Posts

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड, मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत पेण चे रमेश खरे यानानसुवर्णपदक

Image
  पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड, मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत पेण चे रमेश खरे यानानसुवर्णपदक पेण :  राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विपड आणि अनईक्विपड स्पर्धा इंदौर(मध्य प्रदेश) येथे 21 जुलै 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत संपन्न होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघातून मास्टर्स पुरुष4 (70 वर्षावरील स्पर्धक) साठी रायगड जिल्ह्याचे, पेणच्या हनुमान व्यायाम शाळातील रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी गटासाठी झाली होती. सदर स्पर्धा ही दिनांक 22/7/2024 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू रमेश खरे (वय वर्ष 75 पूर्ण)यांनी एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे. स्कॉट या प्रकारात 60 किलो, बेंच प्रेस प्रकारात 55 किलो, आणि डेडली प्रकारात 90 किलो असे एकूण 205 किलो वजन त्यांनी उचलले. त्याबद्दल त्यांना गटातून पहिले आणि इतर प्रकारातील ही पहिले अशी एकूण चार सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हेड मेकॅनिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले रमेश खरे हे हनुमान जिमचे संचालक,राष्ट्रीय पॉव...

आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर"

Image
  आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर" मुंबई : साऊथ आफ्रिका येथे ०५ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत या दरम्यान आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रायगडची शेलू वांगणीची रहिवासी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत हिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटात स्पॉट प्रकारापेक्षा 122.5 किलो वजन, बेन प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडली प्रकारात 132.5 किलो वजन घेतले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर "एशियन बेस्ट लिफ्टर"हा किताब सुद्धा प्राप्त केला. अमृता भगत ची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतीआणि तिने पदकांची परंपरा कायम राखली यासाठी रायगडचे माजी राष्ट्रीय खेळाडू माधव गोविंद पंडित यांनी आनंद व्यक्त केला. अमृता भगतीला खोपोली मधील विक्रांत अनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पावर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा प...

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट

Image
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट पनवेल : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट घेऊन कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ-  *राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे साहेब,*  *राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष भाई घरत* नुरा,शेख सर  जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महासचिव संजय घरत, महासचिव सतीश चिंडालिया, तसेच सिद्धार्थ मोहिते व संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार

Image
  सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय सीनियर इक्विपस्पर्धा दिनांक २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेच्या वेळी पॉवरलिफ्टिंग* *खेळामध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरी** *द्वारे महाराष्ट्राचे नाव अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उज्वल केलेले खेळाडू विलास दळवी आणि महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक विजेते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ,विजया नर* *(सेवानिवृत्त ,कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन)यांना जीवन गौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग* *खेळातील कामगिरी बाबत संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर संघटनेचे हितचिंतक आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी.यांना सुद्धा "जीवन गौरव पुरस्कार" क्रीडा* **पत्रकारिते बाबत देण्यात आला. संघटनेने* *पत्रकारितेमध्ये हा प्रथमच पुरस्कार दिला.त्याबद्दल सुहास जोशी यांनी आनंद* *व्यक्त केला आहे.* *सुहा...

उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार

Image
उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार पनवेल/जितेंद्र नटे  पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्योजक हरभजनसिंग संधेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत.नुकत्याच लंडनमध्ये ( ब्रिटन) संसदीय निवडणुका झाल्या,त्यात उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफबरो येथून निवडून आला आहे.तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला.पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जीवन संधेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसायानिमित्त पनवेल औद्योगिक वसाहत आणि लंडन असं उद्योगाच एक नातं तयार झाले आहे.जीवन संधेर हा तरुण असून अगदी कमी वयात निवडून आला आहे,यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता.तो खासदार झाल्याने पनवेल औद्य...

महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट # ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म - महेंद्र घरत

Image
  महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट  ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म - महेंद्र घरत आई दिवंगत यमुना घरत यांच्या स्मरणार्थ दिल्या एकूण १२ रुग्णवाहिका भेट उरण : यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, महाविकास आघाडीचे तडफदार नेतृत्व, कामगारांचा बुलंद आवाज महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. रविवारी हा दिमाखदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. महेंद्र घरत यांनी ही दिलेली रुग्णवाहिका ही १३ वी भेट दिली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे आयत्या वेळी अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर सदर बाब घातली असता महेन्द्रशेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले. नुसते आश्वासन नाही ...

सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच"

Image
सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच" शिवडी- वडाळा मुंबई येथील"ज्ञानेश्वर महाविद्यालय" येते 29 ते 30 जून 2024 या कालावधीत सीनियर पॉवर लिफ्टिंग राज्य स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून नामवंत सिनियर पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेत पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक उत्तम धुरी (मुंबई), द्वितीय क्रमांक विजय कांबळे (कोल्हापूर) आणि तृतीय क्रमांक अंकुश सावंत (मुंबई) यांना देण्यात आला.  महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, मधुकर पाटकर सर(शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि माजी पोलीस अधिकारी रक्षा महाराव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.