदानात # सुनील तटकरे क्लीनबोल्ड होणार का?  # श्रीवर्धनमध्ये होणार इंडिया आघाडीची सभा # दुपारी 3 वाजता प्रचाराचा नारळ फुटणार # बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा # माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  श्रीवर्धन (रायगड मत) जितेंद्र नटे        

# आज पंतप्रधान साईबाबांच्या चरणी होणार लीन, करणार अनेक योजनांचे उदघाटन # फोडणार लोकसभाचे नारळ, प्रचाराला सुरुवात... # नवी मुंबई चे उदघाटन कधी करणार? जनता आणि अधिकारी वैतागले. # ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार # कोकणात विकास कधी करणार? रायगड मत : raigadmat.page

Image
# आज पंतप्रधान साईबाबांच्या चरणी होणार लीन, करणार अनेक योजनांचे उदघाटन # फोडणार लोकसभाचे नारळ, प्रचाराला सुरुवात... # नवी मुंबई चे उदघाटन कधी करणार? जनता आणि अधिकारी वैतागले. # ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार # कोकणात विकास कधी करणार? रायगड मत : raigadmat.page मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची उद्घाटने आणि भेटीगाठींना वेग येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन; तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत लाभ दण्यात येणार आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणाचे जलपूजन करून ते कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास मोदी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. साईबाबांच्या समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन...