Posts

लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल

Image
  लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल मुंबई / जितेंद्र नटे  लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल कोण किती जागा जिंकणार?  # एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीला किती मतदारसंघात विजय मिळेल? वाचा.... लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल # मुंबई उत्तर पश्चिम  अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) - विजय  रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) - पराजय  # मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) - विजय  मिहीर कोटेचा (भाजप) - पराजय  # मुंबई उत्तर मध्य  वर्षा गायकवाड (काँग्रेस) - विजय  उज्ज्वल निकम (भाजप) - पराजय  # मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) - विजय  राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - पराजय  #  मुंबई दक्षिण  अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) - विजय  यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराजय  #  मुंबई उत्तर   पियुष गोयल (भाजप) - विजय  भूषण पाटील (काँग्रेस) - पराजय  #  रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे (भाजप) - विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) - पराजय  ...

एमजीएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, कामोठे, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेल एसटी डेपो येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली पनवेल/रायगड मत

Image
  एमजीएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, कामोठे, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेल एसटी डेपो येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली पनवेल/रायगड मत  सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट आणि तंबाखू सेसेशन सेंटर (TCC), एमजीएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, कामोठे, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेल एसटी डेपो येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली काढली. जागतिक तंबाखूविरोधी दिन, दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो, तंबाखूच्या वापराच्या हानिकारक प्रभावांची आठवण करून देतो आणि जागतिक स्तरावर तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी धोरणांचे समर्थन करतो.         जागतिक तंबाखू विरोधी दिनाने तंबाखूच्या वापराच्या आरोग्य धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि तंबाखूच्या सेवनाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकार, आरोग्य संस्था आणि समुदायांना एकत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अनेक देशांमध्ये धूम्रपानाच्या दरात लक्षणीय घट करण्यात योगदान दिले आहे आणि धूम्रपान करणाऱ्यांना धूम्...

जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेच्या प.पां. मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूलचा 100% निकाल

Image
  जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेच्या प.पां. मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूलचा 100% निकाल " सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम"  "सलग सहाव्या वर्षीही परंपरा कायम   पनवेल :  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2023-24 वर्षाचा एकूण निकाल सलग सहाव्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सृष्टी किरण पाटीलने 96.00% गुण मिळवून संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला, कुमार  हर्ष केशव ठाकूर 86.60% गुण मिळवून शाळेत द्वितीय  तसेच कुमार विघ्नेश अजित 86.00% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.           शाळेच्या एकूण निकालामध्ये 65 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 44 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माननीय श्री.जे.एम.म्हात्रे(भाऊ),संस् थेचे अध्यक्ष माननीय श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, संस्थेचे सचिव माननीय श्री.जे.के मढवी सर, शाळा समितीचे चेअरमन श्री.चंद्रक...

# राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला # कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

Image
  # राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला # कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव उरण @रायगड मत  उरण येथे नुकताच कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना भरघोष वेतन वाढ़ करून देण्यात आली. कामगार नेते संतोष घरत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या ने...

# आज कामोठेत कुस्तीच्या दंगल # 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार # एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार

Image
  # आज कामोठेत कुस्तीच्या दंगल  # 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार  # एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२४' या भव्य कुस्त्यांचे जंगी सामने अर्थात कुस्तीच्या दंगली आज शनिवार दिनांक १८ मे रोजी सायंकाळी ०४ वाजता कामोठे येथील सेक्टर ११ मधील नालंदा बुद्धविहाराच्या जवळील मैदानावर होणार आहेत.           या जंगी सामन्यांचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस आणि सचिव हिंदकेसरी पै. योगेश दोडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश ...

मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा

Image
  मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा  मुंबई @ News81 रायगड मत  महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी नुकतीच जबरदस्त सभा झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवंत असेपर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद होता मात्र ते गेल्यानंतर संघटनेत मतलबी वारे वाहू लागले. मात्र आता दोन वर्षात महायुती सरकारने केलेली लोकोपयोगी कामं आणि १० वर्षे मोदी सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहे, लोकं कामाला मते देतात, विकासाला मते देतात, रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्याला मते देतात. जे घरी बसून काम करतात त्यांना लोक कायमचे घरी बसवतात ही मुंबई आणि महाराष्ट्राची परंपरा आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवावे असे आवाहन याप्रसंगी स्थानिक मतदारांना केले....

# पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद पनवेल@रायगड मत

Image
  # पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद  पनवेल@रायगड मत  मावळ लोकसभेचे आज मतदान होत आहे.या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो.. स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास शामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री-पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सकाळी मतदान करून प्रथम आलेल्या ५१ महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या ५१ पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले.आज सकाळी हे दुकान ७ वाजता उघडण्यात आले होते.फक्त प्रथम येणाऱ्या ५१ जणांनाच ऑफर असल्याने नंबर लागण्यासाठी स्त्री-पुरुष मतदारांची धावाधाव झाली. ज्यांचा नंबर लागला नाही ते मात्र नाराज झाले. आज मतदान करून आलेल्या मतदारांमध्ये उत्साह होता.हे राष्ट्रीय काम असून आपली ती बांधिलकी आहे.स्त्री-पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी,मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास शामकुमारतर्फे मतदा...