आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*सन्मित्र सेवा संस्थेचे समाजसेवाभावी अनेक उपक्रम*
श्रीवर्धन / राजू रिकामे;
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावातील सन्मित्र सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कुडगाव आणि हरवित येथील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आदिवासी विद्यार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील अनेक शाळेतील गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. ह्याही वर्षी देखील संस्थेच्या वतीने दोन्ही शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक करताना शाळेतील शिक्षक गुणवंत नरूकर यांनी अशा मदतीमुळे विद्यार्थ्यांना आभ्यासाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन केले. संस्थेच्या वतीने ऍड.शैलेश चांदोरकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आमची संस्था सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. सदरच्या उपक्रमासाठी दिलीप पाटील मितेश जैन, मनिष भेडा, विकास केरकर, चंद्रा कोठारी, सुनिल दावडा, रविंद्र गांगण आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले. शाळेचे शिक्षक जनार्दन जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक बिरवाडकर सर, समीर सुर्वे, समीर दिवेकर, नितीन सुर्वे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment