Posts

पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार

Image
पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार पनवेल (संजय कदम) : कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटरची चोरी करणाऱ्या आरोपींना नुकतीच कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी कळंबोली पोलिसांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.                 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्यासह उपशहर प्रमुख नरेंद्रसिंग होठी, उपशहर प्रमुख संजय भालेराव, शहर संघटक अरविंद कडव, विभाग प्रमुख महेश गुरव, उपविभाग प्रमुख तुषार निडाळकर, शाखाप्रमुख महेश दिघे यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांची भेट घेऊन त्यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करून लावलेलं पाणी मीटर चोर मोठ्या शिताफीने पाईपसकट काढून नेत होते. यामुळे कमालीचे हैराण झालेल्या नागरिकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कळंबोली प...

आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी, इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस

Image
आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी,  इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस  रायगड मत :  अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड पायथ्याशी मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली येथील इर्शाळवाडी वर मोठी दरड कोसळली या दुर्घटनेत काही नागरिक सुखरूप वाचले आहेत काही अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत तर अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एमजीएम रुग्णालयात, कळंबोली, पनवेल येथे दाखल करण्यात आले यावेळी या प्रसंगी जखमींची रूग्णालयात भेट घेवून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.         तसेच यावेळी सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती देत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम बरोबरच दुर्घटना स्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले आहे...

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...

Image
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... रायगड मत ने अगोदरच सांगितले होते आतले राजकारण  शरद पवार यांचा डबल गेम  मुबंई (रायगड मत ) दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, राजकीय जगात अनेकांच्या भूवया उंचावल्या. दादांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार  ज्या पावरांच्या मुळे बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे आणि टेंनशंचे वातावरण आहे. दादांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार आहे. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

पूरग्रस्त चिरनेरला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट

Image
  पूरग्रस्त चिरनेरला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट उरण (विठ्ठल ममताबादे) 4  ते 5 दिवसा पासून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे पाण्या खाली गेली होती. अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते चिरनेर गावातील परिस्थिती अतिशय चिंताजनक होती. चिरनेर गावा मध्ये डोंगरावरून येणारे  पाणी गावात घुसल्यामुळे व पाण्याचा प्रचंड वेग असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे. एक-दोन ठिकाणी घरांच्या भिंती पडलेल्या आहेत. सुदैवाने  कोणतीही जीवित हानी झालेली नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेला आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत यांनी चिरनेर मध्ये येऊन येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून संपूर्ण गावात फेरफटका मारला या पुरामुळे ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्य...

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रशासनासोबत पाहणी

Image
पाताळगंगा नदीचा पूर तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलनच्या पार्श्वभूमीवर  आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रशासनासोबत पाहणी  पनवेल(प्रतिनिधी) : पाताळगंगा नदीचा पूर तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी प्रशासनातील सर्कल, तलाठी व पोलीस प्रशासन यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.           डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथील ज्यांची घर पाण्याखाली गेली होती त्यांना आर्थिक भरपाई संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी व पनवेलचे तहसीलदार यांच्याशी दोन्ही आमदार महोदयांनी चर्चा करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच डोंगर लगत असलेल्या लोकांचे तात्पुरते स्थलांतर व कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दिले.        यावेळी केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंग...

इर्शाळवाडी येथील बांधवांना राहण्याची आणि अन्नसेवेची व्यवस्था

Image
इर्शाळवाडी येथील बांधवांना राहण्याची आणि अन्नसेवेची व्यवस्था पनवेल : प्रितम म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृहा मध्ये आज पासून इर्शाळवाडी येथील बांधवांना राहण्याची आणि अन्नसेवेची व्यवस्था आज दुपारपासून करण्यात आली आहे.     खालापूर तालुक्यातील चौक इरशाळ गडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली असून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदत कार्यात सक्रिय आहेत. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक मदत करीत आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी या ठिकाणी भेट देऊन मदत केली. या ठिकाणी मदतकार्य करणारे एन.डी.आर.एफ टीम, पोलीस बांधवांना तसेच सामाजिक सेवकांना श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.प...

खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Image
खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू खोपोली( प्रतिनिधी) खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्‍या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था मदतकार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बुधवारची रात्र इर्शाळवाडीतील रहिवाशांसाठी काळरात्र ठरली. रात्री 11.30च्या सुमारास डोंगराच्या वरच्या बाजूने मोठा आवाज झाल्याने गावातील मंदिरात असलेल्या तरुणांनी तत्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आवाज ऐकला ते गावाच्या बाहेर आले, पण तोपर्यंत वेगाने मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खाली येऊन अनेक घरांवर पडला होता. ही बाब तरुणांनी खालच्या वाडीवर येऊन सांगितल्यानंतर वार्‍यासारखे हे वृत्त सर्वत्र पसरले. शासकीय यंत्रणा, तहसीलदार, पोलीस विभाग, तसेच अपघातग्रस्...