Posts

करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टी अंतर्गत विविध विकास कामाचे उद्घाटन रविवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले

Image
करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टी  अंतर्गत विविध विकास कामाचे उद्घाटन रविवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले पनवेल (रायगड मत ) : करंजाडे ग्रामपंचायत अंतर्गत ऍम्ब्युलन्स सुविधा चे उद्घाटन आमदार महेश बालदी व सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत अंतर्गत ओपन जिम शिवमंदिर जाण्याचा रस्त्याचे काँक्रिटीकरण स्वच्छालय सुविधा गावदेवी आदिवासी येथे नळ योजना अशा विविध कामाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे आभार सरपंच मंगेश शेलार व सागर आंग्रे यांनी मानले या कार्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कमिटी यांनी मान्यता देऊन सर्व कामे करण्यात आली

पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

Image
पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह  पनवेल  ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे असलेल्या बसस्टॉपच्या पाठी मागील बाजूस पावसामुळे साठलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळला परिसरात खळबळ उडाली असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत .                     सदर महिलेचे अंदाजे वय ( ४० ते ४५ ) वर्ष ,डोक्यावरील केस काळे असून तिच्या अंगात निळ्या रंगाचे फुल टीशर्ट व त्याच्या आतमध्ये लाल रंगाची काळे ठिपके असलेली मॅक्सी घातलेली आहे . या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फो. नं . - ०२२-२४७५२४४४ किंवा पोलीस निरीक्षक लाला लोणकर मो. ८०८७२५७७११ येथे संपर्क साधावा .  फोटो - मयत महिला

सिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीमला मदतीचा हात

Image
सिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीमला मदतीचा हात  पनवेल  ( वार्ताहर ) : सलग दोन दिवस संध्याकाळी सिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल येथील मंडळाचे सदस्य दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीम थकून परतत असताना त्यांना चहा बिस्कीट सेवा दिली,जवळपास १००० च्यावर चहा आणि बिस्कीट दोन्ही दिवशी सपोर्टींग टीमला दिला.                     सतत पावसात भिजलेल्या लोकांना हा चहा मिळाल्यामुळे त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आधार झाला. पोलीस, वैद्यकीय डॉक्टरर्स आणि वाडीवरून खाली उतरणाऱ्या टीम्सनी मंडळाच्या हया कार्याचे कौतुक करून आभार मानले,सदर मोहिमेत अध्यक्ष केशव राणे,उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर, स्वप्नाली देसाई, अर्चना तावडे,सई राणे,आरती सावंत,स्वप्ना राणे,बाबाजी नेरूरकर,गुरूदास वाघाटे,प्रदीप रावले,सूर्यकांत देसाई,रंगनाथ नेरूरकर,सौरभ राणे, प्रतीक भोजने,संतोष नेरुरकर,यश मोचेमाडकर अशोक चव्हाण,जया परब,संकेत पवार,अनिकेत पालव यांनी सहभाग घेतला. फोटो - ...

रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर

Image
रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर पनवेलरोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर ( वार्ताहर ) : सामाजिक शैक्षणिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकाजीनी वाडी- पनवेल येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या नयनरम्य सोहळ्यास विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट ऑफीसर्स, समाजातील प्रतिष्ठित नागरिक आदि मान्यवरांसह रोटेरियन्स, अ‍ॅन्स आणि रोटरॅक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.                       रोटरीच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. माजी सचिव हितेश राजपुत यांनी गतवर्षात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला. माजी अध्यक्ष कल्पेश परमार यांनी गतवर्षातील उल्लेखनीय घटना विषद केल्या. श्याम फडणवीस यांनी प्रांतपाल मंजू फडके यांचा संदेश वाचून दाखवला. नूतन अध्यक्ष डॉ. जय भंडारकर यांनी आपली सन...

भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने केला वपोनि अनिल पाटील यांचा विशेष सत्कार*

Image
भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने केला वपोनि अनिल पाटील यांचा विशेष सत्कार  पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाणे कडून अविरत मेहनत घेऊन सातत्याने होत असलेल्या गाई चोरी च्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात यश संपादन करण्यात आले. याबद्दल भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.   पनवेल तालुक्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांना नुकताच छडा लावण्यात यश आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मुंबई, ठाणे सह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एका सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली होती. पनवेल तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवलदार सुन...

पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार

Image
पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार पनवेल (संजय कदम) : कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटरची चोरी करणाऱ्या आरोपींना नुकतीच कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी कळंबोली पोलिसांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.                 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्यासह उपशहर प्रमुख नरेंद्रसिंग होठी, उपशहर प्रमुख संजय भालेराव, शहर संघटक अरविंद कडव, विभाग प्रमुख महेश गुरव, उपविभाग प्रमुख तुषार निडाळकर, शाखाप्रमुख महेश दिघे यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांची भेट घेऊन त्यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करून लावलेलं पाणी मीटर चोर मोठ्या शिताफीने पाईपसकट काढून नेत होते. यामुळे कमालीचे हैराण झालेल्या नागरिकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कळंबोली प...

आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी, इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस

Image
आदिती तटकरे यांनी घेतली रुग्णालयात जाऊन काळजी,  इर्शाल वाडीतील जखमींची केली काळजीपूर्वक विचारपूस  रायगड मत :  अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड पायथ्याशी मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली येथील इर्शाळवाडी वर मोठी दरड कोसळली या दुर्घटनेत काही नागरिक सुखरूप वाचले आहेत काही अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत तर अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एमजीएम रुग्णालयात, कळंबोली, पनवेल येथे दाखल करण्यात आले यावेळी या प्रसंगी जखमींची रूग्णालयात भेट घेवून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.         तसेच यावेळी सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती देत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम बरोबरच दुर्घटना स्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले आहे...