सीकेटी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग 

 



पनवेल(प्रतिनिधी) कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या व नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयमध्ये कोविड १९ काळातील बदलता दृष्टिकोन,  परिवर्तन व्यवस्थापनव कार्यनिती” या विषयांतर्गत गुणवत्ता हमी विभाग (IQAC)   आणि व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापक सहभागी झाले होते. 


सदरच्या चर्चासत्रातून सध्याच्या काळातील कोविड १९ या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा आणि व्यवस्थापनात परिवर्तन करून कार्यनिती कशी असावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले होते.


या चर्चासत्रासाठी के जे सोमय्या कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. शोभा मॅथ्यूज बेनेट  यांना आमंत्रित करण्यात आले होते.  या चर्चासत्राच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी माजी खासदार  व जनार्दन भगत शिक्षण  प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर,  आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांचे मार्गदर्शन लाभले.


या चर्चासत्राचे लाभ घेण्याचे आवाहन या चर्चासत्राच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.डी.ब-हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एलिजाबेथ मॅथ्यूज,  आरोरा पीजी महाविद्यालय संचालक हैदराबाद डॉ.एम. माधवी व मॉडेल इन्स्टिट्यूट पुणे संचालक डॉ. विजयालक्ष्मी श्रीनिवास यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापक विभागाच्या प्रमुख व चर्चासत्राच्या समन्वयक प्रो. तृप्ती जोशी आणि व्यवस्थापन विभागाच्या इतर प्राध्यापकांनी केले होते.


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर