साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी • 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार

 साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.

ओमप्रकाश यादव (37) यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर क्र.एमएच-46-एच-2539 हा माल भरुन एल अ‍ॅन्टी टी कंपनीसमोरील मुंब्रा-पनवेल जाणार्‍या रोडवर तळोजा येथे उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रेलर लबाडीच्या इराद्याने मालासह चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जी.राईडस् फन फॅक्टरीजमध्ये घडली आहे.

गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या जी.राईटस् फन फॅक्टरीजमध्ये जॉईंन्ट व्हिल राईटस्, ब्रेक डान्स राईटस्, ट्रान्सफार्मर, एसी, मायक्रोओव्हव असा मिळून 7,10,000/- रुपये किंमतीचा माल ठेवला असता सदर कंपनीचे सुपर वायझर भरत मोटवानी यांनी सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार तळोजा पोलीस सदर आरोपीचा शोध घेत आहेत.



Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर