Posts

मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

Image
  मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.             29 डिसेंबर या दिवशी आंग्रेवाडी शाळा , गिरगाव या ठिकाणी मा. श्री . जितेश माहाडीक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.               कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय श्री. राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली . तसेच कार्यक्रमाला मुंबईकर मंडळाचे पदाधिकारी श्री.सहदेव काप, शांताराम जाधव, प्रकाश जाधव, संतोष विचारे, प्रमोद कापडी, पंकज शिगवण, महेंद्र जाधव, संतोष जाधव, रामदास कापडी, अरविंद खेरटकर,परेश कापडी, कैलास कापडी, सुनिल मौले, शांताराम खेरटकर, संतोष कापडी शैलेश जाधव, नरेंद्र विचारे, तसेच मंडळाचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव महेंद्र जाधव यांनी केल.         ‌

मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Image
  मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. म्हसळा प्रतिनिधी / महेंद्र जाधव   दि. 14 जानेवारी मकर संक्रांत निमित्त तांबडेश्वर महिला मंडळ ठाकरोली यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रत्येक घरातील महिला उपस्थित होत्या.              अनेक वर्षांची परंपरा जतन करत असताना एकरंग एक विचार एकोपा हे चित्र प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. अशी एकजुट असेल तर असे अनेक कार्यक्रम यशस्वी होणार यांत तिळमात्र शंका नाही असे विचार महिला अध्यक्षा यांनी या कार्यक्रमा निमित्त उपस्थित केले.तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या गावच्या कामात सर्वानी हातभार लावा अशा घोषवाक्य यावेळी देण्यात आले. तसेच सर्व महिला मंडळ गळाभेट भेटवस्तू देऊन हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.या कार्यक्रमाला महिला मंडळ सर्व पदाधिकारी यांनी खुप मेहनत घेतली .

श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न

Image
  श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न पनवेल :  सुकापुर - देवद येथील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री शिवगिरी सेवा संस्थानचे वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी "श्री दत्तजन्मोत्सव" शनिवार दिनांक १४डिसेंबर२०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. गेली २३ वर्षे सातत्याने संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक अबाल वृध्द भाविक मुंबई,नवी मुंबई,ठाणे,सातारा येथून आले होते. या सोहळ्यासाठी प्रसाद खोत, मिलिंद पांचाळ,मधुकर उर्फ भाई खोत,गिरीश गव्हाणे,संदीप जाधव,राजू खोत, शिवानंद प्रभू, बाळा तोडवळकर,माधुरी मिठबावकर,उदय सावंत,सुभाष खोत आदी साधकांनी खूप मेहनत घेतली.या उत्सवाचे आयोजन प्रसाद खोत यांच्या कल्पकतेने करण्यात आले होते. या प्रसंगी रुखवत स्पर्धा घेण्यात आली यामधे सौ. कविता खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ वैशाली गव्हाणे आणि सौ सुरेखा पाटकर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.  या उत्सवातील सर्वात मोठा कार्यक्रम ...

# आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार

Image
  # आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार पनवेल / प्रतिनिधी.       नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे.या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांचा शानदार पद्धतीने पण लक्षवेधी अनोखा सत्कार बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी केला.           यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सय्यद अकबर यांच्या राजकारणी आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले....

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या - आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

Image
  नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या  - आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी  पनवेल (प्रतिनिधी)  नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.          या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, सिडको मार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील अनेक घरे अथवा बांधकामांना अनधिकृत असल्याबाबत निरनिराळया वेळी अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. वस्तुतः ही सर्व घरे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बांधली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारावर होणारे अतिक्रमण आहे. यासंदर्भात वारंवार सुचना देऊनही प्राधिकरणामार्फत एखाद्या जुलुमशहाप्रमाणे सिडको प्राधिकरणाची वागणूक दिसून येत आहे. सिडकोला जर नैना परिसरात विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना कस्पटासमान वागणूक देऊन सिडको सहकार्य...

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर

Image
  आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (हरेश साठे) : आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. त्यांनी यावेळी बोलताना सर्वांचे आभारही मानले. पनवेल विधानसभेचे नेतृत्व करताना आमदार प्रशांत ठाकूर जबाबदारीने काम करत आहेत, त्यामुळे वडील म्हणून आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.             लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः हे देशाच्या विकासाचे मूळ उद्दिष्ट्य घेऊन काम करत आहे...

महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी

Image
  महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी म्हसळा / प्रतिनिधी  एकतर्फी विजय मिळवताना आदिती तटकरे यांनी ८२७९८ मताधिक्य घेत प्रथमतच श्रीवर्धन मतदार संघात इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याचा इतिहासात नोंद झाली आहे. ना भूतो न भविष्यती असा विजय, अब की बार ऐक लाख पार करीत महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील एकमेव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे.  महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा तब्बल ८२७९८ मतांनी पराभव केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांना ११६०५० मत तर नवगणे यांना अवघी ३३२५२ मत मिळाली आहेत.काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकुर यांना ४०८०,बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी साळवी यांना ७१८, मनसेचे फैजल पोपेरे २१२५,कुणबी समाज नेते बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांना अवघी ४९० मत ...