मराठा क्रांती मोर्चाची 18 जूनला पनवेल येथे बैठक

 मराठा क्रांती मोर्चाची 18 जूनला पनवेल येथे बैठक

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः  मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनाच्या संदर्भात पनवेल येथील व्ही.के.हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जून रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जून पासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची 28 जून तारीख दिली आहे. असे पहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहे. रायगडची तयारी करण्यासाठी 18 जूनला जिल्ह्याची बैठक घ्यायची आहे तरी सर्व तालुक्यातील 4/5 समन्वयक मिटिंग ला येणे आवश्यक असल्याचे विनोद सदाशिव साबळे, सुनील पाटील, गणेश कडू, राजेश लाड, शंकर पवार, प्रदीप देशमुख, हरीश बेकावडे, रुपेश कदम, अविनाश पाटील, संतोष पवार, शरद गोळे, अनिल भोसले, शशिकांत मोरे, नरेश सावंत, चेतन सुर्वे, कमलाकर लबडे, संजोग मानकर, संतोष साप्ते, वाय सी जाधव यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर