Posts

मनोहर इलेट्रॉनिक्स आणि फर्निचर - नाते विश्वासाचे, नाते माणूसकीचे, नाते क्वालिटीचे...# दिवाळी डिस्काउंट ऑफर चालू आहे....

Image
नाते विश्वासाचे, नाते माणूसकीचे, नाते क्वालिटीचे... म्हसळ्यात  मनोहर इलेट्रॉनिक्स आणि फर्निचर दिवाळी डिस्काउंट ऑफर चालू आहे.... म्हसळा (जितेंद्र नटे) :        म्हसळा शहरात दिघीरोडकडे जाणा-या रस्त्याकडे नुकतेच मनोहर इलेट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान आहे. म्हसळा तालुक्यातील नागरीकांना क्वालिटी आणि दर्जेदार वस्तूंची गेले अनेक दिवसांपासून अपेक्षा होती आणि ती पूर्ण करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मनोहर इलेट्रॉनिक्स आणि फर्निचर. मोबाईल, एसी., फ्रिज, फंखे, बॅटऱ्या तसेच अन्य इलेक्टोनिक्स वस्तू तेही अगदी स्वस्त किंमतीत दिल्या जात आहेत. म्हसळ्याच्या नागरिंकां येत्या दिवाळीत जर फोन घ्यायचा असेल किंवा अन्य वस्तूइलेक्टोनिक्स घ्यायच्या असतील तर शेठ गांधी यांचे मनोहर इलेक्टोनिक्स आणि फर्निचर चे दुकान गाठा. फर्निचरसाठी तर विचारूच नका. याठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटी आणि डिझाईन्सचे फर्निचर उपलब्ध आहेत. लाकडी तसेच प्लास्टिकच्या खुर्च्या, पलंग, सोफा, बेड, होम अप्लायन्स, घरगुती लागणा-या सर्व वस्तू या एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे आणि स्वस्त असल्यामुळे नागरिकांची येथे झुंबड उडत आहे.  ...

म्हसळ्यात कदम फर्निचरला रात्री २ वाजता लागली आग ### आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काहीही व्यवस्था नाही?

Image
म्हसळा तालुक्यात कदम फर्निचर ला रात्री २ वाजता लागली आग आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काही(ही) व्यवस्था नाही.  लवकरच या विषयी जनआंदोलन छेडण्यासाठी स्थानिक जनता एकत्र येऊन आंदोलन छेडणार आहेत असे समजते आहे. या साठी लवकरच "स्थानिक संरक्षण संघटने"ची स्थापना करु या अशी भावना "रायगड मत" कडे अनेक स्थानिक लोकांनी बोलून दाखवत आहेत आणि त्याचे नेतृत्व "रायगड मत" ने करावे अशी काही लोकांनी इच्छा व्यक्त केली. म्हसळा (प्रतिनिधी) @ रायगड मत         म्हसळा दिघी रोड येथे कदम फर्निचर म्हणून दुकान आहे. लाकडापासून अनेक वस्तूं तयार करण्याचे एकमेव ठिकाण आहे. मात्र रात्री अचानक २ वाजता धूर येताना दिसू लागले. लागलीच येथील तै बा कॅटरर्स चे मालक श्री. नईम दळवी धावून गेले. त्यांच्या सॊबत इर्शाद भाई तांबे, जुनेद खान, शरीफ काका बाबु खान, सोनू अली फोऊझन दामाद, आसिफ अली, कॉन्स्टेबल आर जी राठोड, वि के सुंदर आणि खराटे हेही मदतीला धावून आले. या सर्व लोकांनी मदत करून ताबडतोब आग भडकण्यापासून वाचवली मात्र त्याअगोदरच लाकडी बरेच वस्तू जळुन खाक झाल्या होत्या. वरील मदतगार आग रोखावयास रात्री...

