# मदत करणे हाच खरा धर्म - लोकनेते रामशेठ ठाकूर # माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; अखंड २२ वर्षे उपक्रम




# मदत करणे हाच खरा धर्म - लोकनेते रामशेठ ठाकूर 

# माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; अखंड २२ वर्षे उपक्रम 


पनवेल (प्रतिनिधी):  पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. सुशिला जगदीश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेलमध्ये उत्साहात आणि मोठ्या थाटात संपन्न झाला. दुसऱ्याची मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा धर्म सुशीला घरत आणि जगदीश घरत जपत आहेत असे गौरोद्वार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी काढले. 


         हा कार्यक्रम नवीन पनवेलमधील सी.के.टी. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी उपमहापौर चारुशीला घरत, वर्षा ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, के. डी. म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, वर्षा नाईक, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, सुधाकर थवई, जगदीश घरत, प्रभाग १७ अध्यक्ष विजय म्हात्रे, पनवेल वैद्यकीय सेलच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता घरत, अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अमेश तारेकर, उपाध्यक्ष नानचंद भोपी, संदिप पाटील, सचिव शेखर करमरकर, कार्याध्यक्ष सचिन पाटील, खजिनदार राहूल मालोतकर, सल्लागार परशुराम ठकेकर, श्रवण घोसाळकर, मयुर कदम, रतन नेपाडे, तुषार भगत, राजू बोराडे, प्रशांत आवळे, किसन गायकर, विजय म्हात्रे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुशीला घरत यांचे अभिष्टचिंतन केले. या कार्यक्रमात नवीन पनवेल परिसरातील विविध शाळांमधील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि त्यांना उपयुक्त अशा छत्र्यांचे वाटप करण्यात आले.


        गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवून समाजातील ज्येष्ठांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश साधला जात आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, “समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देणे ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. तसेच आजची तरुण पिढी शिक्षणात पुढे जावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुशिला घरत यांच्या पुढाकाराने गेली दोन दशके हा उपक्रम सातत्याने सुरू आहे, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा सामाजिक उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. ज्येष्ठांचा सन्मान केल्याने समाजाला मूल्याधारित दिशा मिळते आणि विद्यार्थी गौरवामुळे शिक्षणात स्पर्धा व प्रगतीला चालना मिळते, त्यामुळे हा स्त्युत्य असा सामाजिक उपक्रम असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच गेली २२ वर्षे सलगपणे हा उपक्रम सुरू ठेवणे ही फार मोठी बाब आहे. समाजासाठी आपली बांधिलकी सिद्ध करणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.  कार्यक्रमात सुशिला घरत यांनी सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, “गेल्या २२ वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू ठेवता आला याचे समाधान आहे. समाजातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मुलांची प्रगती हेच आमचे खरे यश आहे. अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे सर्व सदस्य, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर