Posts

हे समाजबांधवा....!!! -  अखिल खैरे - 7769874400

Image
हे समाजबांधवा....!!! कधी करशील तु बंड, किती राहशील तु षंड, पोकळ स्वाभिमानाने, थोपव स्वता:चे दंड ! मताची किंमत आजवर, तुला कळलीच नाही, शासनकर्ती जमात, आजही भीतींवरच राही !! बाबांच्या स्वप्नांची, हत्या किती रे करशील ? मते आपली विकुन, घरे किती भरशील..? अभिवादन करतोस आज, भीमसैनिक होऊन, जाग ईमानाला जरा, दे मुखवटा तो सोडुन ! कोण आपलं - कोण परखं, आता समजुन घे, एकीचे बळ देऊनी, निळ्या झेंड्याखाली ये !! हो कर्मठ,हो स्वाभिमानी,विकला जाऊ रे, या अभिवादन दिनी, हा तु नवसंकल्प घे...!!!                                   अखिल खैरे                           7769874400

ये परत भीमा तु.....! -   अखिल खैरे - 7769874400

Image
ये परत भीमा तु.....! आधार होता त्याचा, होता त्याचा पहारा, तो लखलखता तारा, जेव्हा तुटूनी पडला ! प्रकाशमय जिवनात अंधार झाला सारा, प्रज्ञासुर्य होऊनी ये परत भीमा तु !! तुझ्याच लेकरांचा आवर हा पसारा, अथांग होता सागर, विस्कटला तो किनारा, तु दिलेली शिकवण भाषणात आहे आज, मनगठातला जोर कृतीत नाही आज, समतेचा तो रथ, मातीत रूतला रे  तु-तु, मी-मी करत, तेथेच सोडला रे.... ये परत भीमा तु..... येशील तु जर का..?, राग मानु नको बा-भिमा, तुझ्या मळ्याची राखण, करता आली नाही आम्हा, आला कि लाव चपराक जोरात, नशा उतरव आमची, आण-आम्हाला भानात, नाळ जोड आमची, तुझ्या रथाचे घोडे, तेव्हाच एक होईल, चाक रथाचे तेव्हाच पुढे जाईल, शोधु कुठे आसमंतात, फिरलो दिशादाही, ये परत भीमा तु...तुझी लेकरे तुझी वाट पाही.                                      अखिल खैरे                       7769874400

दिवंगत विद्या विजय मोरे यांचा जलदान विधी व शोकसभा..!

Image
दिवंगत विद्या विजय मोरे यांचा जलदान विधी व शोकसभा..! दिवंगत  विद्या विजय मोरे मुक्काम पोस्ट खांडपले  लोणारे तालुका माणगाव यांचा वयाच्या ५२ व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती विजय गंगाराम मोरे, मुलगा नरेश विजय मोरे , मितेश विजय मोरे व मुलगी  वर्षा विजय मोरे आहेत   त्यांचा जलदान विधी व शोकसभा ही रविवार दिनांक ०६/१२/२०२० रोजी त्यांच्या राहत्या घरी दुपारी १ वाजता होणार आहे. तरी सर्वांनी उपास्थित राहावे. पत्ता - बाबा संकुलन बिल्डिंग  ०३ ,नयन आकाश रूम नंबर - १०५ बी विंग,ओसवाल नागरी ,नारासोपरा  ईस्ट ,

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील 

Image
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील  भिंगारीसह कामोठे आणि टेंभोडेतील प्रकल्पग्रस्तांशी साधला संवाद स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या ६ व्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : राज भंडारी   गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करून घेण्यासाठी केलेल्या ४० वर्षांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारच्या माध्यमातून यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत हा पाठपुरावा केल्यानंतर आता शासनामार्फत सर्व्हे करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा होणारा सर्व्हे हा शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा आहे हे समजण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गावोगावी या बैठका घेवून शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय.    सिडकोला आज ५० वर्षे पूर्ण होवून गेली, मात्र १९७० साली सिडको आली त्याच्या अगोदर म्हणजेच जवळपास १९४० च्या आसपासचा असलेला सर्व्हे त्यांनी रेकॉर्डवर घेवून काम सुरू केले. मुळातच ३० वर्षांचा फरक आणि आता...

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ६ वी पुण्यतिथी साजरी काँग्रेस भवन येथे काँगेस नेत्यांनी केले प्रतिमेस अभिवादन

Image
बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ६ वी पुण्यतिथी साजरी   काँग्रेस भवन येथे काँगेस नेत्यांनी केले प्रतिमेस अभिवादन    पनवेल : राज भंडारी   बॅ ए.आर.अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले.   भारतातील मोजक्या राजकारण्यांमध्ये आदराने नाव घेतले जायचे असे व्यक्तिमत्व म्हणजे बॅरिस्टर ए.आर.अंतुले. त्यांच्या निधनानंतर गेल्या ६ वर्षांपूर्वी त्यांची उणीव काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना भासू नये आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एक ऊर्जा मिळत असते. बॅरिस्टर अंतुले यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले.   बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी झाला तर त्यांचे निधन २ डिसेंबर २०१४ रोजी झाले. ते भारतातील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री आण...

घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी - बहुजन क्रांती मोर्चा म्हसळा यांनी केली म्हसळा नागरपंचायतकडे मागणी. # म्हसळ्यातील नगरसेवक ५ वर्षात काही खास काम करताना कधी दिसले नाहीत, अशी "बोंबाबोंब" सध्या नागरिक करताना दिसत आहेत. 

Image
घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी - बहुजन क्रांती मोर्चा म्हसळा यांनी केली म्हसळा नागरपंचायतकडे मागणी.  म्हसळ्यातील नगरसेवक ५ वर्षात काही खास काम करताना कधी दिसले नाहीत, अशी "बोंबाबोंब" सध्या नागरिक करताना दिसत आहेत.  म्हसळा (जितेंद्र नटे)- रायगड मत      म्हसळा तालुका कोरोना या महामारीमध्ये होरपळून गेलेला आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने तर पार कंबरडेच मोडले आहे. नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा अवस्थेत  त्यांना आपण दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता त्यांच्याकडून जबरदस्ती २०१९-२० ची घरपट्टी - पाणी पट्टी वसूल केली जात आहे, हे दुर्दैवी आहे. आम्ही या निवेदनामार्फत विनंती करीत आहोत कि म्हसळा नागरपंचायत ने म्हसळा शहरातील नागरिकांची घरपट्टी - पाणी पट्टी मोठ्या  दिलाने माफ करावी आणि जे १ करोड रुपये आलेले आहेत त्याचा योग्य वापर करावा. असे पत्र बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड संयोजक सलीम अ. उक्ये यांनी लिहिले असून म्हसळा संयोजक महेश जाधव यांनी कार्यकर्त्यासोबत म्हसळा नागरपंचायतच्या कर निर्धारण अधिकारी दीपाली मुंडे यांना सुपूर्द केले.        ...

श्रीवर्धनमधील आराठी निष्क्रिय ग्रामपंचायतीत कचरा विल्हेवाट करण्याचा प्रश्न गंभीर. #कोराना काळात रोगराई पसरण्याची भिती ! ग्रामपंचायत कचरा उचलण्यास अक्षम !!

Image
श्रीवर्धनमधील आराठी निष्क्रिय ग्रामपंचायतीत कचरा विल्हेवाट करण्याचा प्रश्न गंभीर. कोराना काळात रोगराई पसरण्याची भिती ! ग्रामपंचायत कचरा उचलण्यास अक्षम !! श्रीवर्धन (सोपान निंबरे) :         झपाट्याने नागरीकरण होणारे गाव म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गावाचा उल्लेख केला जातो,  नागरी वस्त्या वाढत असल्याने आराठी गावची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आराठी ग्रामपंचायती कडून कचरा विल्हेवाटी करिता घंटागाडी चालू होती,परंतू गेल्या अनेक महिण्यांपासून कचरा गोळा करणारी आराठी ग्रामपंचायती मार्फत येणारी कचरा गाडी अचानक बंद झाल्याने अनेक ठीकाणी रस्त्यालगत कचरा पडलेला दिसून येत आहे ,मोठ्या प्रमाणात कचरा सांडल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरुन र्दुगंधी पसरलेली आहे, श्रीवर्धन शहराचे प्रवेशद्वार आराठी ग्रामपंचायत लगत असल्याने सदर आराठी गाव कचर्‍याच्या समस्येने ग्रस्त असल्याने बाहेरुन येणारे पर्यटक सुद्धा असे चित्र बघून वैतागत असल्याचे दिसून येते, आराठी ग्रामपंचायतीने कचर्‍याच्या या विषयावर एवढे महीणे होउनही काहीच परिणामकारक उपाययोजना का करत नाही? अ...