Posts

सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये"

Image
  "सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये"   पनवेल @ रायगड मत  महाराष्ट्र राज्य सिनियर, सब ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड ) पुरुष व महिला  बेंचप्रेस अजिंक्यपद - निवडचाचणी स्पर्धा- २०२४  महाराष्ट्र राज्य  पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने उपरोक्त स्पर्धा दिनांक २८ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- * *नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१** *वडाळा रेल्वे स्टेशन व किडवाई नगर पोलीस स्टेशन जवळ* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.    या राज्य स्पर्धेतून १४ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.  जर प्रवेशिका वेळेवर आली तरच तुमच्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल अन्यथा त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येणार नाही व स्पर्धेची प्रवेशिका maharashtrapowerlifting 2020@gmail.com या ईमेलवर ...

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर 'लोकमत लोकनेता' पुरस्काराने सन्मानित

Image
  लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर 'लोकमत लोकनेता' पुरस्काराने सन्मानित   पनवेल (प्रतिनिधी) राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना 'लोकमत लोकनेता' सन्मान पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार,  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे नेते माजी आमदार नांदगावकर, नितीन सरदेसाई, लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष विजय शुक्ला, संपादक अतुल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.                 महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ म्हणून पनवेल मतदार संघ गणला जातो. या मतदार संघाचे २००९ सालापासून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत.  कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर या...

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार

Image
  कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार उरण / रायगड मत  संपादक जितेंद्र नटे  रायगड व नवीमुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता.      दानशूर व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मागील ३७ वर्ष समाजासाठी तन -मन -धनाने काम करत असतांना हजारो तरुणांना नोकरी, कामगारांना न्याय, सर्व गावांमध्ये विकासाची कामे, १५ रुग्णवाहीका, शेकडो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी मदत,अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ...

देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

Image
देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव  # रायगड मत / जितेंद्र नटे  देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक 3 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे अभिनंदन होत आहे. ही त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 31 खासदारांचा या कमेटींत समावेश आहे. या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान देण्यात आला आहे.या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड केवळ त्यांच्या नेतृत्व कौशल्याचीच ओळख करून देत नाही तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदेशातील धोरणे आणि विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दिसून येते देशाच्या आर्थि...

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न.

Image
  # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न. # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक इंडिया प्रा. लि. मु. वेश्वी, ता. उरण या कंपनी मधील रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न. उरण / प्रतिनिधी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25/09/20234 रोजी RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतनवाढ करार संपन्न झाला. या प्रसंगी मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत राणे, कमर्शियल हेड शंकर पिल्लाई व कामगार प्रतिनिधी मनोहर नाईक, के. जानकीरामन हे उपस्थित होते. सदर करारामध्ये रू. 5700/- ची भरघोस वाढ झाली. बेसीकमध्ये 50% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये 50% आणि काळावधी 3 ...

बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता.. # करंजाडेतील महिलांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

Image
  *बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता*.. *करंजाडेतील महिलांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन* पनवेल/प्रतिनिधी -- स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे. ती प्रसंगी दूर्गा बनते, तर कधी गौरी आहे. काही प्रसंगी महिलांना दुर्गा अवतार देखील प्रकट करावा लागत असल्याचे करंजाडे सेक्टर सहा येथील गावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव करंजाडेचा राजा येथे महिलांनी गणेशाचे दर्शन देत महिला सक्षमीकरणाचे धडे देण्यात आले. करंजाडे वसाहतीतील सेक्टर 6 परिसरातील करंजाडेचा राजा गावदेवी गणेशोत्सवानिमित्ताने गेल्या दहा दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांचे खेळ, जेष्ठ नागरिकांसाठी तसेच लहान मुलांसाठी खेळ त्याचबरोबर सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रम गेले दहा दिवस आयोजिले होते. त्याचबरोबर मंडळाच्या महिलांनी विशेष करून राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अतिचार थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कडक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्याचबरोबर महिलांनी कश्या प्रकारे जागृत राहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर महिला संरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी महिलांनी एकत्रित येत श्र...

मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए ! रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख

Image
  मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए ! रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख  नवी मुंबई/साबीर शेख:- ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती  जगाला सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचं प्रतीक असणाऱे हजरत मोहंमद पैगंबर त्यांनी  दिलेला समता-बंधुत्व-प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करणारा ठरावा म्हणून जगभरात लोकोपयोगी ,मानव कल्याणकारी अनेक अभिनव उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविले जातात. त्याचप्रमाणे तळोजा फेज 1 सेक्टर 2 येथील मदरसा ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी " सर्वश्रेष्ठ दान रक्तदान " या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी केला.रक्तदात्यांच्या स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरत असल्याने यावेळी त्यांचे सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अल्पसंख्याक नेत्या सुलताना चांद बीबी वंशज ज्येष्ठ समाजसेविका अनिशा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले व सर्वांना ईद ए मिलाद च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आयोजक म्हणून ...