Posts

निकम परमार हॉस्पिटल ने चांगली सेवा द्यावी : डॉ गिरीश गुणे डॉ अनिल परमार हे यशस्वी गव्हर्नर : डॉ गिरीश गुणे पनवेल / प्रतिनिधी

Image
निकम परमार हॉस्पिटल ने चांगली सेवा द्यावी : डॉ गिरीश गुणे डॉ अनिल परमार हे यशस्वी गव्हर्नर : डॉ गिरीश गुणे पनवेल / प्रतिनिधी पंचवीस वर्षांपूर्वी पनवेल सारख्या गावात अद्ययावत आय सी यू हॉस्पिटलडॉ निकम डॉ अनिल परमार या दोन डॉक्टरांनी केली अतिशय चांगली सेवा या पंचवीस वर्षात डॉ निकम आणि डॉ अनिल परमार यांनी आजपर्यंत दिली पुढे हि अशीच रुग्ण सेवा द्यावी असे प्रतिपादन पनवेल चे लोकप्रिय डॉ गिरीश गुणे यांनी निकम परमार हॉस्पिटल च्या पंचविसाव्या वर्धापन दिनी आयोजित संजीवनी हेल्थ कार्ड च्या उदघाटन प्रसंगी केले .  पनवेल मधील डॉ अनिल परमार आणि डॉ निकम यांनी पनवेल मध्ये पंचवीस वर्षांपूर्वी निकम परमार नावाने हॉस्पिटल सुरु केले , पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त निकम परमार हॉस्पिटल व डॉ रणजित माळी यांच्या संकल्पनेतून संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन डॉ गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना डॉ गुणे म्हणाले कि हॉस्पिटल ने आत्तापर्यंत चांगली सेवा दिली आहे आज संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन झाले आहे हे कार्ड जे जे रुग्ण नोंदणी करतील त्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार हॉस्पिटल करणार...

रायगड मध्ये महिला बचत गटाने बनवलेला दिवाळी फराळाचे प्रदर्शन व विक्री. महिला बचत गटांच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणार ------- मंत्री आदिती तटकरे. .श्रीवर्धन

Image
रायगड मध्ये महिला बचत गटाने बनवलेला दिवाळी फराळाचे प्रदर्शन व विक्री. महिला बचत गटांच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणार      ------- मंत्री आदिती तटकरे. .श्रीवर्धन - प्रतिनिधी / राजू रिकामे : रायगड जिल्हातील इंदापूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुका तसेच बोर्ली येथे मा.ना.कु. अदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी, वेगवेगळ्या बचत गटाने दिवाळी निमित्त बनवलेल्या फराळ स्टॉलचे उदघाटन केले. .रायगड जिल्ह्यातील शहरातील व ग्रामीण भागातील छोटे मोठे बचत गटांनी दिवाळी सणा निमित्त दिवाळी फराळाचा, आकर्षक वस्तू, रांगोळी, कंदील व उत्पादित केलेल्या मालाच्या प्रदर्शन व विक्री साठीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. श्रीवर्धन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता दर्जेदार असल्याचे कौतुक अदिती तटकरे यांनी केले. दिवाळीच्या शुभ आगमनाने महिला तसेच बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात विकास कसा होईल, त्याच बरोबर बचत गट संख्...

श्रीवर्धन मध्ये आठ पैकी सश्रीवर्धन मध्ये आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे

Image
श्रीवर्धन मध्ये आठ पैकी सश्रीवर्धन मध्ये आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे  श्रीवर्धन प्रतिनिधी (रायगड मत) राजू रिकामे. श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर चार थेट सरपंचसह एक उपसरपंच तसेच इतर सदस्य निवडीवर दि. ०६ रोजी सोमवारी शिक्कामोर्तब झाला निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकानी गुलाबाची उधळण करून फटक्यांची अतीषबाजी करून विजय जल्लोष साजरा केला. . श्रीवर्धन तालुक्यात एकूण आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. एकूण आठ पैकी तीन ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या होत्या म्हणून उर्वरित पाच ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्षात निवडून झाली. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत पैकी गाणी सरपंच पदी राष्ट्रवादीचे आदित्य कासरुंग, दांडगुरु सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहा महाडिक, बागमांडला उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गट प्रतोष कोलथरकर, हरवित सरपंचपदी राष्ट्रावादीचे इम्तियाज परकार, भरडखोल सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योती काळपाटील, वावे तर्...

भाजपने शेकापआघाडीला चारली पराभवाची धूळ विचुंबे ग्रामपंचायतीत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही भाजप युतीकडे शेकापच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपकडे

Image
भाजपने शेकापआघाडीला चारली पराभवाची धूळ  विचुंबे ग्रामपंचायतीत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही भाजप युतीकडे  शेकापच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपकडे  पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतही भाजप महायुतीने बाजी मारली.   ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील विचुंबे ग्रामपंचायतमध्ये भाजपने शेकापच्या चारीमुंड्याचीत करत सत्ता मिळवली. तालुक्यातील आणखी एक महत्वाची असलेल्या न्हावे ग्रामपंचायतीचा गड लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाधित राहिला. या ठिकाणीही शेकाप युतीचा दारुण पराभव झाला. देवद व मालडुंगे ग्रामपंचायत...

म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व..... एकच जल्लोष Happy दिवाळी रायगड मत Election News

Image
  म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व..... एकच जल्लोष Happy दिवाळी रायगड मत Election News ( म्हसळा प्रतिनिधी) गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या वारळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद सत्ता मिळवली त्याबद्दल म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात येत आहे. महादेव पाटील यांचे विशेष प्रयत्न. अनेक वर्षांपासून वारळ गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करीत होते. मात्र कट्टर गाव वाले असल्यामुळे तेथे वारळ ग्रामपंचायत गड जिंकणे शक्य नव्हते. मात्र आता हा वारळ गावाचा गड राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. याची विशेष चर्चा सध्या रंगत आहे. म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर, ग्राम पंचायतीमध्ये वर्चस्व खासदार सुनिल तटकरे,मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास कामांना जनतेचा कौल. दिलेला आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट वारळ  ची ग्राम पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली." तर वरवठणेचा पराभव जिव्हारी लागला. आहे. आगामी काळ हा इलेक्शन चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत...

कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.... # एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. # वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे. # आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image
# कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.... # एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. # वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे. # आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  रायगड मत / नागपूर रायगड चे खासदार आणि अजित पवार यांचे राईट हॅन्ड सुनील तटकरे रविवारी नागपूरमध्ये होते. पक्षाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुप्रिया सुळे माझ्यावर गेल्या काही दिवसांत सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करत आहेत. ‘एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे.        स...

पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती

Image
पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती  पनवेल (संजय कदम): पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करणे कामे वाहन चालकांना थांबवून नियम पाळणे जसे हेल्मेट वापरणे, सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. हा उपक्रम पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.         दरवर्षी भारतात सुमारे 1.70 लाख अपघाती मृत्यू होतात. जगाच्या एकूण अपघाती मृत्यू पैकी 11% मृत्यू भारतात होतात तर जगाच्या एकूण वाहन संख्येपैकी केवळ दीड टक्के वाहने भारतात आहेत यावरून आपले असे लक्षात येते की आपल्या वाहन वापराच्या तुलनेने अपघाती मृत्यू जास्त आहेत सदर वेळीजनतेने पोलिसंच्या कारवाईच्या भीतीने किंवा दंडाच्या भीतीने नियम न पाळता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नियम पालने गरजेचे आहे असे सांगितले सदर वेळी हेल्मेट वापरणे , सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे 0 डिंक अँड ड्राईव्ह...