Posts

# दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे* # अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या"

Image
  # दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे*  # अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या"      पनवेल : तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यशश्री शिंदे च्या कुटुंबीयांची आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करतानाच आरोपीला फक्त फाशीच नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही अशा प्रकारची तीव्र शब्दात भावना त्यांनी व्यक्त केली.     रविवारी उरण मधील नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात ते सहभागी झाले होते. सदर गंभीर विषयात बोलताना त्यांनी सांगितले अशा प्रकारचे घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजची तरुण पिढी नशेच्या अध...

राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त

Image
# राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त  मुंबई : राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा (४०/५०/६०/७० वर्षावरील स्पर्धक) पावर लिफ्टिंग इंडिया मान्यतेने नुकतीच इंदौर (मध्य प्रदेश) येथे 21 जुलै 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत पार पडली.   या स्पर्धेत मास्टर 1 (40वर्षावरील.,) स्पर्धेच्या 59किलो पुरुष वजनी गटात "महेश सविता कृष्णा पाटील"या स्पर्धकाने 427.5 किलो वजन उचलून द्वितीय क्रमांकाचा रौप्य पदक पटकावले आहे. स्कॉट प्रकारात त्यांनी 170 किलो, बेंच प्रेस प्रकारात 80 किलो आणि डेडलीफ्ट प्रकारात 177.5 असे वजन घेतले. त्यामुळे त्यांना व बेंचप्रेस प्रकारात रौप्यपदक आणि डेडलीफ्ट  प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले त्यांना या स्पर्धेची एकूण चार  पदक प्राप्त झाले आहेत .यापूर्वी सुद्धा त्यांनी जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा पदक प्राप्त केलेले आहे. खालापूर तालुक्यातील आपटी  (डोनवत) गावचे रहिवासी असलेले महेश पाटील यांच्या रौप्य पदकाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिए...

०४ ऑगस्टला 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'

Image
०४ ऑगस्टला 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर पनवेल (प्रतिनिधी) अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०४ ऑगस्ट रोजी 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'चे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गर्दर्शनाखाली दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदा हे १६ वे महाशिबीर आहे.        खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, तसेच नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविणे, अशा विविध आरोग्य तपासण्यांसह, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार देण्यात येणार आह...

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'भव्य चित्रकला स्पर्धा' जाणीव एक सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन

Image
  कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'भव्य चित्रकला स्पर्धा'                जाणीव एक सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेलच्या वतीने शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे 'भव्य चित्रकला स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.         ज्युनिअर के.जी. ते पहिली, इयत्ता दुसरी ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात हि स्पर्धा होणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ३० जुलै असून स्पर्धेचे साहित्य (कंपास पेटी, पेन्सील, कलर ई.) प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे आणावे. स्पर्धकाला स्पर्धेच्या ठिकाणी चित्रकला पेपर व चित्राचा विषय देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व भेटवस्तु तसेच विजेत्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाव नोंदणी व अधिक...

शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा' नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी

Image
  शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा' नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी a पनवेल (प्रतिनिधी) युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गर्शनाखाली शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात 'भव्य रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.           या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी  https:// prashantthakur.jobfairindia.in  या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी ९९२०७६५७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

कु. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

Image
कु.  श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.. उरण @रायगड मत  बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २८ जुलै रोजी खांदा कॉलनीत बीएमटीसी बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समितीच्या अध्यक्षा श्रुती श्याम म्हात्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यातील काही कामगारांचा मृत्यू झाला आहे तर काही कामगारांचे वय ६० पेक्षा अधिक झाले आहे.         बीएमटीसी मधील माजी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येकी दहा बाय दहा चौरसफूटांचे भूखंड वितरित करण्याबाबत सिडकोमध्ये ठराव झालेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी लवकरात लवकर सिडकोने करावी अशी मागणी बीएमटीसी कर्मचाऱ्यांनी केली आहे. बीएमटीसी १९८४ साली बंद झाली. त्यावेळी कार्यरत असलेल्या १८०० कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी, नुकसान भरपाई व कायदेशीर देणी देणे सिडको...

यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी पनवेलमध्ये काढण्यात आला आक्रोश मोर्चा

Image
  यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी पनवेलमध्ये काढण्यात आला आक्रोश मोर्चा पनवेल : उरण येथील यशश्री शिंदे आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी 29 जुलै रोजी पनवेलमध्ये सर्वपक्षीय तसेच समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थींनी यांनी एकत्रित येवून आक्रोश मोर्चा काढला. यावेळी या दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. पाऊस पडत असताना देखील पावसाची तमा न बाळगता मोर्चा सावरकर चौकातून प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.           उरण शहरातील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येविरोधात पनवेल शहरातील सावरकर चौक येथे पनवेल परिसरातील विविध राजकीय पक्षाच्या महिला आघाडी तसेच विविध सामाजिक संघटना व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये पनवेल महापालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह म...