Posts

प्रामाणिक पत्रकार निलेश सोनावणे यांची पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सहाव्यानंदा पुनर्निवड

Image
प्रामाणिक पत्रकार निलेश सोनावणे यांची पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सहाव्यानंदा पुनर्निवड पनवेल/प्रतिनिधी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी 2024 च्या अध्यक्षपदी सर्वानुमते पनवेल युवा चे संपादक जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली.यावेळी रायगड सम्राट चे संपादक शंकर वायदंडे , फोर के चॅनेल चे संपादक गौरव जहागीरदार ,महाराष्ट्र ०९ चे संपादक रवींद्र गायकवाड, युवक आधार चे संपादक संतोष आमले, नवराष्ट्र चे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे , रायगड टाइम्स चे प्रतिनिधी राम बोरीले , जेष्ठ पत्रकार दिपक महाडिक यांच्यसह समितीचे सदस्य पत्रकार मित्र उपस्तिथ होते निलेश सोनावणे यांची अध्यक्षपदी पुर्ननिवड झाल्याबद्दल लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवून पत्रकारांसाठी सातत्याने उपक्रम राबवणारे निलेश सोनावणे हे अतिशय चांगले काम करीत असल्यानेच त्यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली असून त्यांना लोक...

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे जाणार.

Image
आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे जाणार. अरुण पाटकर / पनवेल   राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू  प्रसिद्ध असलेले रायगडचे कुणाल पिंगळे(लोखंडे जिम,खोपोली) यांची निवड एशियन पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा १०ते१८डिसेंबर२०२३या  कालावधीत बहारू (मलेशिया)या ठिकाणी होणार आहे. 53 किलो वजनी गटाच्या जुनियर स्पर्धेत कुणाल पिंगळे भारत देशातर्फे सहभागी होणार आहेत. त्याबद्दल कुणाल पिंगळे आणि त्याचे जिम संचालक श्री. प्रतीक लोखंडे (खोपोली) यांचे हार्दिक अभिनंदन पॉवर  लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांनी केले आहे.या निवडीसाठीमहाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग  सचिव, आंतरराष्ट्रीय पंच, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री संजय सरदेसाई यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या स्पर्धेसाठी कुणाल पिंगळेआज ०८/१२/२३रोजी मध्यरात्रीनंतर मुंबईहून रवाना होणार आहे. "पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड "चे अध्यक्ष गिरीश वेदक , उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचीन भालेराव, तसेच दत्तात्रेय मोरे, माधव )पंडित, सं...

दारूबंधीचा यलगार छेडणारी रायगड मधील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य ठरल्या - उषा गणपत वारगडा

Image
# दारूबंधीचा यलगार छेडणारी रायगड मधील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य ठरल्या - उषा गणपत वारगडा   # पहिल्याच सभेत, घेतला पहिलाच विषय.. दारु बंद करा, बंद करा!   सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती पनवेल/ प्रतिनिधी @raigadmat.page     मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात आहे, शिवाय या भागामध्ये आदिवासी समाजाची अधिक लोकवस्ती असल्याने तालुक्यात आदिवासी ग्रामपंचयात म्हणून ओळखली जातेय.          या मालडुंगे ग्रामपंचायतमध्ये कोंडीचीवाडी, टावरवाडी, सातीचीवाडी, कोंबलटेकडी, ताडपट्टी, मालडुंगे, धोदाणी, पिंपलवाडी, चिंचवाडी, वाघाचीवाडी, बापदेव, देहरंग, धामणी, हैाशाचीवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र, यातील काही गावांमध्ये दारू विक्री होतांना दिसत आहे. या दारूमुळे अनेक कुटुंबामध्ये भांडण होतात, तर काहीकांची कुटुंबच उध्वस्त होताना ...

दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; ४ गुन्हयांची केली उकल

Image
*दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; ४ गुन्हयांची केली उकल* पनवेल (संजय कदम):  दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या कडून आतापर्यंत ४ गुन्हयांची उकल केली आहे. तसेच जवळपास ९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.                   सिबीडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील अज्ञात आरोपीनी फिर्यादीच्या घरातून २०६ ग्रॅम वजनाचे सोने व १० हजार रू रोख रक्कम असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज दिवसा घरफोडी करून पसार झाले होते. सीबीडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून सुमारे २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत यातील आरोपी निष्पन्न केले व आरोपींचा नाशिक, शिर्डी, सातारा, कोल्हापूर, पुणे व पालघर परिसरात शोध घेवून ते गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना गुजरात सीमेवर अच्छाड ता. तलासरी, जि. पालघर येथून अटक केली आहे. नमूद आरोपींना सदरील गुन्...

रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.* *शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.*

Image
रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.*  शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.*  श्रीवर्धन :  अनेक वर्ष पासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्ग मधे गेली ते आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे. गरीब शेतकरी ची जागा मौजे सकलप स.नं १९/१ ही भूसंपादन करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. आज ही ते मोबदलाची वाट पाहत आहेत. वेळो वेळी अर्जाला केराची टोपली दाखवली गेली अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दिनांक ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे आणि या अर्जाची परत राज्याचे मुख्यमंत्री ...

व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Image
व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल म्हसळा - राजीव नेवासेकर:  म्हसळा- बेलदार वाडी येथील व्यायाम शाळेत २ लोखंडी रॉड व १ लोखंडी बेंच चोरी झाल्याची तक्रार डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यायाम शाळेचे अध्यक्ष शाहिद उकये यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.      त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि,मी शाहीद अब्दुल उकये म्हसळा बेलदार वाडी येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर व्यायामशाळेचे अध्यक्ष म्हणुन गेले 2004 पासून काम करीत आहे. सदर व्यायामशाळेत म्हसळा, नवानगर, म्हसळा शहर, म्हसळा बायपास येथील मुले व्यायाम करण्याकरीता नेहमी येतजात होती. आमची व्यायामशाळा ऑगस्ट-2022 पासुन बंद असुन सदर व्यायामशाळेस आम्ही कुलुप लावुन ठेवलेले होते. सदर व्यायामशाळेत एक रनिंग मशीन, तीन चेस्ट मशिन, चार लोखंडी बेंचेस, 20 डबेल्स, 4 लोखंडी रॉड असे सामान होते.       दि. 02डिसेंबर 2023 रोजी रात्रीचे 03.15 वाजताचे सुमारास सागर चव्हाण याने फोनद्वारे कळविले कि, आज दिनांक-02/12/2023 रोजी रात्रीचे 03.00 वाजताचे सुमारास मी तसेच शरद चव्हाण, भरत चव्हाण, मुनीम ...

८० वर्षाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी डॉ. विक्रम कामत ह्यांनी सुरु केले 'कामत्स लेगसी’ मुंबईकरांसाठी साऊथ इंडियन पदार्थांचा एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव - डॉ. विक्रम कामत

Image
८० वर्षाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी डॉ. विक्रम कामत ह्यांनी सुरु केले 'कामत्स लेगसी’ मुंबईकरांसाठी साऊथ इंडियन पदार्थांचा एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव - डॉ. विक्रम कामत कामत म्हंटल की डोळ्यासमोर लगेच प्रख्यात मराठी हॉटेलिअर डॉ. विठ्ठल कामत आणि त्यांनी सुरु केलेल्या हॉटेल्स, व रेस्टोरंट समोर येतात. हायवे वरून प्रवास करताना सगळ्यात जास्त खात्रीच रेस्टोरंट असेल तर ते म्हणजे कामत रेस्टोरंटच आहे, गेल्या ८० वर्षापासून कामत ह्या उद्योगात सर्वश्रेष्ठ आहे. सर्वात विश्वासार्ह रेस्टॉरंट अशी ओळख झाल्यानंतर हा वारसा अजून पुढे नेण्यासाठी आता डॉ. विक्रम कामत ह्यांनी 'कामत्स लेगसी' ह्या प्रिमिअम डायनिंग रेस्टॉरंट चेनची सुरुवात शहरात सुरु केली आहे. चांगलं, स्वछय आणि चविष्ट म्हणून नेहमी च कामतची ओळख आहे, तीच ओळख अजून पुढे चालवी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना चविष्ट साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेता यावा हेच 'कामत्स लेगसी' मागचे मुख्य उद्देश आहे. डॉ. विक्रम कामत म्हणतात की "प्रत्येकाच्या आयुष्यात अन्नाद्वारे आनंद आणणे हा आमचा प्रयन्त आहे, आणि मला विश्वास आहे की ...