राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर राहून सुद्धा माणूसकी व दानशूरपणा जपणारा सहृदय लोकनेता रामशेठ ठाकूर ! -बी.जी.पाटील



 राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर राहून सुद्धा माणूसकी व दानशूरपणा जपणारा सहृदय लोकनेता रामशेठ ठाकूर ! -बी.जी.पाटील  


पनवेल: राजकारणात पद व संपत्ती वाढली की माणूसकी व दानशूरपणा विसरणारे बरेच आहेत. परंतू माणुसकी ज्यांच्या रक्तातच आहे. असे भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार व गोरगरीबदिव्यांग, सर्वसामान्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर हे खरोखरच दिव्यांग तसेच वंचित वर्गाविषयी सहानुभुती व आपलेपणा असणारे मानवतावादी राजकारणी व उद्योगपती आहेत.  

         कोरोना लाॅकडाऊनच्या कठीण काळात सन 2020 व 21 मध्ये दोन्ही वर्षी उपासमारीच्या संकटात सापडलेल्या दिव्यांग कुटुंबांना आर्थिक निधी, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अन्न दान मा.रामशेठ ठाकूर साहेब यांनी सढळ हातांने केले व आज सुध्दा करीत आहेत. पैसा अथवा संपत्ती सगळेच कमवितात परंतू गरीब,गरजू व दिव्यांग यांच्या करिता नियमितपणे मदत करणारे मा.रामशेठजी ठाकूर यांच्या सारखी माणसें फारच दुर्मिळ. आम्ही अनेक वेळा दिव्यांगांच्या विविध समस्या उदा.दिव्यांग निधीदिव्यांगांना व्यवसायासाठी जागा या बाबत मा.आमदार प्रशांतजी ठाकूर,रामशेठजी ठाकूर यानां भेटायला गेलो तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. अत्यंत साकारात्मक प्रतीसाद देऊन समस्या ही सोडविण्याचा प्रयत्न केला. 

त्यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य मिळावे अशा शुभेच्छा देत आहोत तसेच त्यांच्या या मानवतावादी कार्याचे अभिनंदन करीत आहोत. असे अपंग क्रांती संघटना व अपंग उत्कर्ष सामाजिक सस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांनी सांगितले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास फडके यांनी ही शुभेच्छा दिल्या. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळाराम रोडपालकर यांनी काव्यमय शुभेच्छा फारच बोलक्या आहेत. "दिव्यांगांच्या दिवसाची सुरुवात आहात तुम्हीदिव्यांगांच्या सुखाचे सागर आहात तुम्ही !दिव्यांगांच्या मदतिचे आधारस्तंभ तुम्ही...!आणि म्हणूनच वाटते- -आरोग्य संपन्न जीवन जगावे तुम्हीशतायुषी आयुष्य जगावे तुम्ही! " संघटनेचे विभाग प्रमुख- विनोद देवकर- कळंबोली,दत्तात्रेय पाटील- तळोजा,विकास ठाकूर- नावडे रोडपाली,अतूल रायबोले-खांदा काॅलनी,उज्ज्वला नलावडे- नवीन पनवेलरोशन एंजल-कामोठे, प्रकाश देसाई-खारघर,कुलदीप तांबे- पनवेल या सर्वांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर