Posts

कोळवट ग्रामपंचायतीवर महिला राज राष्ट्रवादीच्या सुवर्णा येलवे सरपंच तर प्रविणा ठोंबरे उपसरपंच निवड .

Image
कोळवट ग्रामपंचायतीवर महिला राज राष्ट्रवादीच्या सुवर्णा येलवे सरपंच तर प्रविणा ठोंबरे उपसरपंच निवड . म्हसळा - रायगड जिल्ह्यातीत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत मध्ये म्हसळा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कोळवट हि ग्रामपंचायत अगदी प्रतिष्ठेची निवडणूक झाली. गेली अनेक वर्षे हि ग्रामपंचायत  शिवसेना पक्षाकडे होती. पाच वर्षांपूर्वी या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक अटीतटीची झाली होती पण 45 मतांनी पराभव राष्ट्रवादी ला स्विकारावा लागला. पण आता झालेल्या निवडणुकीत प्रचंड मतांनी लिड घेत सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुवर्णा सुनील येलवे कोळवट राष्ट्रवादी कडून भरघोस मतांनी विजयी आल्या , उपसरपंच पदासाठी प्रविणा प्रविण ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली. या भागातील मतदार स्वतः बांधवांनी  पुढाकार घेऊन हा अनेक वर्षाचा बदल घडवून आणला. गेली अनेक वर्षे या ग्रामपंचायतीच्या कारभाराला  या भागातील अक्षरशः मतदार कंटाळले होते .शेवटी मतदारांनी मतदान पेटीच्या माध्यमातून आपली इच्छा दाखवून दिली.        या ग्रामपंचायत मध्ये सरपंचसह पाच सदस्य राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत. रायगड जिल्ह्याचे खासदार मा श्...

आजपासून नवी मुंबई मेट्रो ट्रेन सुरु, 'रायगड मत' ने अनेक वेळा मेट्रो सुरु करणे संदर्भात आवाज उठवला होता.

Image
आजपासून नवी मुंबई मेट्रो ट्रेन सुरु, 'रायगड मत' ने अनेक वेळा मेट्रो सुरु करणे संदर्भात आवाज उठवला होता. नवी मुबंई (जितेंद्र नटे)  अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेतली पण तिथले अधिकारी आतमध्ये घुसून देत नव्हते. कारण त्यांना उशीर का होतेय हे विचारल्यावर उत्तर नव्हते. मोठे उदघाटन होणार मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्यामुळे उदघाट्न लांबले. शेवटी अधिकारी सुद्धा वैतागले. पब्लिकचा दबाव, पत्रकार लोकांचा दबाव, अनेक सामाजिक संघटनाचा दबाव आल्यामुळे शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देत मेट्रो सुरु करायला सांगितले आहे.  आज शुक्रवार 17 नोव्हेंबरपासून दुपारी 3 वाजता मेट्रो सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असणार.  तर, शनिवारी, 18 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. मेट्रो 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे.  चला तर 13 वर्षांनी का होईन सुरु होतेय मेट्रो.... अनेक वर्षे बाहेरून काम बघत होते लोक अगदी मीं सुद्धा आज प्रत्यक्ष स्वप्न पूर्ण होणार. सर्वांना हार्दीक शुभेच्या. आमदार तसेच अनेक म...

दिवाळी सणानिमित्त पनवेल तालुका पोलिसांनी शिल आश्रम मधील वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद*

Image
दिवाळी सणानिमित्त पनवेल तालुका पोलिसांनी शिल आश्रम मधील वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद पनवेल (संजय कदम): दिवाळी सणाचे औचित्य साधून तसेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिल आश्रम, वांगणी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देवून, सदर ठिकाणचे आश्रमवासी वृद्ध, दिव्यांग, लहान मुलांसोबत स्नेहभोजन तसेच फराळ आस्वाद तसेच वाटप केले.        यावेळी सहा.पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक( गुन्हे) जगदीश शेलकर, निरीक्षक(वाचक) पृथ्वीराज घोरपडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने सदर आश्रमाच्या व्हीटोने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे याना दीर्घायुष्य लाभावे यासाठी विशेष प्रार्थना सुद्धा करण्यात आली.  फोटो: शिल आश्रम स्नेहभोजन

सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… https://issuu.com/raigadmat/docs/raigad_mat_diwali_2023_udyog_vishes_01b8a27fbd1f0b रायगड मत दिवाळी विशेषांक 2023 सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… - संपादक : जितेंद्र नटे रायगड मत (Raigad Mat) raigadmat.page

Image
https://issuu.com/raigadmat/docs/raigad_mat_diwali_2023_udyog_vishes_01b8a27fbd1f0b रायगड मत दिवाळी विशेषांक 2023 सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… - संपादक : जितेंद्र नटे रायगड मत (Raigad Mat) raigadmat.page   सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील

Image
स्वच्छ गाव स्वच्छ देश या उक्तीप्रमाणे महादेव पाटील आणि त्यांचे ग्रामस्थ यांची गावाकऱ्यांना स्वच्छ दिवाळी भेट... दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील  म्हसळा / रायगड मत  खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो आज दि.10/11/2023 रोजी येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत .गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबव...

ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांची आज आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेशदादा धर्माधिकारी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे आदी उपस्थित होते.

Image
 ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांची आज आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेशदादा धर्माधिकारी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे आदी उपस्थित होते. 

शनिवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'

Image
शनिवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.                 दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे ७ वे वर्ष असून या दिवाळी पहाट मध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायिका सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी अभिषेक पटवर्धन ९०२९५८०३४३, रोहित जगताप ८६९१९३०७०९, अभिषेक भोपी ९८२०७०२०४३ किंवा अक्षय सिंग ९८२०८३८८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे....