Posts

नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस #कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

Image
  नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर  पनवेल, नवी मुंबई परिसरातील डान्सबारमध्ये चालत असलेला धांगडधिंगा हा सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात गाजत असल्याचे दिसत आहे. या परिसरात तर अनेक डान्सबार मध्ये रात्री उशीरापर्यंत अश्लील व समाजविघातक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आलेले असून येथील डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसत आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 'तीन तेरा' वाजले असल्याची संतप्त प्रतिक्रीया प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संगम, मूड, सेल्फी, बेला, सावली, अक्षय, बेवाच, मनिष, ब्लुस्टार, धनराज, बाबा पॅलेस, मॅग्नेट, सैराट, एस. बी. बार या डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुली दिसून आलेल्या आहेत. बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या या बांग्लादेशीय मुली भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारतीय नागरिकत्वाची बोगस कागदपत्रे मिळवून बेकाय...

रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन

Image
  रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन पनवेल,  (संजय कदम) ः रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या मशिदी ट्रस्टी व मौलाना यांच्या बैठकीत करण्यात आले. रमजान ईद सणानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मस्जिद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रमजान ईद सण हा शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा., सण साजरा करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी., लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने आचारसंहितेचा अधिसूचनाचा भंग/उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला गोपनीय विभागाचे कुंवर, पंकज शिंदे यांच्यासह मशिदी ट्रस्टी व मौलाना आदी उपस्थित होते. फोटो ः पनवेल तालुका पोलीस बैठक

आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च

Image
आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च * श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी / राजू रिकामे  लोकसभा निवडणुक, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी  सण उत्सवा निमीत्त श्रीवर्धन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवार दि.१० श्रीवर्धन शहरातून श्रीवर्धन पोलिसांनी रुट मार्च काढला होता.                   पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक मुघळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती रुट मार्च दरम्यान पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी दिली.                                           ...

सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार # रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत म्हणजे पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्व

Image
  सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार पनवेल / वार्ताहर): पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडको आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगर पालिका त्यांना कायम करण्याच्या मनस्थीतीमध्ये नाही. या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाला रायगड पनवेलने वाचा फोडली त्याबद्दल सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले.             येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची अनेक प्रश्न व मागण्या प्रलंबित आहेत. या संबंधात ते शासनाकडे पाठपुरावा सुद्धा करत आहेत. परंतु शासन दरबारी योग्य न्याय मिळत नाही आहे. याबाबत रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांनी त्यांच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न व मागण्या मांडल्या त्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले आहेत . यावेळी सा. वार्तांकनचे संपादक संतोष सुतार उपस्थित होते. फोटो: संपादक संतोष भगत सत्कार

शहर पोलिसांची धडक कारवाई; ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट

Image
  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल  शहर पोलिसांची धडक कारवाई; ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट पनवेल (संजय कदम) :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय वेनपुरे, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अवैध धंदयावर कारवाई करत ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु नष्ट केली.   पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि (प्रशा) प्रविण भगत, पोउपनि अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार है अवैध धंदयावरील कारवाईकामी पोलीस ठाणे ह‌द्दीत गस्त करित असताना कुंदेवाहळ गावच्या ह‌द्दीतील जंगलात रोशन वास्कर हा दारु विक्रीसाठी माळण्याचा व बनिवण्याचा धंदा करीत असल्याचे माहित पडले. या अनुषंगाने पंचासह जावून सदर ठिकाणी छापा टाकला असता २५० लिटरचे २२ प्लास्टीकचे पूर्ण भरलेले बैरल मध्ये एकूण १,१०,०००/- रु किमतीचे ७५०० लिटर कच्च्या दारुचे नवसाग...

आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे

Image
  आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे पनवेल ः आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू, असे मत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे व रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संयोजक यांना पत्र पाठवलेले आहे त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याचप्रमाणे आगामी विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका यामध्ये उमेदवारी मध्ये आम्हाला जो वाटा देईल त्याच पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन प्रचार करणार आहोत.  या संदर्भात चर्चा करण्याकरता त्यांनी दोन्ही महायुती व महाविकास आघाडीचे संयोजकांना पत्र पाठवलेले आहेत . त्याचप्रमाणे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी पक्षाचे राष्ट्रीय...

रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.

Image
  # रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.   रायगड मत / प्रतिनिधी  क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा हैदराबाद येथे "दिनांक 08 ते 12 एप्रिल 2024" या कालावधीत होईल. लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम, बशीर बाग,नेम्पली रेल्वे स्टेशन जवळ ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत150 च्या वर पुरुष आणि 100 चे वर महिला खेळाडू सहभागी होतील असे समजते. महाराष्ट्राच्या संघात रायगडचे बबन बाबू झोरे,59 किलो वजनी गट (वाघेश्वर- कर्जत, जी व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे, 105 किलो वजनी गट (फिटनेस ऑन जिम, तक्का-पनवेल) यांची निवड झाली आहे. त्यांचे निवडीबाबत बबन झोरे यांना जीव्हीआर फिटनेस चे संचालक विनोद येवले (कर्जत)आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार ( फिटनेस ऑन जिम,संचालक, पनवेल) आणि त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे (भांडुप -मुंबई)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंद...