म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा भाजप मध्ये प्रवेश # भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी भाजप वाढवली # म्हसळ्यात भाजपचा नगराध्यक्ष होणार ?



  • म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा भाजप मध्ये प्रवेश

  • भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी भाजप वाढवली

  • म्हसळ्यात भाजपचा नगराध्यक्ष होणार ?


म्हसळा (प्रतिनिधी) @raigadmat.page
        म्हसळा शहरातील धडाडीचे नेतृत्व मा. संतोष पानसरे यांचा आज भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार श्री प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड श्री महेश मोहित  यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे पक्ष प्रवेश करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक भाजपा नेते श्री कृष्णा कोबनाक, तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर, सरचिटणीस श्री महेश पाटील, सरचिटणीस श्री सुनील शिंदे, चिटणीस श्री दिलीप कोबनाक अनिल टिंगरे, मनोहर जाधव, उपस्थित होते. आगामी नगरपंचायत निवडणूक करिता या शहराची जबाबदारी म्हणून शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्री संतोष पानसरे हा कार्यकर्ता अतिशय मेहणती, हिंदुत्व विचारसरणी व रिक्षा चालकाना न्याय देण्यासाठी रिक्षा युनियन च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत, यामुळे भाजपा विस्तार साठी त्यांची चांगली मदत होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्याना पाठबळ मिळणार आहे. शहरातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.


 


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर