# लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु. # महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण.
# लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु. # महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण. # लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना असून ती कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी तात्काळ आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे श्रीवर्धन मतदार संघाच्या लाडक्या आमदार व महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी हातातील समय म्हणजे "घड्याळा"कडे बघत आपले मत "रायगड मत" कडे व्यक्त केले. रायगड मत / जितेंद्र नटे अनेक महिलांच्या संसाराला हातभार लावण्याचे पुण्याचे काम करणारी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या लाडक्या महिला मंत्री आदितीजी तटकरे यांनी आणली. महिन्याला मिळणारे थोडेफार पैसे हे पैसे नसून महिलांच्या हक्काची मदत झाली आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील महिला या योजनेचे सारे श्रेय आपल्या लाडक्या मंत्री आदिती तटकरे यांना देतात. दिवस रात्र एक करून त्...