Posts

रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.

Image
  # रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.   रायगड मत / प्रतिनिधी  क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा हैदराबाद येथे "दिनांक 08 ते 12 एप्रिल 2024" या कालावधीत होईल. लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम, बशीर बाग,नेम्पली रेल्वे स्टेशन जवळ ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत150 च्या वर पुरुष आणि 100 चे वर महिला खेळाडू सहभागी होतील असे समजते. महाराष्ट्राच्या संघात रायगडचे बबन बाबू झोरे,59 किलो वजनी गट (वाघेश्वर- कर्जत, जी व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे, 105 किलो वजनी गट (फिटनेस ऑन जिम, तक्का-पनवेल) यांची निवड झाली आहे. त्यांचे निवडीबाबत बबन झोरे यांना जीव्हीआर फिटनेस चे संचालक विनोद येवले (कर्जत)आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार ( फिटनेस ऑन जिम,संचालक, पनवेल) आणि त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे (भांडुप -मुंबई)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंद...

श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते

Image
  श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते  श्रीवर्धन / रायगड मत   मागच्याच निवडणुकित २०१९ ला या सुनिल तटकरेना या रायगड च्या राजकारणातून मी हद्दपार करणार होते . शंभर टक्के हद्दपार करणार होतो परंतू त्यांची हद्दपारी वाचवविली कुणी ? त्यांची हद्दपारी शेकापच्या जयंतभाई पाटलांनी वाचविली आणि हे हद्दपारी करण्याच पाप जयंत भाईनी केले म्हणून त्यांनी जयंतभाई पाटलांच्याच पाटीत खंजीर खुपसला . फक्त त्यांनी जयंत भाईंच्या पाटीत खंजीर खुपसला नव्हे तर ज्यांनी राजकारणात जन्म दिला त्या बॅ ए आर अंतुले साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . त्यानंतर ज्या शरद पवार साहेबांनी मोठ केलं त्या शरद पवार साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . आता नंबर कुणाचा आहे ? असा मार्मिक सवाल त्यांनी केला . मग अशा विश्वास घातक्याला . लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का ? जो कोणाचा झाला नाही तो तुमचा होईल का ? म्हणून आता १९ ची हद्दपारी वाचलेली २०२४ ला अनंत गीते रायगडाच्या राजकारणातून हद्दपार करणार असे जाही...

चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले.

Image
  पनवेल (प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणाची नामांकित संस्था असलेल्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी  ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले. शिक्षणासोबत सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सीकेटी कॉलेज उत्कृष्टपणे काम करीत आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्य बजावत आहेत. आपण ज्या संस्थेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्या महाविद्यालयाच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रतीक ठाकूर व राज पाटील यांनी आपले आर्थिक योगदान दिले. सदरचा धनादेश त्यांनी प्राचार्य एस. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.           प्रतिक भरत ठाकूर यांनी २०१२ मध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवस्थापन अध्ययन (बी.एम. एस.) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करून उद्योजकता क्षेत्रात आपले कार्य आणि कर्तुत्व सिद्ध केले आहे. तर राज पाटील यांनी २०११ मध्ये टीवायबीए (इ...

तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर ; वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी केली दूर

Image
  तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर ; वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी केली दूर पनवेल  / संजय कदम  : तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना पळस्पे बाजू कडून जेएनपीटी बाजूकडे जाणाऱ्या ट्रकमुळे घडली असून यावेळी झालेली वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दूर झाली आहे.                          पळस्पे बाजू कडून जेएनपीटी बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक आर. जे ११ - जे.बी. ८१८२ यामध्ये तुरडाळीचा भुसा भरलेल्या गोण्या होत्या त्यातील काही गोण्या रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबतची माहिती वाहतूक शाखेला मिळताच पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक ढेंबरे, पोलीस शिपाई भोरे, पोलीस शिपाई घोडे आदींचे पथक घटनास्थळी त्वरित पोहचले व त्यांनी सदर चा ट्र्क तसेच रस्त्यावर पडलेल्या गोण्या एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.  फोटो - रस्त्यावर पडलेल्या गोण्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षात बीएमपीचे बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मोठया दिमाखात संपन्न.*

