श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न
श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न
पनवेल :
सुकापुर - देवद येथील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री शिवगिरी सेवा संस्थानचे वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी "श्री दत्तजन्मोत्सव" शनिवार दिनांक १४डिसेंबर२०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. गेली २३ वर्षे सातत्याने संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक अबाल वृध्द भाविक मुंबई,नवी मुंबई,ठाणे,सातारा येथून आले होते. या सोहळ्यासाठी प्रसाद खोत, मिलिंद पांचाळ,मधुकर उर्फ भाई खोत,गिरीश गव्हाणे,संदीप जाधव,राजू खोत, शिवानंद प्रभू, बाळा तोडवळकर,माधुरी मिठबावकर,उदय सावंत,सुभाष खोत आदी साधकांनी खूप मेहनत घेतली.या उत्सवाचे आयोजन प्रसाद खोत यांच्या कल्पकतेने करण्यात आले होते. या प्रसंगी रुखवत स्पर्धा घेण्यात आली यामधे सौ. कविता खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ वैशाली गव्हाणे आणि सौ सुरेखा पाटकर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
या उत्सवातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे श्री दत्तप्रभूंचा पालणा आणि त्यानंतर निघणारी पालखी परिक्रमा. संस्थानच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हि पालखी परिक्रमा श्री दत्तमंदिर ए-टाईप येथे भेट देऊन मुळजागी आणण्यात आली सादर प्रसंगी जरीमरी माता मंदिर येथे पालखीचे स्वागत व अल्पोपहाराचा कार्यक्रम करण्यात आला. पनवेलच्या माजी उपमहापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सौ. चारुशीला घरत यांच्या हस्ते श्री दत्तमंदिर ए-टाईप येथे जमलेल्या भाविकांना संस्थेच्या वतीने छापण्यात आलेल्या साधना पुस्तिका आणि जपयंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले.ओरियन मॉल(पनवेल) चे मालक श्री मंगेश परुळेकर यांच्या भेटीने कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली.
पॉवरलिफ्टींग खेळात प्राविण्य मिळवून पनवेल रायगडचे नाव उज्वल केल्याबद्दल "गणेश तोटे" याचाआणि सनदी लेखापाल "राजाराम गोळे"यांचा गौरव संस्थानचे सचिव श्री शिवानंद प्रभू यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी पनवेल कुणबी समाजअध्यक्ष सुभाष टेंबे, अंकुश जाधव, अनंत गावडे, पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स रायगडचे अरुण पाटकर ,संदीप पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या ज्येष्ठ साधिका सौ माधुरी मिठबावकर यांच्या विवाहाला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही यथोचित सत्कार सदारप्रसंगी करण्यात आला.
Comments
Post a Comment