Posts

# उरणमध्ये शिट्टीची हवा, प्रितमदादाच आमदार हवा # "शेकाप चिटणीस विकास नाईक यांचे मतदाराना आवाहन"

Image
  # उरणमध्ये शिट्टीची हवा, प्रितमदादाच आमदार हवा # "शेकाप चिटणीस विकास नाईक यांचे मतदाराना आवाहन"  उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल व  खालापूर या तिन्ही तालुक्यातील प्रचारात शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व प्रीतम जे एम म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण उरण मतदारसंघात प्रीतमदादा यांची निशाणी असलेल्या शिट्टीची हवा निर्माण झाली आहे. तर मतदारसंघातील जनतेला आता शिट्टीची हवा,प्रीतमदादाच आमदार हवा असे चित्र निर्माण झाले असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत उरण, पनवेल आणि खालापूर मधील मतदारांनी प्रीतमदादा म्हात्रे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे.        विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. प्रचार संपायला अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला अधिक वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन शिट्टी निशाणीचा प्रचार करीत आहेत. या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुण शिट्टी गळ्यात अडकव...

उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रितम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार, "प्रितम दादांना तरुणांचा वाढता पाठिंबा"

Image
  उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रितम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार, "प्रितम दादांना तरुणांचा वाढता पाठिंबा"     उरण : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे लढाऊ युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चाणजे,नवघर,जासई व कोप्रोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. त्यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढ झाली आहे. यात उरण तालुक्यातील तरुण सक्रिय झाले आहेत. आता आम्हाला आमच्या हक्काचा भूमिपुत्रांना न्याय देणारा प्रीतमदादाच्या रूपाने आमदार हवा आहे. आशा प्रतिक्रिया तरुणांकडून व्यक्त केली जात आहे.          उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटातील अनेक गावातून तरुण आणि युवा मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील चित्रच बदलल आहे. समाजात सर्वसामान्य नागरिकांना सर्वतोपरी सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर असलेले प्रीतमदादा यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याने भारावून शेकडो तरुण गावोगावातील प्रचारात सक्रिय झाले आहेत. आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक 5000 पेक्षा जा...

# अदिती तटकरे यांनी म्हसळ्यात उडवला प्रचाराचा धुरळा # तब्बल १६ गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांना भेटून जाणून घेतल्या समस्या, ग्रामस्थांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा # लाडक्या बहिणींना आता 1500/- नव्हे तर मिळणार पुढे 2100/- रु. म्हणजे वर्षाला चक्क 25,200/- रु.

Image
  # अदिती तटकरे यांनी म्हसळ्यात उडवला प्रचाराचा धुरळा  # तब्बल १६ गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांना भेटून जाणून घेतल्या समस्या, ग्रामस्थांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा # लाडक्या बहिणींना आता 1500/- नव्हे तर मिळणार पुढे 2100/- रु. म्हणजे वर्षाला चक्क 25,200/- रु. म्हसळा / जितेंद्र नटे  मतदानाला काही दिवस उरले आहेत. जसे जसे दिवस कमी होत आहेत तस तसें वातावरण तापत आहे. अगोदर पासूनच अदिती तटकरे यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाव वाडीत स्वागतच होत आहे. असा कुठला गाव नाही, असा कुठला समाज नाही जिथे सुनिल तटकरे साहेबांचे काम नाही. प्रत्येक गाव वस्तीवर एकतरी काम आहेच. म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अदिती तटकरे नी सुद्धा लोकांना आपले पणाच्या प्रेमळ स्वभावामुळे जवळ केले आहे, किंबहुना त्या लोकांना आपल्या कुटूंबातीलच वाटतात. एकीकडे त्यांचा प्रचाराचा जोर वाढलेला दिसतो आहे मात्र विरोधक कुठे फिरताना दिसत नाहीत.  आज १९३ श्रीवर्धन मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना,भाजप युतीच्या लाडक्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या न...

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

Image
  लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा पनवेल दि. ०८ (संजय कदम) : पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वस्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, गेली 15 वर्षे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आमदार प्रशांत ठाकूर यांना लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान (महाराष्ट्र शासन नोंदणीकृत) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय अनुसया राजाराम सोनावणे यांच्या आदेशाने जाहीर पाठिंबा देत आहोत. या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत आमूलाग्र बदल होत आहे. विकसित, प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करताना आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेलचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहताना मतदारसंघात अनेक विकासकामे त्यांच्या दूरदृष्टीने होत आहेत. या मतदारसंघाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद व्हावा म्हणून आम्ही या पत्राद्वारे त्यांना जा...

आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयाचा आशिर्वाद; ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात भरभरून स्वागत

Image
  आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयाचा आशिर्वाद; ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात भरभरून स्वागत  पनवेल (प्रतिनिधी) पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कतृत्वत्वान नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा विजयासाठी सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने त्यांचा प्रचार करत असून मतदारांचा विजयाचा आर्शिवाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत आहे.            पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावात प्रचार सुरु आहे. त्यानुसार मतदार संघातील नागझरी, ढोंगऱ्याचा पाडा, पाले खुर्द, देविचापाडा, तोंडरे,  पडघे, नावडे गाव, नावडे कॉलनी, खिडूकपाडा, टेंभोडे आणि वळवली गावात महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांचे रांगोळी  काढून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसचे ज्येष्ठांनी त्यांना विजयाचा आर्शिवाद दिला.युवकांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत परिस...

लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा' ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत

Image
  ' लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा' ;  लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत   पनवेल (प्रतिनिधी) राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ लाखहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात आमदार प्रशांत ठाकूर' यांना आशिर्वाद देण्यासाठी लाडक्या माता-बहिणी सरसावल्या असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.           १८८ पनवेल विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील...

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपात

Image
  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपात  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ०६) भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आणि भाजप परिवारामध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.           कामोठे मध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पनवेल जिल्हा पदवीधर मतदार संघाचे सचिव तुषार सांळुंखे यांच्यासह सनी वगाडे, किरण भगत, राजाराम वनकर, हरिश्चंद्र घाग, अमित सोनावणे, सचिन पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठनेते वाय.टी. देशमुख, कामोठे मंडळ अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, युवानेते हॅप्पी सिंग, समाजसेवक प्रदीप भगत, युवा नेते हर्षवर्धन पाटील, हरजींदर कौर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.