# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा...