Posts

मावळचे अधिकृत अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी करंजाडेला भव्य प्रचार सभा # कारंजाडे मध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतं नाही? खासदार करणार मोठी घोषणा

Image
      करंजाडे मध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतं नही? खासदार करणार मोठी घोषणा  मावळचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य प्रचार सभा  पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता करंजाडे येथील सेक्टर ४ मधील टाटा पॅावर जवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे...

मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर पनवेल रायगड मत / प्रतिनिधी

Image
  मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर पनवेल  रायगड मत / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून कामगार नेते शिवाजीराव जाधव हे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजीराव जाधव यांना AIFB व्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष यांच्यासह मावळा संघटना, महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती, क्रांतिसूर्य सोशल फाऊंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाऊंडेशन यांचा पाठिंबा मिळाला असून, या सर्वांच्या सहकार्याने आपण 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलून परिवर्तन घडवून आणू असा विश्वास शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केला. पनवेल येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजीराव जाधव यांनी स्पष्ट केले की त्यांचा लढा हा बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील असमान संधी आणि दुरावस्थेविरोधात असून त्यांच्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक ही निवडणूक नसून एका सर्वव्यापी आंदोलनाची सुरूवात आहे. या आंदोलनात मावळ मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी सर्वशक्तीनिशी स्वतःची ताकद आणि ...

कामोठे वासियांचा पाठिंबा संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळेल - शेकाप नेते प्रमोद भगत यांचे परखड मत

Image
  कामोठे वासियांचा पाठिंबा संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळेल  - शेकाप नेते प्रमोद भगत यांचे परखड मत          सामान्य माणसांचे प्रश्न दिल्लीमध्ये जाऊन मांडण्याची कुवत असणारे संजोग वाघेरे पाटील हेच कामोठेवासीयांची पहिली पसंती ठरतील असे परखड मत शेकाप नेते प्रमोद भगत यांनी मांडले.विद्यमान खासदारांना एक-दोन कार्यक्रमातील उपस्थिती व्यतिरिक्त कामोठेवासीयांनी पाहिलेले नाही. तसेच त्यांनी कामोठेवासीयांचा कुठलाही प्रश्न धसास लावलेला नसल्यामुळे येथील जनतेचा त्यांच्यावर रोष असल्याचे रोखठोक मत प्रमोद भगत यांनी मांडले.         शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रमोद भगत यांनी पनवेल पंचायत समितीचे सभापतीपदी विशेष लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे. त्यानंतर हा भूभाग महानगरपालिकेत अंतर्भूत झाल्यानंतर त्यांनी येथून नगरसेवक पद देखील भूषविले आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा नियोजन मंडळावर त्यांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याची छाप उमटवली आहे. तूर्तास माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा समितीवर ते कार्यरत असून कामोठेवासीयांच्या समस्या स...

शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा स्वाद

Image
  शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा स्वाद पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी पिंपरी येथे दाखल करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातून आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत घरातून आणलेल्या भाजी, भाकरी तसेच मिरचीच्या ठेच्याच्या आस्वाद घेतला. या प्रकाराकडे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेकापच्या राजकीय वर्तुळात प्रीतम म्हात्रे यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून बघितले जात आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते हे पद भूषवताना शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील नव्या-जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विचारांची सांगड घालून प्रीतम म्हात्रे यांची पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. शेकापने आजवर अनेक मोर्चे, आंदोलने केली आहेत. यानिमित्त येणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या नाश्ता, पाण्याची सोय केली जाते. सुकट-भाकरी, मिरचीचा ठेचा असा या वेळी...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ सन्मान

Image
  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ सन्मान पनवेल, दिपाली पारसकर. पुणे येथील शिवाजीनगर जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या ठिकाणी एस एस सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ' *तेजस्विनी महाराष्ट्राची* ' या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. एस एस सिनेव्हीजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला, क्रीडा, शिक्षण, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, उद्योग, आरोग्य, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येतो. जेणेकरून त्यांचा उत्साह वाढवा आणि इतरांनाही त्यातून आदर्श घेता यावा तसेच पुढे काम करण्यासाठी अधिक उत्साह वाढावा या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार *चित्रपट निर्माता लेखक दिग्दर्शक सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद* यांच्या संकल्पनेतून आयोजित केला जातो. यावर्षी तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील १६० महिलांचा सन्मान करण्यात आला. *यामध्ये पनवेल मधील सामाजिक...

Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. # विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. # मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे. # पैशाचा पडणार पाऊस

Image
  # Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.  # विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार.  # एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे.  # मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे. # पैशाचा पडणार पाऊस  रायगड मत / प्रतिनिधी  Election 2024 Update  महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय? देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत. असं असताना Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजित ...

नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस #कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

Image
  नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर  पनवेल, नवी मुंबई परिसरातील डान्सबारमध्ये चालत असलेला धांगडधिंगा हा सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात गाजत असल्याचे दिसत आहे. या परिसरात तर अनेक डान्सबार मध्ये रात्री उशीरापर्यंत अश्लील व समाजविघातक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आलेले असून येथील डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसत आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 'तीन तेरा' वाजले असल्याची संतप्त प्रतिक्रीया प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संगम, मूड, सेल्फी, बेला, सावली, अक्षय, बेवाच, मनिष, ब्लुस्टार, धनराज, बाबा पॅलेस, मॅग्नेट, सैराट, एस. बी. बार या डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुली दिसून आलेल्या आहेत. बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या या बांग्लादेशीय मुली भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारतीय नागरिकत्वाची बोगस कागदपत्रे मिळवून बेकाय...