Posts

दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव

Image
  दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव  किमान एक लाखाचा घेराव  आंदोलनाची जय्यत तयारी  पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी १० जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आणि त्या अनुषंगाने या आंदोलनात किमान ०१ लाख लोकांचा सहभाग असणार असून त्यावेळेस पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात येणार आहे, असे आज (दि. १५) पनेवलमध्ये झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले.           आगरी समाज हॉल येथे झालेल्या रायगड व नवी मुंबई विभागाच्या बैठकीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय  विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ.भूषण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषेदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, दीपक पाटील, रुपेश धुमाळ, माज...

शेकापच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सिडकोने उचलल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या

Image
 शेकापच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सिडकोने उचलल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या पनवेल (वार्ताहर) ः गेल्या 10 दिवसापासून खांदा कॉलनी आणि परिसरात झाडांच्या छाटलेल्या फांद्या पडून आहेत. याचा मोठा त्रास खांदा कॉलोनी मधील रहिवासी, वाहनचालक यांना होत आहे. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.  याची दखल घेत सिडकोने तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या उचलल्या आहेत. खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून झाडांच्या फांद्या गेल्या 10 दिवसांपूर्वी छाटण्यात आल्या आहेत. परंतु फुथपाथ व रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फुथपाथवरून त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या फांद्यांवर वाहनचालकांनासुद्धा वाहन चालविताना अडचण होत आहे. या संदर्भात सिडको कार्यालयात कळवूनही रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गे...

शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात •

Image
 शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात  उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसा पर्यंत उद्दिष्ठ करणार पूर्ण  पनवेल   (वार्ताहर)- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड याच्या वतीने पोलिस मुख्यालय रोडपाली येथे वृक्षारोपण करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 61 हजार झाडे लावण्याचा संकल्प महाराष्ट्र वाहतुक सेनेने सोडला आहे.  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसी वृक्षरोपण करण्यास सुरूवात करण्यात आली असून  27 जुलैला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस आहे. या दरम्यान  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 61 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे या लागवडी बरोबर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येकावर सोपविण्यात आली आहे.    महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून निसर्गामध्ये भरपूर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 61 हजार वृक्षांच्या रोपांची लागण करण्याचा निर्धार अध्यक्ष उदय दळवी यांच्या संकल्...

पनवेल येथे गरजू रिक्षा-चालक व गरिब कामगार वर्ग यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे आजचा दिवशी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ५० कुटूंबांना अन्य-धान्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास मनसे पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदिप पाटील,प्रकाश लाड,रूपेश शेटे,मंदार पाटणकर वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्रसैनिक संजय मुरकुटे ,सचिन सिलकर,अनिमेश ओझे,दिपक शहा,अवधूत ठाकूर,गणेश गायकर,आकाश गाडे,अभि रिंगें,अक्षय जोशी,हिमांशु पाटील,आकाश घाटे,आकाश दलाल,विशाल चित्रुक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Image
 पनवेल येथे गरजू  रिक्षा-चालक व गरिब कामगार वर्ग  यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे आजचा दिवशी  मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ५० कुटूंबांना अन्य-धान्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास मनसे पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदिप पाटील,प्रकाश लाड,रूपेश शेटे,मंदार पाटणकर वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्रसैनिक  संजय मुरकुटे ,सचिन सिलकर,अनिमेश ओझे,दिपक शहा,अवधूत ठाकूर,गणेश गायकर,आकाश गाडे,अभि रिंगें,अक्षय जोशी,हिमांशु पाटील,आकाश घाटे,आकाश दलाल,विशाल चित्रुक आणि  इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी • 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार

Image
 साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे. ओमप्रकाश यादव (37) यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर क्र.एमएच-46-एच-2539 हा माल भरुन एल अ‍ॅन्टी टी कंपनीसमोरील मुंब्रा-पनवेल जाणार्‍या रोडवर तळोजा येथे उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रेलर लबाडीच्या इराद्याने मालासह चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार पनवेल, दि.14 (संजय कदम) ः 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जी.राईडस् फन फॅक्टरीजमध्ये घडली आहे. गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या जी.राईटस् फन फॅक्टरीजमध्ये जॉईंन्ट व्हिल राईटस्, ब्रेक डान्स राईटस्, ट्रान्सफार्मर, एसी, मायक्रोओव्हव असा मिळून 7,10,000/- रुपये किंमतीचा माल ठेवला असता सदर कंपनीचे सुपर वायझर भरत मोटवानी यांनी सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार तळोजा पोलीस सदर आरोपीचा शोध घ...

घरफोडीत रोख रकमेसह दागिने लंपास

Image
 घरफोडीत रोख रकमेसह दागिने लंपास पनवेल, दि.14 (संजय कदम) ः एका बंद घरात अज्ञात चोरट्याने बाल्कनीच्या दरवाजाद्वारे आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील रोख रकमेसह दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील इंडिया बुल्स ग्रीन सेक्टर 3 कोनगाव येथे घडली आहे. या ठिकाणी राहणारे सजनलाल पृथ्वीराज मिना (33) यांचे बंद असल्याचे पाहून अज्ञात इसमाने त्यांच्या बंद घराच्या बाल्कनीच्या दरवाजाच्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोेखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50 हजार असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास

Image
वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास पनवेल, दि.14 (संजय कदम) ः भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवलेले रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पनवेल शहरातील गुणे हॉस्पिटल जवळील भाजी मार्केट येथे घडली आहे. श्रीमती.सरस्वती राऊत (72) या गुणे हॉस्पिटलजवळ भाजी विक्रेत्याचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या जवळ साठलेली 22 हजाराची रोख रक्कम भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.