Image
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षात बीएमपीचे बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मोठया दिमाखात संपन्न.   मुंबई / रायगड मत  गुरुवार, दिनांक 21 मार्च २०२४ रोजी दुपारी.३.३० वाजता मुंबई येथील बॅलॉर्ड इस्टेटमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मा.खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस, कोकण प्रभारी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, चंद्रपूरचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला विभागीय अध्यक्षा भावनाताई घाणेकर आणि नवी मुंबई पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष ॲड अरविंद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बामसेफ प्रणित बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.. -- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले

Image
नियमबाह्य पद्धतीने दर्गा तोडण्याची नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना सय्यद अकबर यांनी घेतले फैलावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.. -- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले दर्गा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. महाराष्ट्रात अशी शेकडो उदाहरणे आहेत जिथे हिंदू धर्मियांनी प्रथम संदल आणल्याशिवाय दर्ग्यातील उत्सवांना सुरुवात होत नाही. थोडक्यात येथील उत्सवांमध्ये पहिली पूजा करण्याचा मान हा हिंदू धर्मीय बांधवांचा असतो. मिरज येथील हजरत ख्वाजा शमना मिरा बाबा दर्गा, नागपूर मधील ताजुद्दीन बाबा दर्गा, पनवेल परिसरातील तक्का येथे असणारा जमाल शहा बाबा यांचा दर्गा आणि पनवेलच्या टपाल नाका येथे असणारा हजरत अली सिद्धी बादशहा दर्गा ही अशी काही उदाहरणे आहेत जिथे दर्ग्यात उत्सवाच्या वेळेला प्रथम पूजनाचा मान हा हिंदू धर्मियांचा असतो. मुंबई / प्रतिनिधी          ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे चौक येथे सुमारे ३०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून असणारा हजरत सय्यद बालेशहा दर्गा शरीफ तोडण्याची नोटीस नुकतीच पा...

महाराष्ट्रातील कुणबी, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बहुजन समाज या सर्व समाज बांधवांना जाहीर नम्र आवाहन...

Image
महाराष्ट्रातील कुणबी, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बहुजन समाज या सर्व समाज बांधवांना जाहीर नम्र आवाहन...  रायगड / प्रतिनिधी कुणबी समाजोन्नती, संघ, मुंबई १०३ वर्षे कार्यरत असलेल्या मातृसंस्थेशी सलग्न असलेल्या कुणबी राजकिय संघटन समीतीच्या पुढाकाराने दिनांक २२ एप्रिल 2023 रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई* येथे स्वातंत्र, समता, बंधुभाव आणी सामाजिक न्याय या तत्वांवर आधारीत *बळीराज सेना* या राजकिय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.            बांधवांनो. आज स्वातंत्र प्राप्तीनंतर सर्वच राजकिय पक्षांनी आपला केवळ मतांसाठी वापर केला आहे, जेथे समाजहितासाठी, कल्याणकारी कायदे व योजना आखल्या जातात तेथेच (लोकसभा, विधानसभा ),शेतकरी विरोधी कायदे, शिक्षणाचे खाजगीकरण, जीवघेणी महागाई, ग्यास, डिझेल, पेट्रोल महाग, बेरोजगारी, भ्रष्टाचार, संपूर्ण कोकण सिडको ला देऊन भांडवदारांच्या घशात घालण्याचं धोरण या सर्व बाबींचा विचार करता राजकिय पक्षांनी आम्हाला विचाराने गुलामच बनवले असून चोर, भ्रष्टाचारी, दरोडेखोर, जनतेच्या पैशावर धन दांडगे रुबाब करून वारसा हक्क दाखवत आहेत, ही...