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

Image
वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट  म्हसळा (प्रतिनिधी)@रायगड मत            म्हसळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे वाडांबा गाव. सामाजिक, शैक्षणिक कार्यात या गावचे म्हसळ्यात नेहमीच योगदान राहिले आहे. अत्यंत खडतर परिश्रम करणारे इथले ग्रामस्थ. याच गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव यशवंत महाडिक होय. आपल्या कुटुंबासाठी डोंबिवली येथे नोकरी करून गुजराना करणारे महादेव महाडिक यांनी आपल्या मुलीला वकील बनण्यास सांगितले. लेकीने आपल्या पित्याची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत वकिलीची "एल.एल.बी" परिक्षा उत्तीर्ण केली. वाडांबा गावाचे नाव रोशन केल्यामुळे पित्याच्या डोळ्यात आनंदाआश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. कुमारी स्नेहल महादेव महाडिक हिने अथक प्रयत्नाने व जिद्दीने एल.एल.बी परिक्षा उत्तीर्ण करून गावाचे,तालुक्याचे आणि सर्वात मोठे परिवाराचे नाव उत्कृष्ट केल्याबद्दल सर्वच स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेक लोक  तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देत आहेत. भविष्यात ...

श्रीवर्धन ओ बी सी संघर्ष समन्वय समितीचे संविधानिक न्याय मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन 

Image
श्रीवर्धन ओ बी सी संघर्ष समन्वय समितीचे संविधानिक न्याय मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन  श्रीवर्धन (राजू रिकामे)        अनेक वर्षांपासून प्रलंबित  असलेले ओबीसी प्रश्नं सोडवावेत अन्यता "एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी" महामोर्च्या निघेल. ओबीसी, विमुक्त, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून राज्यसरकारने याकडे दुर्लक्ष केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधीत उद्धभवलेल्या परिस्थिती पाहता ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विध्यार्थी, परीक्षार्थी व सरळसेवा भरती प्रक्रियांवर होणाऱ्या परिणाम पाहता राज्यशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातीलविविध संघटनांच्या वतीने आज तहसीलदार यांकडे निवेदन देण्यात आले.

म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा भाजप मध्ये प्रवेश # भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी भाजप वाढवली # म्हसळ्यात भाजपचा नगराध्यक्ष होणार ?

Image
म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा भाजप मध्ये प्रवेश भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी भाजप वाढवली म्हसळ्यात भाजपचा नगराध्यक्ष होणार ? म्हसळा (प्रतिनिधी) @raigadmat.page         म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा आज भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार श्री प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड श्री महेश मोहित  यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे पक्ष प्रवेश करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक भाजपा नेते श्री कृष्णा कोबनाक, तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर, सरचिटणीस श्री महेश पाटील, सरचिटणीस श्री सुनील शिंदे, चिटणीस श्री दिलीप कोबनाक अनिल टिंगरे, मनोहर जाधव, उपस्थित होते. आगामी नगरपंचायत निवडणूक करिता या शहराची जबाबदारी म्हणून शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्री संतोष पानसरे हा कार्यकर्ता अतिशय मेहणती, हिंदुत्व विचारसरणी व रिक्षा चालकाना न्याय देण्यासाठी रिक्षा युनियन च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत, यामुळे भाजपा विस्तार साठी त्यांची चांगली मदत होणा...

• ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा  • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले. • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा

Image
• ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा   • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले. • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmt.page         म्हसळा समाजाचा आज ओबीसी आरक्षण बचावासाठी जबरदस्त धडक मोर्चा निघाला. तालुक्यातील ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा आज संघर्षमय मोर्चा पाहायला मिळाला. आपल्या प्रमुख मागण्यासहित अनेक कार्यकर्ते पण ठराविक कार्यकर्त्यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयाला धडक दिली. आपल्या प्रमुख मागण्या सरकार कडे मागत जबरदस्त असे एल्गार उभे केले. या मोर्चा चे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी सामील झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, शिव सेना तालुका अध्यक्ष महादेव पाटील, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहराध्यक्ष मंगेश मुंडे, राष्ट्रवादीच्या रेश्मा कानसे, भाजपचे गणेश बोर्ले, ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन भिकाजी उ...

विधानपरिषदेसाठी शिवसेनेत मतभेद

Image
मुंबई :           महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून रजनीताई पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, आणि गायक अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.            विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याकडे सोपवणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी ...