Posts

ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५ च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन

Image
  ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५ च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन पनवेल : एम. एम. व्ही. क्रिकेट क्लब धाकटी जुई यांच्या आयोजनाखाली आज छाया रिसॉर्ट मानघर येथे “ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५”  च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली.         मा. सरपंच श्री.शक्ती बाळकृष्ण म्हात्रे आणि मा. उपसरपंच श्री. मंगेश मधुकर घरत यांच्या पुढाकाराने सदर सोहळ्याचे नियोजन उत्तम रित्या करण्यात आले होते. या लीगमध्ये एकूण 8 गावातील 16 संघ खेळवली जातील. क्रिकेट क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला जास्तीत जास्त मानधन मिळून त्याच्या कलेला भविष्यात प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी आयोजन केले त्याबद्दल त्यांचे शेकापनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन केले.          यावेळी यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत श्री. रोशन डाकी (सरपंच), श्री. दर्शन म्हात्रे, श्री. संग्राम घरत, श्री. प्रल्हाद पाटील, श्री. सज्जन नवाळे, श्री. नामदेव केनी, श्री. वसंत नव...

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन

Image
  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडले. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना शुभेच्छा दिल्या.          कोकणातील जिल्हा जरी बदलला असला तरी सुद्धा आपल्या पनवेलमध्ये येऊन सिंधुदुर्ग मधील भाषा आणि परंपरा संघाच्या माध्यमातून आजही सर्व बांधवांनी जपली आहेत आणि त्या जपत असतानाच आपल्या स्थानिक इतर संस्कृती सुद्धा सर्व बांधव जोपासतात हे आज त्यांच्याशी संवाद साधताना प्रकर्षाने जाणवले आणि त्याचे मला समाधानी वाटले. यावेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या सिंधुदुर्ग वासियांचा प्रीतम म्हात्रे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.          याप्रसंगी श्री. गणेश कडू (मा.नगरसेवक), श्री. सर्वगोड साहेब (सा.बां.वि.अधिकारी), डॉ. भगवान बिरमोळे, ओरियन मॉलचे मालक उद्योगपती श्री. मंगेश परूळेकर, श्री. मंगेश अपराज व इतर मान्...

क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन  पनवेल : स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर व सरपंच चषक दापोली यांच्या वतीने मर्यादित षटकांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.    ग्रामीण भागात क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात खेळवले जातात यातूनच भविष्यात आपल्या विभागातून तरुण पिढी नक्कीच निर्माण होईल. उत्तम दर्जाचे आयोजन येथे येणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींना या सामन्यादरम्यान पाहता येईल याची मला खात्री आहे. असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. दापोलीच्या सर्व सभासदांना तसेच खेळण्यासाठी आलेल्या सर्व टीमला यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.         यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत प्रकाशशेठ जितेकर, श्री. मोतीराम जितेकर, श्री. समाधान घोपरकर, श्री. पंकलेश डाऊर, श्री. अमोल जितेकर, श्री. सचिन जितेकर, श्री. अनुज जितेकर, श्री. सौरभ जितेकर, श्री. प्रशांत जितेकर, श्री. राजेश पाटील, श्री. चिंतामणी घोपरकर, श्री. आकाश पाटील, श्री. विकास पाटील, श्री. आर.आर.प...

मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

Image
  मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.             29 डिसेंबर या दिवशी आंग्रेवाडी शाळा , गिरगाव या ठिकाणी मा. श्री . जितेश माहाडीक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.               कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय श्री. राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली . तसेच कार्यक्रमाला मुंबईकर मंडळाचे पदाधिकारी श्री.सहदेव काप, शांताराम जाधव, प्रकाश जाधव, संतोष विचारे, प्रमोद कापडी, पंकज शिगवण, महेंद्र जाधव, संतोष जाधव, रामदास कापडी, अरविंद खेरटकर,परेश कापडी, कैलास कापडी, सुनिल मौले, शांताराम खेरटकर, संतोष कापडी शैलेश जाधव, नरेंद्र विचारे, तसेच मंडळाचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव महेंद्र जाधव यांनी केल.         ‌

मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Image
  मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. म्हसळा प्रतिनिधी / महेंद्र जाधव   दि. 14 जानेवारी मकर संक्रांत निमित्त तांबडेश्वर महिला मंडळ ठाकरोली यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रत्येक घरातील महिला उपस्थित होत्या.              अनेक वर्षांची परंपरा जतन करत असताना एकरंग एक विचार एकोपा हे चित्र प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. अशी एकजुट असेल तर असे अनेक कार्यक्रम यशस्वी होणार यांत तिळमात्र शंका नाही असे विचार महिला अध्यक्षा यांनी या कार्यक्रमा निमित्त उपस्थित केले.तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या गावच्या कामात सर्वानी हातभार लावा अशा घोषवाक्य यावेळी देण्यात आले. तसेच सर्व महिला मंडळ गळाभेट भेटवस्तू देऊन हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.या कार्यक्रमाला महिला मंडळ सर्व पदाधिकारी यांनी खुप मेहनत घेतली .

श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न

Image
  श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न पनवेल :  सुकापुर - देवद येथील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री शिवगिरी सेवा संस्थानचे वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी "श्री दत्तजन्मोत्सव" शनिवार दिनांक १४डिसेंबर२०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. गेली २३ वर्षे सातत्याने संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक अबाल वृध्द भाविक मुंबई,नवी मुंबई,ठाणे,सातारा येथून आले होते. या सोहळ्यासाठी प्रसाद खोत, मिलिंद पांचाळ,मधुकर उर्फ भाई खोत,गिरीश गव्हाणे,संदीप जाधव,राजू खोत, शिवानंद प्रभू, बाळा तोडवळकर,माधुरी मिठबावकर,उदय सावंत,सुभाष खोत आदी साधकांनी खूप मेहनत घेतली.या उत्सवाचे आयोजन प्रसाद खोत यांच्या कल्पकतेने करण्यात आले होते. या प्रसंगी रुखवत स्पर्धा घेण्यात आली यामधे सौ. कविता खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ वैशाली गव्हाणे आणि सौ सुरेखा पाटकर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.  या उत्सवातील सर्वात मोठा कार्यक्रम ...

# आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार

Image
  # आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार पनवेल / प्रतिनिधी.       नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे.या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांचा शानदार पद्धतीने पण लक्षवेधी अनोखा सत्कार बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी केला.           यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सय्यद अकबर यांच्या राजकारणी आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले....