Posts

# आज कामोठेत कुस्तीच्या दंगल # 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार # एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार

Image
  # आज कामोठेत कुस्तीच्या दंगल  # 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार  # एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२४' या भव्य कुस्त्यांचे जंगी सामने अर्थात कुस्तीच्या दंगली आज शनिवार दिनांक १८ मे रोजी सायंकाळी ०४ वाजता कामोठे येथील सेक्टर ११ मधील नालंदा बुद्धविहाराच्या जवळील मैदानावर होणार आहेत.           या जंगी सामन्यांचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस आणि सचिव हिंदकेसरी पै. योगेश दोडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश ...

मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा

Image
  मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा  मुंबई @ News81 रायगड मत  महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी नुकतीच जबरदस्त सभा झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवंत असेपर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद होता मात्र ते गेल्यानंतर संघटनेत मतलबी वारे वाहू लागले. मात्र आता दोन वर्षात महायुती सरकारने केलेली लोकोपयोगी कामं आणि १० वर्षे मोदी सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहे, लोकं कामाला मते देतात, विकासाला मते देतात, रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्याला मते देतात. जे घरी बसून काम करतात त्यांना लोक कायमचे घरी बसवतात ही मुंबई आणि महाराष्ट्राची परंपरा आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवावे असे आवाहन याप्रसंगी स्थानिक मतदारांना केले....

# पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद पनवेल@रायगड मत

Image
  # पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद  पनवेल@रायगड मत  मावळ लोकसभेचे आज मतदान होत आहे.या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो.. स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास शामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री-पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सकाळी मतदान करून प्रथम आलेल्या ५१ महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या ५१ पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले.आज सकाळी हे दुकान ७ वाजता उघडण्यात आले होते.फक्त प्रथम येणाऱ्या ५१ जणांनाच ऑफर असल्याने नंबर लागण्यासाठी स्त्री-पुरुष मतदारांची धावाधाव झाली. ज्यांचा नंबर लागला नाही ते मात्र नाराज झाले. आज मतदान करून आलेल्या मतदारांमध्ये उत्साह होता.हे राष्ट्रीय काम असून आपली ती बांधिलकी आहे.स्त्री-पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी,मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास शामकुमारतर्फे मतदा...

# 32 - रायगड लोकसभा मतदार संघामध्ये 10 हजार लोकांनी मतदानावर का बहिष्कार टाकला? # अनंत गीते 6वेळा खासदार तर सुनील तटकरे 1वेळा खासदार # 33 - मावळ मतदार संघामध्ये कोण बहिष्कार टाकणार? # मतदार नाराज का आहेत? # धरणातील पाणी नवी मुबंईला जोडणार आहे? यामध्ये पैसे कुणी खाल्ले # 13 वर्षे रखडला प्रश्न, ग्रामस्थ परेशान # याचाच परिणाम पनवेल उरण मधे तर होणार नाही ना? # 33- मावळ मतदार संघामध्ये 13 मे सोमवारी मतदान आहे. जनता कुणाच्या बाजूने? हा सद्या एकच प्रश्न भेडसावत आहे. लोक नाराज आहेत. # कुणाची लाट कि पडणार खाट # एकीकडे बारणे विकास कामे करत आहेत, तर दुसरीकडे मात्र भावनेची लाट दाखवत आहेत? # कोण जिंकणार महाविकास आघाडी कि महायुती? पनवेल @ News81रायगड मत संपादक - जितेंद्र नटे

Image
  # 32 - रायगड लोकसभा मतदार संघामध्ये 10 हजार लोकांनी मतदानावर का बहिष्कार टाकला?  # लाज वाटली पाहिजे अनंत गीते 6वेळा खासदार तर सुनील तटकरे 1वेळा खासदार  # 33 - मावळ मतदार संघामध्ये कोण बहिष्कार टाकणार? # मतदार नाराज का आहेत? # धरणातील पाणी नवी मुबंईला जोडणार आहे? यामध्ये पैसे कुणी खाल्ले  # 13 वर्षे रखडला प्रश्न, ग्रामस्थ परेशान  # याचाच परिणाम पनवेल उरण मधे तर होणार नाही ना? # 33- मावळ मतदार संघामध्ये 13 मे सोमवारी मतदान आहे. जनता कुणाच्या बाजूने? हा सद्या एकच प्रश्न भेडसावत आहे. लोक नाराज आहेत.  # कुणाची लाट कि पडणार खाट  # एकीकडे बारणे विकास कामे करत आहेत, तर दुसरीकडे मात्र भावनेची लाट दाखवत आहेत? # कोण जिंकणार महाविकास आघाडी कि महायुती? पनवेल @ News81रायगड मत  संपादक - जितेंद्र नटे  "पेण येथील बाळगंगा धरणग्रस्तांना अनेक समस्‍या भेडसावत आहेत. सरकारकडून त्‍यांना कोणताच निधी येत नसल्याने या विभागातील रस्ते व इतर सुविधा अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. मात्र केंद्र शासनाने बाळगंगा धरण आणि कोंढाणा धरण प्रकल्पाकरिता २५४ कोटी रुपये निधी दिल्‍याच...

संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने केले मतदारांसमवेत मॉर्निंग वॉक

Image
  संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग  मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने केले मतदारांसमवेत मॉर्निंग वॉक   पनवेल / रायगड मत  ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रियपणाबद्दल नाराजीचा सूर हा यत्र तत्र सर्वत्र असा उमटत आहे. आता हवा खासदार नवा! अशी जनभावना मावळ लोकसभा मतदारसंघात उमटत आहे. मंगळवार दिनांक ७ मे रोजी याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशालीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती मतदारांना करत असताना एकूणच विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली.            ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८९ पनवेल विधानसभा क्षेत्र निर्णायक समजले जाते. या ठिकाणी सत्ता सोपानावर झुलणाऱ्यांनी जनतेला गृहीत धरले ...

पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत

Image
  पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत  भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत पनवेल / प्रतिनिधी.        महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दिनांक ६ मे रोजी खारघर येथे भव्य सभा झाली. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी प्रथम गुलाब पुष्पांनी गुंफलेला सुंदर हार त्यांच्या गळ्यात घातला,नंतर भरजरी शाल आणि पुणेरी पगडी प्रदान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. फडणवीस साहेबांनी त्वरित पगडी परिधान करत सय्यद अकबर यांनी केलेल्या शानदार स्वागताचा स्वीकार केला.              त्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सय्यद अकबर म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासात पाच वर्षाचा कार्यकाळ प...

# राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी जाहीर # मुनीर तांबोळी यांच्या जन संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय

Image
  # राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी जाहीर  # मुनीर तांबोळी यांच्या जन संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय  पनवेल/प्रतिनिधी  - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मान्यतेने पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी घोषित केली.     डॉ.मुनीर तांबोळी यांची पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून पनवेल विधानसभा हद्दीत अनेक तरुणांचा, महिलांचा पक्षात प्रवेश झाला.संघटना जोमाने वाढत आहे.असे यावेळी बोलताना पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले. डॉ.तांबोळी यांनी प्रवेश केल्यापासून पनवेल भागात पक्षाला चांगली ताकत मिळाली आहे.अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे.कामोठे येथे लवकरच पतपेढी सुरू करण्याचा मानस असल्याचे देखील सतीश पाटील म्हणाले.पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जोरात सुरू आहे.असे ही ते म्हणाले.   यावेळी पनवेल विधानसभा उपाध्यक्ष पदी संजोगिता परदेशी, सरचिटणीस पद...