# स्वरा कराओके स्टुडिओतर्फे ‘मेरे मनपसंत गीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न # माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती
# स्वरा कराओके स्टुडिओतर्फे ‘मेरे मनपसंत गीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
# माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती
संतोष ताजने, प्रणाली पावसकर, श्यामकांत पाटील, विवेक परब, जीत निकम, नायडू, महेश हेमराजनी, निर्मला धोत्रे, सागर उपश्याम, जाहिदा, मीना शर्मा, राजेश शाहीर, देविदास साळवे, मधुसूदन शेर्लेकर, निविदा तांबे, प्रतिभा चंदनशिवे, साबा खान, शांती शानू, मनोज शिंदे, राहुल मोरे, साईसार्थक पुजारी, कृष्णा पुजारी, शरद हर्ळणकर, रश्मी हर्ळणकर या गायकांनी आपल्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच यामध्ये चिमुकले गायक क्रिषा पुजारी व साई सार्थक यांनी सुद्धा आपल्या आवाजाने मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले परेश ठाकूर यांचे या कार्यक्रमाचे आयोजक शरद हर्ळणकर, रश्मी हर्ळणकर यांनी स्वागत सन्मान केला. या संगीतमय कार्यक्रमातून नवगायकांनाही एक व्यासपीठ मिळाले असून या आयोजनाबद्दल उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
Comments
Post a Comment