# पनवेल - माणगांव लोकल ट्रेन सुरु करावी - जितेंद्र नटे # आमदार व कॅबिनेट मंत्री कु. अदिती तटकरे यांच्याकडे 4 तालुका संघटनेच्या वतीने पत्र देत लोकल ट्रेनची केली मागणी...
# पनवेल - माणगांव लोकल ट्रेन सुरु करावी - जितेंद्र नटे
# आमदार व कॅबिनेट मंत्री कु. अदिती तटकरे यांच्याकडे 4 तालुका संघटनेच्या वतीने पत्र देत लोकल ट्रेनची केली मागणी...
पनवेल (प्रतिनिधी)
सध्या सर्वत्र विकास कामे फास्ट होताना दिसत आहेत. मात्र म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव हे चार तालुके मात्र उद्योग धंद्यापासून वंचित राहिले आहेत. अशातच जर म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगांव यांना कनेक्ट करणारी पनवेल-माणगांव लाेकल सेवा सुरु केली गेली, तसेच बाहेरील मेल गाड्यांना माणगांव येथे थांबा देण्यात आला तर 4 तालुक्याना पुढे कनेक्ट करता येईल. असे पत्र अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी नुकतेच अदिती तटकरे यांना सुपूर्द केले. आमच्या पत्राची दखल घेत पुढे खासदार आणि रेल्वे मंत्रलयाचा पाठपुरावा करावा अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
याबद्दल सविस्तर बोलताना जितेंद्र नटे यांनी सांगितले की, मुंबईपासून जवळच रायगड जिल्हा आहे. उत्तर रायगड जिल्हयाचा झपाट्याने विकास हाेतांना दिसत आहे. मात्र दक्षिण रायगड जिल्हयातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव या ४ तालुक्याला मुंबईशी कनेक्टीवीटी नसल्यामुळे येथील स्थनिकांना राेजगार मिळत नाही किंवा लघु उद्याेग करता येत नाही. त्यामुळे गावेच्या गावी ओस पडलेली दिसत आहेत. त्याचे कारण रेल्वे कनेक्टीवीटी नाही. कृपया आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पनवेल - माणगांव - पनवेल ही लाेकल कनेक्टीवीटी दिल्यास येथील लाेक गावावरुन थेट पनवेल गाठतील पुढे नवीमुंबई, वाशी, ठाणे तसेच मुबंईला नाेकरी करण्यासाठी किंवा उद्याेग धंद्यासाठी येतील. तसेच अनेक छाेटे माेठे उदयाेग करुन आपला तयार केलेला उत्पादन ’माल’ जसे की, भाजीपाला, फुले, फळे किंवा दुध थेटे पनवेलला पुढे मुंबईला येऊन विकतील यांमुळे सस्थानिक बेराेजगार आपाेआप छाेटे माेठे उद्याेग धंदे करतील. कनेक्टीवीटी वाढल्यामुळे छाेट्या-माेठ्या कंपन्याही आपले कारखाने सुरु करतील. त्याचा नक्कीच परीणाम राेजगारावर हाेईल. राेह्यार्पंत मेमू रेल्वे सेवा आहे आहे मात्र त्याचा फायदा पुढील 4 तालुक्याना काहीच हाेताना दिसत नाही. त्यापेक्षा माणगांवला कनेक्टीवीटी द्यावी. नक्कीच चांगला परिणाम दिसेल.
लाेकल कनेक्टीवीटी वाढल्यामुळे, माणगांव ते तीर्थक्षेत्र हरीहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, तळा, म्हसळा, रायगड फाेर्ट येथील पर्यटन संख्या वाढेल परीणामी स्थािनकांना राेजगार मिळेल आणि बंद पडलेली घरे, ओस पडलेली गावे नक्कीच पर्यटन क्षेत्राकडे- लाॅजींग बाेर्डींग, तसेच हाेम स्टे (घरगुती निवास), हाॅटेल-ढाबे या व्यवसायाकडे वळतील. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल ते माणगांव पासून १०० कि.मी. अंतर आहे. हे अतंर कमी झाल्यास मुंबईवरून गावी, गावावरुन मुंबईला कमी तिकीटाने येता आल्यामुळे दळण-वळण वाढेल परीणामी राेजगार वाढेल. गेली कित्येक वर्षे काेकणी माणूस हा मुंबईवर अवलंबून आहे. कारण काय? तर, गावी कामधंदा नाही? नाेकरी नाही? त्यामुळे स्थलांतर थांबू शकलेले नाही. स्थलांतर का थांबत नाही? कारण गावी कनेक्टीवीटी नाही. लाेकल रेल्वेची - ट्रान्सपाेर्टची सुिवधा झाल्यास स्थलांतर थांबेल. गोरेगाव - पनवेल लोकल आहे. त्या धरूनच पनवेल - माणगांव लाेकल सेवा सुरु केल्यास नक्कीच रोजगारावर परिणाम होईल. शनिवार - रविवार कमी तिकिटामध्ये आणि कमी वेळे मध्ये लोक गावी पर्यटनाला जातील. पिकनिक साठी जातील त्याचा नक्कीच रोजगारं आणि व्यवसायावर होईल. तरी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन आपण पाठपुरावा करावा असे विनंती अर्ज ४ तालु्क्यातील नागरीकांच्या वतीने नम्र आमदार अदिती तटकरे यांना भेट घेऊन शेकडो लोकांच्या सह्यानिशी पत्र देत विनंती केली आहे. रेल्वे मंत्रालयाला ई-मेल द्वारे सुद्धा पत्रव्यवहार केले आहे असे शेवटी जितेंद्र नटे अध्यक्ष यांनी सांगितले. लवकरच रेल्वे विभाग याकडे लक्ष वेढावे हीच अपेक्षा अशी भावना 4 तालुक्यातील लोकांनी केली आहे.
Comments
Post a Comment