युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

श्रीवर्धन प्रतिनिधी :राजू रिकामे

      राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत  युवक राष्ट्रवादी काँग्रेसने आज श्रीवर्धन नगरपरिषद शाळा नं 1 मध्ये रक्तदानाचे आयोजन केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, वडवली, श्रीवर्धन शहर या विविध भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. अलिबाग रक्तसंकलन केंद्राने डॉ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त पिशव्याचे संकलन केले. शहर त्याच सोबत तालुक्यातील विविध भागात राष्ट्रवादीने  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नगरपरिषद शाळा क्र. 1 मध्ये आयोजित रक्तदान शिबिर  प्रसंगी पक्षाच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी शरद पवार यांच्या जीवनावरती आधारित विविध चित्रफिती दाखवण्यात आल्या. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीची माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहम्मद मेमन यांनी सांगितलं शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. आज आपण त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहोत ईश्वर कृपेने त्यांना दीर्घायुष्य लाभो. व त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचा व्यक्ती आगामी काळात पंतप्रधानपदी विराजमान असेल अशा स्वरूपाचे कार्य आपणास  सर्व कार्यकर्त्यांना करायचे आहे. शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात  सदैव समर्पक भावनेने कार्य केलेले आहेत असे मोहम्मद मेमन यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश पोलेकर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले . व शरद पवार यांच्या कडून प्रेरणा  घेऊन आपण सर्वजण काम करूअसे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे सिद्धेश कोसंबे, अफजल मेमन, मयुरी वैद्य, सूचीन किर, श्रेयस जोशी  आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर