Posts

राष्ट्रवादी कडून संतोष घरत उरणमध्ये इच्छुक उमेदवार# उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

Image
  उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता  उरण /विठ्ठल ममताबादे  विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आता प्रचाराला तिकिटासाठी धावपळ करायला वेग येणार उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलय महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत काय चाललंय कोणत्या जागांवर रस्सीखेच सुरू आहे याबाबत उरण विधानसभा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे या चालू असलेल्या चर्चे मध्ये पूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. जो तो आमच्याच पक्षाचा उमेदवार उमेदवारी करणार असल्याची शंभर टक्के खात्री देत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिराच केली असून त्यांनी गाव,बूथनिहाय बैठाका सुरुही केल्या आहेत.त्यातच महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षातून प्रीतम म्हात्रे यांनी तर पायाला भिंगरी लावून नवरात्री उत्सवात उरण विधानसभा पिंजून काढला. मोठमोठे बॅनर तर जयंत पाटील शेतकरी कामगार ...

पुण्यातील दारुड्या पर्यटकांचा दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे हैदोस ! # रूमच्या भाड्यावरून झाला वाद, वादात महिलेला गाडीखाली चिरडून दारुडे पर्यटक फरार.

Image
पुण्यातील दारुड्या पर्यटकांचा दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे हैदोस !                                                                रूमच्या भाड्यावरून झाला वाद, वादात महिलेला गाडीखाली चिरडून दारुडे पर्यटक फरार. श्रीवर्धन (राजू रिकामे ) : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्या मधील हरिहरेश्वर हया पर्यटन स्थळी आलेल्या पुण्यातील दारुड्या पर्यटकांकडून हॉटेलच्या रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला मारहाण करण्याच्या प्रयत्नात त्याला वाचवणाऱ्या बहिणीला दारुड्या पर्यटकांनी गाडीखाली चिडून मारण्याचा धक्कादायक प्रकार काल मध्यरात्री दोनच्या सुमारास हरिहरेश्वर येथे घडला असून दारुडे पर्यटक गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यातील एक जण ग्रामस्थांच्या हाती लागल्याने दारुड्या पर्यटकांना शोधण्यासाठी रायगड पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्याती...

# डायमंड मार्केट वर मंदीचे सावट # हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड # रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही? # कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही? # कोकणात इंडस्ट्री MIDC मोठे कारखाने नाहीत त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत. # कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. # कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार # प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला

Image
  # डायमंड मार्केट वर मंदीचे सावट  # हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड  # रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही? # कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही? # कोकणात इंडस्ट्री, MIDC, मोठे कारखाने नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत.  # कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. # कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार  # प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला. मुंबई : गेल्या दोन वर्षांत हि-याच्या किंमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या असून यामध्ये तयार हिं-यांची किंमत ३ वर्षांत ३५% कमी झाली आहे. म्हणजेच एकेकाळी १ लाख किमतीवाल्या हि-यांची किंमत घटून ६५-७० हजार झाली आहे. कच्च्या हि-यांच्या किंमती २५% पर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापा-यांना १०% पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे...

बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू - आदिती वरदा सुनील तटकरे

Image
  बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू - आदिती वरदा सुनील तटकरे मुंबई /प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळ अदानी फाउंडेशनच्या मदतीने बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दोन्ही संस्थांमध्ये आज मंत्रालयात करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांना व्यवसायासाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळणार आहे. याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती होण्यासही मोठी मदत होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अहिंसा नगर, मालाड येथे जागाही देण्यात आली असून, महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत बहुमोल योगदान दिल्याबद्दल अदानी फाउंडेशन व मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार. यावेळी महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे, अदानी फाउंडेशनचे शनय शाह त्यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी 288 जागा वाटप -काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288# 32) रायगड जिल्हा # ठाकरे गट (शिवसेना) - महाड, कर्जत, पेण # शरद पवार (राष्ट्रवादी) - श्रीवर्धन # शेकाप - उरण, पनवेल, अलिबाग

Image
  32) रायगड जिल्हा # ठाकरे गट (शिवसेना) - महाड,  कर्जत, पेण  # शरद पवार (राष्ट्रवादी) - श्रीवर्धन  # शेकाप - उरण, पनवेल, अलिबाग महाविकास आघाडी 288 जागा वाटप - काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर  काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा  (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण  5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला...

# महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल # आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू

Image
  # महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल  # आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू  मुंबई: ज्याची आतुरतेने वाट बघत होते मतदार ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होणार. महाराष्ट्रात किती मतदार? • महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार • महिला मतदार - ४.६६ कोटी • पुरुष मतदार - ४.९७ कोटी • युवा मतदार - १.८५ कोटी • नव मतदार - २०.९३ लाख राज्यातील मतदान केंद्रांची माहिती • महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र • शहरी मतदान केंद्र - ४२, ६०४ • ग्रामीण मतदान केंद्र - ५७,५८२ • महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - ३८८ • नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - २९९ प्रचार तोफा कधी थंडावणार? निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. ...

रायगड मत - संपादकीय : # भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात... # आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली. # सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे. # उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट

Image
  रायगड मत - संपादकीय  संपादक - जितेंद्र नटे  raigamat.page # भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात... # आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली. # सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे. # उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट  लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. लोकसभा इलेक्शनला शेका...