शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले  स्वच्छता मोहीम







 

रसायनी : राकेश खराडे

 

        शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर  गडकोटांचं रक्षण व्हावं या हेतूने, खालापूर तालुक्यातील  शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता  मोहीम राबविण्यात आली.

       या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशिल कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडुन पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात. या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत दोन बॅगा प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरा पेटीत आणण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने मोहीम राबवण्यात आली होती.          

       आतापर्यंत अशी मोहीम महाराष्ट्रातील अनेक गडकिल्यांवर राबवली असून दुर्गसंवर्धन व स्वच्छता या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे.अभियान राबवण्यात आलेले आहे. यावेळी किल्ले विसापूर या मोहिमेत केतन भद्रीके,गजानन ठोंबरे,अभिषेक पाटील, महेंद्र ठोंबरे,रोशन ठोंबरे, मुरली लाळे,वैभव देवडे,धनंजय व अनिरुद्ध कुंभार व सूरज लाखोटीया सहभागी झाले होते.







 



 



Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर