Posts

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन

Image
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या निर्णयामुळे" शिवछत्रपती पुरस्कार साठी तरुण खेळाडूंचे भविष्य अंधारात*"--संजय सरदेसाई, सरचिटणीस ,महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन    आपल्या कामगिरीने महाराष्ट्रात भारतामध्ये व जगामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतास सर्वाधिक पदक मिळवून देणारा *पॉवरलिफ्टिंग*या खेळास राज्य क्रीडा व युवक संचालनालय विभागाच्या हुकूमशाही व एकाधिकारशाही मुळे या खेळास राज्य क्रीडा मंत्रालयाने वगळण्याचा निर्णय घेतला आहे. .या खेळाबरोबरच शरीर सौष्ठव,कॅरम, बिलियर्डस - स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ व याटिंग आदी सात खेळ या पक्तीत घेतले आहेत.      पॉवरलिफ्टींग या खेळाच्या अखिल भारतीय विद्यापीठ, अखिल भारतीय पोलीस,अखिल भारतीय सिव्हील सर्विसेस, अखिल भारतीय वनविभाग ,अखिल भारतीय कौल इंडिया,अखिल भारतीय पोस्टल विभाग, अखिल भारतीय शालेय अजिंक्यपद यांच्या स्पर्धांचा आयोजन केले जाते .त्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक खेळाडू सहभागी होत असतात व आपल्या कामगिरीने खेळाडू महाराष्ट्राचे नाव मोठे करत असतात कारण या खेळाडूंना त्या वि...

आंतरराष्ट्रीय पदक विजेता"कुणाल सुभाष पिंगळे" यांचा गौरव

Image
आंतरराष्ट्रीय पदक विजेता"कुणाल सुभाष पिंगळे" यांचा गौरव अरुण पाटकर (नवीन पनवेल) : नुकतीच दिनांक 11 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत मलेशिया येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग या  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रायगडचे ज्युनिअर खेळाडू" कुणाल सुभाष पिंगळे"यांनी 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले होते. त्याबद्दल "पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीनेदिनांक 24 /12 /2023 रोजी घोडवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले . त्याप्रसंगी संघटनेचे वतीने सचिव अरुण पाटकर, कार्याध्यक्ष यशवंत मोकल कार्यकारिणी सदस्य सुभाष टेंबे संदीप पाटकर आणि कुणाल पिंगळे याचे वडील सुभाष परशुराम पिंगळे, आई राजश्री  पिंगळे, काका एकनाथ  पिंगळे ,काकी पुष्पा एकनाथ पिंगळे आणि आजी सीताबाई परशुराम पिंगळे हजर होत्या. कुणाल पिंगळे ने मिळविलेल्या यशाबाबत संघटनेने अभिनंदन करून भेटवस्तू दिले तसेच अरुण पाटकर यांनी सुद्धा वैयक्तिक भेट वस्तू देऊन कुणाल पिंगळे याला पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांनी कुणाल याने पॉवर लिफ्टिंग खेळापासून दुर न राहण्या...

संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले.

Image
  संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले. श्रीवर्धन, राजू रिकामे (रायगड मत) श्रीवर्धन मधील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पंचक्रोशीतील मारळ आगर येथील समुद्रकिनाऱ्यावरील कासव घरट्यातून बाहेर पडलेल्या ८० पिल्ले यांना समुद्रात सोडण्यात आले. या पर्वातील रायगड जिल्हात सर्वप्रथम श्रीवर्धन तालुका ग्रामपंचायत मारळ हरिहरेश्वर आगर या समुद्रकिनारी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारी कासवाचे पहिले घरटे तयार झाले होते.  सह्याद्री निसर्ग कासव संवर्धन, श्रीवर्धन वनविभाग यांच्या अधिपत्याखाली कासव संवर्धन मारळ हरिहरेश्वर आगर.. हरिहरेश्वरला लाभलेला सुंदर समुद्र किनाऱ्यावरती ह्या हिवाळ्याच्या सुखद पर्वा मध्ये कासव हे समुद्रकिनाऱ्यावरती असलेल्या वाळूमध्ये आपली अंडी घालण्याकरिता येत असतात. यावर्षी दि. २९/१०/२०२३ रोजी या समुद्रकिनारी पहिले घरटे दाखल झाले. प्रजनन कालावधी करिता एकूण ६४ दिवसाचं कालखंड असावा लागतो परंतु सध्या झालेल्या हवामानाच्या बदलामुळे हवेमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ४७ दिवसांमध्ये १७ दिवस अगोदरच कासवां...

पिल्लई रसायनी कॅम्पसतर्फे "एनव्हिजन" जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविधांगी स्पर्धांचा समावेश

Image
  पिल्लई रसायनी कॅम्पसतर्फे "एनव्हिजन" जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविधांगी स्पर्धांचा समावेश  श्वेता भोईर  महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस तर्फे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी "एनव्हिजन २०२३" या कार्यक्रमाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. या मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व तांत्रिक अशा विविध प्रकारच्या एकूण ३२ स्पर्धांचा समावेश होता. यावेळी रायगड जिल्ह्यातील जवळपास ५० हुन अधिक शाळांनी तर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी खालापूर विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाळे, केंद्रप्रमुख किशोर परदेशी, महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पब्लिक रिलेशन्स व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स डिरेक्टर डॉ. निवेदिता श्रेयांस यांची मुख्य उपस्थिती लाभली.  पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस तर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच "कम्युनिटी आउटरीच इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम" अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

दमदार कामगार नेते संतोष भाई घरत यांनी ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ़ # कामगार वर्गामध्ये एकच जल्लोष # कामगार नेते संतोष घरत यांनी उरण वासियांचा जिंकला विश्वास

Image
  दमदार कामगार नेते संतोष भाई घरत यांनी ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ़ कामगार वर्गामध्ये एकच जल्लोष कामगार नेते संतोष घरत यांनी उरण वासियांचा जिंकला विश्वास प्रतिनिधी  (उरण) राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे या सर्वांच्या प्रयत्नामुळे RMBKS  कार्यालय जासई उरण येथे वेतन वाढ. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. (ट्रान्सइंडीया) खोपटे, उरण या कंपनी अंतर्गत मे. पायोनियर कारगो प्रा लि. लोकल लेबर कामगारांचा रू 7100/- वेतनवाढीचा करार संपन्न. ग्रॅास पगार रू 28,900/- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18/12...

आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय? Ok पण मग पनवेलचे काय?

Image
आमदार भ्रष्टाचारी, खासदार भ्रष्टाचारी, सरकारी अधिकारी भ्रस्टाचारी, अमुक तमुख भ्रष्टाचारी पण हे सगळे खोटे आहे... मीं तर म्हणेण मतदारच भ्रष्टाचारी, पैसे घेवून मतदान करतात, गावच्या गावे विकली जातात, समाज संघटना विकली जातात.... बिल्डिंग, सोसायटी विकली जाते, अध्यक्ष सेक्रेटरी विकले जातात, पत्रकार, संपादक विकले जातात, पेपरला जाहिरात पाहिजे म्हणून प्रकाशक मालक विकले जातात... समाज समाज विकले जातात, जात जात विकली जाते? समाजाचा अध्यक्ष विकला जातो, ट्रस्ट विकली जाते?  आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय? Ok पण मग पनवेलचे काय? वाचा सणसणीखेज सामान्य जनतेचे लोकमत म्हणजे @रायगड मत raigadmat.page संपूर्ण प्रकरण माहिती घ्यायची असेल तर करा gpay व्हा सभासद रायगड मत Gpay no - 8652654519 Rs. 1 rs. 

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे सुवर्ण पदक विजेता.

Image
आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे सुवर्ण पदक विजेता. अरुण पाटकर :           रायगडचे प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय खेळाडू "कुणाल पिंगळे(लोखंडे जिम,खोपोली)" यांनी न एशियन पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 53 किलो वजनी गटात जूनियर स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा १०ते१८डिसेंबर२०२३या  कालावधीत बहारू (मलेशिया)या ठिकाणी सुरू आहे. 53 किलो वजनी गटाच्या जुनियर स्पर्धेत कुणाल पिंगळे भारत देशातर्फे सहभागी झाला होता. सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्याबद्दल कुणाल पिंगळे आणि त्याचे जिम संचालक श्री. प्रतीक लोखंडे (खोपोली)    यांचे "पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड "चे अध्यक्ष गिरीश वेदक , उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचीन भालेराव, तसेच दत्तात्रेय मोरे, माधव पंडित, संदीप पाटकर, सुभाष टेंबे, मानस कुंटे ,राहुल गजरमल यांनी कुणाल पिंगळे याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. संघटनेचे सचिव अरुण पाटकर यांनी कुणाला हा पाचवा खेळाडू रायगड जिल्हात आंतरराष्ट्रीय पदक विजेता झाला आहे असे सांगितले.