# श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सन्मानणिय अदिती वरदा सुनिल तटकरे यांची म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यासाठी विशेष भेट... # 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक विकास कामांचे केले उदघाटन.... # श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा, स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा निर्णय...
# श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय अदिती वरदा सुनिल तटकरे यांची म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यासाठी विशेष भेट...
# 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक विकास कामांचे केले उदघाटन....
# श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा, स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा निर्णय...
म्हसळा @ रायगड मत
www.raigadmat.page
पर्यटन विकास निधी :
म्हसळा-श्रीवर्धन येथे आमदार अदिती तटकरे यांनी नुकतीच भेट दिली. नुसती भेटच नव्हे तर अनेक कामांचे उदघाटन केले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले. त्यामुळे अदिती तटकरे यांचे मंत्रिमंडळातील वजन वाढले आहे. शेवटच्या क्षणी टाकलेला डाव यशस्वी झाला आणि लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले. त्यामुळे मंत्री अदिती तटकरे यांना विशेष महत्व आहे. त्यांच्या सूचना मुख्यमंत्री ही ऐकतात. नुकत्याच त्यांनी म्हसळा-श्रीवर्धन चा धावता दौरा केला. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटन विकासासाठी आणि इतर कामांसाठी एकूण 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन पर्यटन स्थळांच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी त्यांनी मिळवून घेतली. श्री हरिहरेश्वर प्रदक्षिणामार्ग विकास व सुशोभीकरणासाठी 22.72 कोटी, श्रीवर्धन तालुक्यातील मारळ येथे अवकाश निरीक्षण केंद्रासाठी 25.13 कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच, दिवेआगर येथे मत्सालय निर्मितीसाठी 69.17 कोटी रुपयांच्या आराखड्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यासही मंजुरी मिळाली आहे.
संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब आहे. श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा, स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा निर्णय आहे. त्यामुळे येथे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
म्हसळा येथे उर्दू शाळेला CSR फंड :
तसेच, राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नांतून, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) कंपनीच्या CSR निधीतून म्हसळा नगरपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला. या शाळेतील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे या भावनेने RCFL कंपनीच्या वतीने विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व वर्ग खोल्यांचे आतील व बाहेरील प्लास्टर व पेंटिंग, नवीन फ्लोरिंग, नवीन दरवाजे व खिडक्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक, खुर्च्या, शौचालय, डिजिटल बोर्ड व प्रोजेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक यंत्रणा अशा सर्व सुविधा RCFL कंपनीने पुरवल्या आहेत. एकप्रकारे या शाळेचा संपूर्ण कायापालट होऊन यापुढे सदर शाळा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व सुसज्ज ठेवण्यासाठी प्रचंड मोठे योगदान RCFL कडून मिळाले आहे. याबद्दल कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचे व आमदार अदिती तटकरे यांचे शाळेने मनापासून आभार मानले आहेत.
हिंदू सामाजिक सभागृहाचे उदघाटन :
त्याचप्रमाणे म्हसळा येथे अजून एक विकास कामाचे उदघाटन केले आहे. दिलेला शब्द पाळणारे अशी ख्याती असणारे सुनिल तटकरे यांच्या कृपा आशीर्वादाने JSW फाउंडेशन कंपनीच्या CSR निधीच्या माध्यमातून म्हसळा नगरपंचायत क्षेत्रात सामाजिक सभागृह उभारण्यात आले. या सामाजिक सभागृहाचेसुद्धा उदघाटन अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसळा तालुक्यात हिंदू जनतेने जबरदस्त ऐक्य दाखवत इलेक्शला भरघोस मतांनी अदिती तटकरेना यांना निवडून दिले होते. आपल्या मनमोहक भाषणात बोलताना, नागरिकांसोबत संवाद साधताना अदिती म्हणाल्या की, "हे सामाजिक सभागृह म्हणजे समाजाच्या जडणघडणीसाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल आणि समाजोपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."
यावेळी हिंदू समाजाचे अध्यक्ष, सभासद, पदाधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.raigadmat.page
Comments
Post a Comment