ब्लु फ्लॅगमुळे श्रीवर्धन मतदार संघात रोजगार वाढीस चालना मिळतेय. # कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी
कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी श्रीवर्धनसह महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. समुद्र किनाऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेले हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यात किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. ज्यामुळे पर्यटनाबरोबर स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, अशी आशा आहे. - आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री आमदार - श्रीवर्धन मतदार संघ ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली. अलिबाग : ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्र...