Posts

थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या

Image
थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. 'संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत...

सर्वात मोठी बातमी - राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार # शिस्तीचे पालन केले, त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही

Image
जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय  मुंबई: पाडव्यापासून म्हणजेच सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत.  'दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घोषणा करताना ...

म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर  # सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली -  पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश

Image
म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर  सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली -  पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmat.page       म्हसळा तालुक्यात काही ठिकाणी चोर आणि काही गुन्हेगारांनी काही दिवसापूर्वी धुमाकूळ घातला होता. मात्र या लबाड चोरांना आळा घालण्यात म्हसळा पोलीस सदैव उजवे राहिलेले आहेत. चोर कितीही शातिर असला तरी तो काही तरी पुरावा सोडतोच. हिच बाब हेरून म्हसळा पोलीस स्टेशनचे "सतर्क पोलीस" कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांनी आपलं बुध्दिकौशल्याचा वापर करीत तंत्रज्ञानाचा वापर करून म्हसळ्यात ज्या घरफोड्या झाल्या होत्या त्या चोरांना बेडया  ठोकल्या होत्या. तसेच ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणातील काही गुन्हेगार म्हसळा येथे दबा धरून बसले होते, त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. अशा अनेक गुन्हेगारांना पकडण्यात संतोष चव्हाण हे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सहकारी सूर्यकांत जाधव, विजय फोफसे, संदीप फोंडे, मल्ह...

हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Image
रसायनी, राकेश खराडे   चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांच्यावतीने सामाजिक प्रबोधन करणारे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अकोले इंदुरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने  संस्थापक दिपक पाटील यांच्याहस्ते संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेली उद्योजक निलेश घरत, फाउंडेशनचे पुणे जिल्हा ध्यक्ष सिध्दार्थ जाधव, अभिजित खेबडे,अनिकेत तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.       ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांनी किर्तंनातून समाजप्रबोधन करुन माणुसकीचे दर्शन घडविण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे.त्यांच्या कार्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच असल्याने हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे संस्थापक दिपक पाटील यांनी सांगितले.

बोर्लेतील शेतकऱ्यांना बियाणांचे‌ वाटप

Image
  रसायनी, राकेश खराडे         भातपड क्षेत्रावर रब्बी हंगाम‌ हरभरा बियाणे लागवड (टिआरएफए) कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले.यावेली पंचायत समिती माजी उपसभापती वसंत काठावले,कृषी अधिकारी आय.डी.चौधरी, प्रगतशिल शेतकरी गोविंद पाटील,फार्मंर रिसोर्स बॅंकेचे सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कृषी पर्यंवेक्षक ढवल यांनी केले होते.      रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून विविध बियाणांची लागवड करुन पिक घेता यावे यासाठी टिआरएफ ए कार्यंक्रमाअंतर्गंत त्यांना बियाण्यांचे वाटप केल्याचे माजी उपसभापती वसंत पांडुरंग काठावले यांनी बोलताना सांगितले.    

शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले  स्वच्छता मोहीम

Image
  रसायनी : राकेश खराडे           शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर  गडकोटांचं रक्षण व्हावं या हेतूने, खालापूर तालुक्यातील  शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता  मोहीम राबविण्यात आली.        या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशिल कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडुन पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात. या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत दोन बॅगा प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरा पेटीत आणण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने मोहीम राबवण्यात आली होती.                  आतापर्यंत अशी मोहीम महाराष्ट्र...

म्हसळा नगरपंचायत वर हंडा मोर्चा ; काँग्रेस शहराध्यक्षा नाझीमा मुकादम कडाडल्या... 

Image
https://youtu.be/Psc9Cpb4BSw म्हसळा नगरपंचायत वर हंडा मोर्चा ; काँग्रेस शहराध्यक्षा नाझीमा मुकादम कडाडल्या...  म्हसळा / जितेंद्र नटे @ raigadmat.page        म्हसळा तालुक्यात जबरदस्त जनता जागृत झालेली आहे. आता कुठे जनतेला कळू लागले आहे. कि विकास कामे करायची सोडून प्रशासकीय सरकारी बाबू करतात काय? पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा खर्च नगरपंचायत ने करून आपल्या नागरिकांना सेवा पुरवायच्या असतात. कारण त्या साठीच आपण टॅक्स  - घरपट्टी भारत असतो. मात्र एवढे भरून सुद्धा साधे प्याचे पाणी मिळणार नसेल, रस्ते सुरक्षित व चांगले मिळणार नसतील तर काय फायदा?      यासाठीच जनतेला जागृत करण्यासाठी काँग्रेसच्या म्हसळा शहर अध्यक्ष नाझिमा मुकादम यांनी जोरदार धडक मोर्चा काढला होता.  म्हसळा शहरात काही ठिकाणी वार्ड क्रमांक ९ व १४ मध्ये दूषित पाणी, कमी पाणी आणि असुरक्षित टाकी या संधर्भात  काही दिवसापूर्वी नजिमा मुकाद आणि काँग्रेस पार्टी हे उपोषणास बसले होते. त्यांना म्हसळा नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिरडे यांनी सात दिवासात क...