Posts

जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल... - निलेश मांदाडकर जल जीवन मिशन योजनेला वाली कोण? म्हसळा (रायगड मत)

Image
जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल... - निलेश मांदाडकर  जल जीवन मिशन योजनेला वाली कोण? म्हसळा (रायगड मत)  देशाचे सन्माननीय पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून "आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना ग्रामीण भागातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यत पिण्याचे पाणी मिळण्यासाठी '"हर घर नळ हर घर जल "'ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्याचे उद्दिष्ट मा. पंतप्रधान यांनी जाहीर केले.    रायगड जिल्यातील अनेक तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजने मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहेत. या योजणांना भरघोष निधी प्राप्त झाल्या संबंधित ऑनलाईन ठेकेदारांच्या नावे काही ठिकाणी मर्जीचे सबठेकेदार तर काही ठिकाणी कर्मचारीच ठेकेदार बनले.    ग्रामसभेला महत्व व जलजीवन मिशन योजना कमेटी ला कागदावरच ठेऊन संबंधित अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने जल जीवन मिशन योजना किमान २५वर्षासाठी इस्टिमेंट मूल्यांकन झालेले असताना सुमार दर्जाचे काम चालू आहेत.   अनेकवेळा कार्यालयात माहिती घेतली असताना उपाभियंता कनिष्ठ अभियंता ते हंगामी कंत्...

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन,रायगड रायगडला"राष्ट्रीय क्लासिक बेंचप्रेस" स्पर्धेत" 3 पदक

Image
"पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन,रायगड रायगडला"राष्ट्रीय क्लासिक बेंचप्रेस" स्पर्धेत" 3 पदक  रायगड मत / क्रीडा न्युज  राष्ट्रीय क्लासिक आणि इक्विप बेंच प्रेस स्पर्धा 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत"बेंगलोर" येथेपार पडल्या.  या मध्ये खुल्या गटातील स्पर्धेत 74 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्य संघातर्फे रायगडचे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अक्षय शनमूगम (आयर्न मेट जिम खोपोली,)यांनी सुवर्णपदक घेऊन नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे.तसेच ज्युनियर स्पर्धेत तन्मय पाटील.(संसारे फिटनेस पेण) यांनी रौप्य पदक पटकाविलेआहे. मास्टर स्पर्धेत 74 किलो वजनी गटात रायगडचे आंतरराष्ट्रीय पदक विजेते मास्टर खेळाडू दिनेश पवार (लोखंडे जिम खोपोली)यांनी कांस्यपदक मिळविले .  या तिन्ही पदक विजेत्या खेळाडूंचे" आणि त्यांचे प्रशिक्षक , जिम संचालक यांचे संघटनेने कौतुक केले आहे. या पदक विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे.   या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री संजय सरदेसाई यांनी बहुमोल मार्...

को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड

Image
  को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड पनवेल : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आणि के व्ही कन्या शाळा समितीच्या चेअरमन पदी शाळेचेच माजी विद्यार्थी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी.विरोधी पक्षनेते .प्रितम जनार्दन म्हात्रे यांची नियुक्ती कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट.सिद्धार्थ संजय पाटील यांनी केली आहे. तशा प्रकारचे नियुक्तीपत्र आज त्यांना देण्यात आले. या अगोदर प्रितम म्हात्रे यांनी शाळेच्या माध्यमिक विभागाचे शाळा समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते अध्यक्ष असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण भागात त्यांच्या स्वतःच्या शाळा सुद्धा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपात शिक्षण सेवा दिली जाते. त्यांनी आजपर्यंत कोकण एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती सदस्य म्हणून केलेले काम आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता त्यांची नियुक्ती करण्यात आली.      विद्यार्थीदशेत शाळेत असताना त्यांची जीएस म्हणून निवड...

माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते पनवेल दौऱ्यावर.

Image
माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते पनवेल दौऱ्यावर. पनवेल/प्रतिनिधी :- मंगळवार दि 5 डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता खारघर येथे बैठकीचे आयोजन केल्याची महिती शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनंत गीते पनवेल,कर्जत, उरण मतदार संघात तील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीत आगामी काळात पक्ष बांधणी व निवडणूक तसेच अनेक महत्वाच्या विषय मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे

खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांच्या वतीने आज दि.२३/११/२०२३ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त गावाचा एसटी पिकअप शेड ची स्वच्छता करण्यात आली

Image
खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांची ग्रामस्वछता अभियान जारीच  म्हसळा : खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांच्या वतीने आज दि.२३/११/२०२३ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त गावाचा एसटी पिकअप शेड ची स्वच्छता करण्यात आली या मंडळाच्या स्वच्छता अभियान निरंतर सुरू असल्याचे पहायला मिळतो आहे या पूर्वी ही या मंडळाने गावातील अनेक रस्ते स्मशानभूमीत, शेतीकडे जाणारे रस्ते यांची स्वच्छता केली होती यापुढेही गावाची स्वच्छता करणार असल्याचे सांगितले आजच्या या स्वच्छता अभियान यशस्वी राबविण्यात श्री महादेव पाटील, श्री चंद्रकांत कांबळे, श्री मंगेश म्हात्रे, श्री मनोहर पाटील, आणि आदिवासी बांधव यांनी सहकार्य केले

आदिती तटकरे राजाच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं

Image
आदिती तटकरे राजाच्या  महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं माणगाव : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा वार शुक्रवार दि.२४ नोव्हे २०२३ रोजी इंग्लिश हायस्कुल जावळी ता माणगाव येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आयोजित केला आहे तरी या संधीचा लाभ स्थानिक तरुण तरुणीनी घ्यावा.  तसेच ज्या तरुणांनी तरुणींनी आणि विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज केला नसेल त्यांना त्याच ठिकाणी त्याचदिवशी ऑफ लाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरल्यानंतर त्याचठिकाणी इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाईल आणि सिलेक्ट झाल्यास लगेच तिथेच नियुक्ती पत्र दिले जाईल  तरी तालुक्यासह मतदारसंघातील 5वी पासून BA पर्यंत आणि MA, Mcom, ITI, Engineer  Dipolma degree झालेल्या तरुणांनी सकाळी ८.३०वाजेपर्यंत जावळी ता माणगाव येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका ...

राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप) स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार. पनवेल / अरुण पाटकर

Image
  राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप)             स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार.            पनवेल / अरुण पाटकर   दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय बेंचप्रेस(क्लासिक व इक्विप) स्पर्धा बेंगलोर कर्नाटक येथे होणार आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघात रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंची निवड विविध गटांसाठी झाली आहे. या राष्ट्रीय "बेंचप्रेस" स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तर्फे सहभागी होणार आहेत. त्याबाबतची यादी सविस्तर खालील प्रमाणे आहे. १) संतोष गावडे.(अलिबाग, सार्व.व्या. शाळा. वाढगाव.Equip ,M1 ,59 kg. गट,स्पर्धा) २) ऋतिक पोळ.(खोपोली, आयर्न मॅट जिम. ज्युनि.12o+गट Equip.) क्लासिक स्पर्धा लिस्ट ----------------------------- १) जय पाटील..( संसारे फिटनेस पेण ,क्लासिक स्पर्धा,सब ज्युनि. 83 किलो गट) ---------------------------- १) तन्मय पाटील. (संसारे फिटनेस , पेण जूनियर क्लासिक स्पर्धा 93kg गट) २) ऋतिक पोळ. (आयर्न मेट जिम, खोपोली ,जूनियर क्लासिक स्पर्...