श्रीवर्धन युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद समाज कार्य




श्रीवर्धन युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद समाज कार्य 

श्रीवर्धन प्रतिनिधी; राजू रिकामे      

          श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावातील कु.रिया मंगेश कातकर वय वर्ष १६ हिला कायम स्वरुपी मोठ्या आजार असल्याने रियाला दर महिनाला औषधे चालू असून त्यासाठी मोठया प्रमाणात खर्च होत असतो, तिच्या आईच्या व्यतिरिक्त घरी कोणी नसून आईला सुद्धा दोन्ही किडनीचा आजार आहे त्यामुळे तिची आई जड कामे करू शकत नाही, तरीही रियाच्या औषध उपचारासाठी आणि नित्यक्रमासाठी मोलमजुरी करून घर चालवत आहे. रियाच्या घरी आई शिवाय कमवणारे इतर कोणीही नसल्यामुळे गरीब परिस्थितीमुळे वेळेवर औषधे उपचार करू शकत नाही. ही परिस्थिती कुणबी युवा प्रतिष्ठान यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर मुलीस आर्थिक मदत प्राप्त होण्याकरिता समाज बांधवांना एका व्हाट्सएपच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले त्यामुळे समाजातील १२० समाज बांधवांनी मिळून एकूण ५० हजार रुपयाची आर्थिकदृष्ट्या मदत जमा करून, सदरची जमा झालेली मदत रक्कम कु. रिया कातकर हिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी गावातील अध्यक्ष, कमिटी सभासद व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.


भविष्यात अशीच लोकोपयोगी कार्ये कुणबी युवा प्रतिष्ठान, तालुका श्रीवर्धनच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर